जिल्हा परिषदेंतर्गत एकूण 14 विभाग कार्यत असून वर्ग-1 चे 70 वर्ग-2 चे 104 अधिकारी कार्यरत आहेत. वर्ग-३ व वर्ग-4 आस्थापना विषयक बाबींचा निर्णय बाकी असल्याने सदरची माहिती ठाणे व पालघर एकत्रितरित्या दाखविण्यांत आलेली आहे. वर्ग-3 चे 14058 आणि वर्ग-4 चे 892 असे एकूण 14950 कर्मचारी कार्यरत आहेत.
आय.एस.ओ.
ठाणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील आय.एस.ओ. नामांकन मिळवणारी पहिली जिल्हा परिषद आहे.
यशवंत पंचायत राज अभियान
सन 2010-2011 व सन 2011-2012 या वर्षातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त. 2 वर्षे सतत प्रथम पुरस्कार प्राप्त. तसेच सन 2011-2012 या वर्षात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती भिवंडीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
पंचायत सबलिकरण व उत्तरदायित्व योजना(PEAIS)
सन 2011-2012 या वर्षांत सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक प्राप्त.