ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

प्रस्तावना

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई ग्राम पंचायत अधिनियामाप्रमाणे संबंधित ग्राम पंचायतीची आहे. त्यामुळे ग्राम पंचायतींना तांत्रिक मार्गदर्शन तालुका व जिल्हा पातळीवर होण्याच्या दृष्टीकोणातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती जिल्हा स्तरावर झाली आहे. सदर विभागांतर्गत  जिल्हास्तरावर देखभाल व दुरुस्ती कक्ष व यांत्रिकी उपविभाग आहे  तसेच तालुकास्तरावर एकूण तीन उपविभाग आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम, स्वजलधारा व राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 2009-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले.

ग्रामीण भागाचा पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शानाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व विंधन विहीरी या सारख्या उपाय योजना या विभागामार्फत राबविल्या जातात.  ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयान्वये मागणी आधारीत लोकसहभागाचे लोकाभिमुख धोरण स्विकारले व या धोरणानुसार योजनांची मागणी, आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाची आहे.  सबब सदर कार्यवाही जिल्हा परिषद व ग्रामपंचातीच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातून करण्यात येते.  तसेच ज्या गावातील पाण्याचे उद्‌भव गुणवत्ता बाधीत झालेले आहेत, अशा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा या योजनेव्दारे करण्यात येतो.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेची कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येतात. यामध्ये विविध लेखाशीर्षा अंतर्गत प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे.

 1. नळ पाणी पुरवठा योजना करणे
 2. साधी विहिर योजना
 3. नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे
 4. साधी विहिर दुरुस्ती करणे
 5. नवीन विंधन विहिर घेणे
 6. विद्युत पंप/सौर पंपाद्वारे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे
 7. विंधन विहिर दुरुस्ती करणे
 8. टंचाई कार्यक्रम राबविणे

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने पाणी पुरवठा संबंधित कामे करणेत येतात व ग्रामपंचायतींकडे कार्यान्वयनासाठी व पुढील देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरीत करण्यात येतात.

विभागाची संरचना

विभागाची संरचना

संपर्क

कार्यालयीन पत्ता :-    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद ठाणे, जिल्हाधिकारी ठाणे कार्यालयाचे

                        आवार, गेट क्रमांक 4,  कोर्टनाका ठाणे पश्चिम – 400 601

ई-मेल पत्ता       :-    eebnthane@gmail.com

                           :-       exengiws.zpthane-mh@gov.in

कार्यालयीन कामकाजाची वेळ

कार्यालयीन कामकाजाची वेळ :-      सकाळी 09.45 ते 18.15 पर्यंत

महिन्यातीन पहिला, दुसरा, तिसरा व चौथा शनिवार व

प्रत्येक रविवार, शासकिय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया वगळून

विभागाचे ध्येय

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसे व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे.

विभागाची कार्यपध्दती

ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत प्रकल्प शाखा, देखभाल दुरुस्ती कक्ष व यांत्रिकी उपविभाग़ कार्यरत आहे. ग्रामीण भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणी अधारीत धोरणांतर्गंत विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रकल्प शाखा व यांत्रिकी उपविभागाच्या माध्यमातून नळ पाणी पुरवठा योजना, साधी विहिर, विंधण विहिर, लघु नळ पाणी पुरवठा योजना तसेच देखभाल दुरुस्ती कक्षांतर्गत नाविन्यपूर्ण उपाययोजना व पाणी पुरवठा योजना दुरुस्ती यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येणा-या कामांचा  विभागनिहाय कामांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

प्रकल्प शाखा -

 • जल जीवन मिशन कार्यक्रम

सन 2009-2010 पासून केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट पुर्नरचना करणेत आली.  ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC- Functoinal Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे.  सन 2024 पर्यंत राज्याताील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिीक नळ जोडणीद्वदारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन,  गुणतत्ता पूर्ण पाणी पुरवठ करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

 •  

यांत्रिकी विभाग

 • नवीन विंधन विहिर घेणे
 • विंधन विहिर दुरुस्ती
 • विंधन विहिर फ़्लशिंग
 • हातपंप बसविणे व कट्टा बांधणे
 • दुहेरी पंपावर आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना
 • सौर उर्जेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना

देखभाल दुरुस्ती कक्ष

 • साधी विहिर दुरुस्ती
 • अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती
 • प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती
 • अस्तित्वातील सर्व योजनांची माहिती अद्यावत ठेवणे

माहितीचा अधिकार

अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल

विभागातील अधिकारी कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.

पदनाम

विशेष वेतन

वेतन स्तर

1

कार्यकारी अभियंता

-

सहावा वेतन आयोग पे मॅट्रीक्स 15600-39100 ग्रेड वेतन 6600

2

उपअभियंता(स्था.)

-

सहावा वेतन आयोग पे मॅट्रीक्स 15600-39100 ग्रेड वेतन 5400

3

उपअभियंता(यां.)

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-20

4

सहाय्यक भुवैज्ञानिक

-

7  वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-19

5

कनिष्ठ भुवैज्ञानिक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-16

6

कनिष्ठ अभियंता (स्था)

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स  लेव्हल एस-15

7

कनिष्ठ अभियंता (यां)

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-14

8

सहाय्यक प्रशासन अधिकारी 

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-14

9

सहाय्यक लेखाधिकारी

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-14

10

आरेखक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-14

11

यांत्रिकी

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-14

12

वायुसंपडिक चालक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-8

13

सहाय्यक आवेदक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-8

14

वरिष्ठ सहाय्य्क

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-8

15

वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-8

16

कनिष्ठ सहाय्यक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-6

17

जॅक हॅमर ड्रिलर

-

7 वा वेतन आयेाग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-6

18

रिगमन

-

7 वा वेतन आयेाग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-6

19

संगणक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-6

20

वाहनचालक

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-8

21

नाईक/हवालदार

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-3

22

चौकीदार

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-3

23

परिचर/शिपाई

-

7 वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-1

24

मदतनीस

-

7  वा वेतन आयोग पे मॅट्रीक्स लेव्हल एस-1

विषयाचे कार्यासननिहाय वाटप

अ.क्र.

कार्यासनाचे नांव

सोपविलेले विषय

1

2

3

1

तांत्रिक शाखा-1

1) प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती

2) प्रोत्साहन अनुदान योजना

3) स्थानिक उपकर योजना

4) पाणीपटटी कर वसूल योजना

5) पा.पु.योजनांचे ऑटोमायझेशन व मिटरींग करणे.

6) अंगणवाडी पेयजल कार्यक्रम

2

तांत्रिक शाखा-3

1)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वार्षिक आराखडा तयार करणे

2) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लोकसहभागाअंतर्गत येणारी भिवंडी,  शहापूर,  येथील पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव व अंदाजपत्रक तपासणे व मंजूरीसाठी सादर करणे तसेच देयके तपासणे व मंजूरीसाठी सादर करणे

3) भिवंडी, , शहापूर तालुक्यातील ठकरबाप्पा, आमदार व खासदार निधी , दलित वस्ती, प्राथमिक आरोग्य क्रेंद्र इ. लेखाशिर्षांतर्गत कामांची अंदाजपत्रके तपासणे, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे तसेच सदर कामांची देयके तपासून सादर  करणे.

4) जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी.

3

तांत्रिक शाखा-5

1)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वार्षिक आराखडा तयार करणे

2) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लोकसहभागाअंतर्गत येणारी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड , येथील पाणी पुरवठा योजनांची प्रस्ताव व अंदाजपत्रके तपासणे व मंजुरीसाठी सादर करणे .

3) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड  तालुक्यातील ठकरबाप्पा, आमदार व खासदार निधी, दलित वस्ती, प्राथमिक आरोग्य क्रेंद्र इ. लेखाशिर्षांतर्गत कामांची अंदाजपत्रके तपासणे, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे तसेच सदर कामांची देयके तपासून सादर  करणे

4) पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे तसेच पाणी टंचाई कृती आराखडा ऑनलाईन करणे या कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीचे अंदाजपत्रक तपासणे त्यास तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन घेणे. टंचाई कालावधीत टंचाईचे साप्ताहिक व पाक्षिक अहवाल सर्व वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

4

लेखा

1)उपभिवंडी भिवंडी,   योजनांची देयके तपासून अर्थ विभागात पाठविणे व देयके तयार करणे .

2) मुदतीचे प्रस्ताव सादर करणे व टंचाई, आमदार, खासदार निधी विषयक काळ्या यादीत टाकणेचे प्रस्ताव सादर करणे.

3) अपूर्ण कामाच्या फाईलवर पत्रव्यवहार करणे.

4) पाणी पुरवठा विभागाकडील सुरक्षा अनामत देयके अदा करणे.

 1. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनांचे धनादेश बँकेत जमा करणे.
 2. योजनांच्या कपातीच्या धनादेशाची चलने भरणे.
 3. कॅशबुक लिहिणे.

5

निविदा

 1. ई निविदा विषयक कामकाज पहाणे व सर्व अनुषंगिक बाबींची पुर्तता करणे.

6

बजेट

1)विभाग व उपविभाग अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील योजनांची देयके तपासून अर्थ विभागात पाठविणे व देयके अंतिम मंजूर करुन घेणे.

२)शासकिय योजनांची तरतुद व खर्चाचा ताळमेळ घेणे.

३)विभागाचे व  तालुक्यातील स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती महालेखाकार, भारअधिभार प्रकरणे निकाली काढणे. तसेच संबंधीत तालुक्यातील स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती, महालेखाकार, मंबई भार अधिभार मुद्दांची पूर्तता करून परिच्छेद निकाली काढणे.

4)विनियोजन लेखे, उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा अहवाल सादर करणे.

5)रोख अनुदान कोषागारातुन अहारीत करणेचा प्रस्ताव व देयक तयार करणे.

6)वेतन व इतर भत्ते तसेच टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत मधील अनुदानाचे तालुकास्तरावर वित्तप्रेषण रक्कम वाटप करणे.

7)देखभाल व दुरूस्ती (Water Fund)  खर्चाचा ताळमेळ घेणे व वित्तप्रेषण वाटप करणे.

8) जिल्हा परिषद बजेट तयार करणे व शासनास बजेट सादर करणे.

7

आस्था-1

1) तांत्रिक संवर्गांची अनधिकृत गैरहजेरी प्रकरणे, निलंबन व विभागीय चौकशी प्रकरणे

 2)न्यायालयीन प्रकरणे पाठपुरावा करणे.

3) कोर्टकेस प्रकरणी वकील नियुक्ती करणे व वकील फी अदा करणे.

4)वर्ग1 व वर्ग2 ची आस्थापना

5) सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे / रजा रोखीकरण / गट विमा प्रकरणे व भ.नि.नि.प्रकरणे

6) अंतिम भ.नि.नि.रक्कम अदा करणेचे प्रस्ताव.

8

आस्था-2

1)तांत्रिक संवर्ग  वर्ग -3   ची आस्थापना विषयक बाबी.(जादा वय क्षमापन/ अपंगाना उपकरणे पुरविणे/रजा मंजुरी प्रस्तावइ.)

2)बिंदु नामावली नोंदवही अद्यावत ठेवणे व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविणे.

3)तांत्रिक संवर्गातील कर्मचा-यांची जेष्ठता यादी

4)कंत्राटी स्वरुपात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भरती प्रक्रिया राबविणे.

5) कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल अद्यावत करणे

6)त्रिस्तरीय योजनेवरील रोजंदारी कर्मचा-यांना नियमित आस्थापनेवर आणणे.

9

आस्था-3

1)ग्रा.पा.पु.विभागातील वर्ग-3 व  वर्ग-4 कर्मचाऱ्यांची आस्थापना

2)अनुसुचित जमाती कल्याण समितीस माहिती पुरविणे व अनुपालन सादर करणे.

        व अन्य अनुषंगिक बाबी

10

भाडांर

1)देखभाल व दुरुस्ती कक्षातील आस्थापना विषयक कामे.

2)प्रादेशिक न.पा.पु कर्मचारी आस्थापना विषयक कामे.

3) पाणी पट्टी वसुली संबंधी कामकाज

4)  जडसंग्रह नोंदवही (स्थावर जंगम मालमत्ता)

5)  संगणक खरेदी मागणी व दुरूस्ती

6)  टि.सी.एल व ॲलम खरेदी व वाटप

7) दलित वस्ती सुधार योजना

8)देखभाल दुरुस्ती कक्षकडील लेखा परिक्षण विषयक कामांची आक्षेप पुर्तता करुन अहवाल सादर करणे.

11

वेतन

1) मुख्यालयातील वर्ग-2 वर्ग -3 व वर्ग -4 कर्मचा-यंाची  सेवार्थ वेतनविषयक सर्व बाबी.

 2) कंत्राटी पध्दतीवर भरण्यांत आलेल्या कर्मचा-यांचे वेतन देयके करणे.

3) विदयुत देयके व टेलिफोन देयके.

4) गट विमा योजना प्रकरणे

5)राजपत्रित व सर्व कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ता देयके सादर करणे

12

प्रशासन

1) जलव्यवस्थापन समिती सभा व अन्य समिती सभांचे कामकाज करणे.

2)सर्व मासिक समन्वय सभा, जि.प.मधील विषय समित्यांच्या सभा  व ठराव यांचे कामकाज पहाणे व माहितीचे संकलन करणे.

3)वार्षिक  प्रशासन अहवाल तयार करणे.

4)मा.आयुक्त, कोकण भवन यांचेकडील तपासणी मुददे , रजिस्टर ठेवणे व पूर्तता करणे.

5)कामकाजाचा मूल्यमापन अहवाल, माहितीचा अधिकार अहवाल व शासनाने विहित केलेले अहवाल पाठविणे व अदयावत नस्ती व बांधिव नोंदवही ठेवणे.

6)माहिती अधिकारातील अर्ज व अपिल निकाली काढणे.

 7)यशवंत पंचायत राज अभियान वार्षिक अहवाल तयार करणे.

8)पंचायत राज समिती बाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

9)लोकशाही दिन व जनता दरबार.

10)का.अ.यांची दैनंदिनी तयार करणे. तसेच उपअभियंता दैनंदिनी व संभाव्य   फिरती कार्यक्रमास मंजुरी देणे.

11) वाहनांची डिझेल देयक तयार करणे तसेच वाहनासंबंधी पत्रव्यवहार ,देयके  तयार करणे.

12)अभिलेख याद्या अद्यावत करुन आय.एस.ओ संदर्भात नियोजनबद्ध कार्यवाही करणे.

नोंदणी शाखा

1) आवक जावक टपाल नोंदणी व वाटप.

2) सर्व प्रकारच्या संदर्भ नोंदवहया ठेवणे.

3) पोस्टेज स्टँपचा हिशोब अ व ब नोंदवहीत अद्यावत ठेवणे.

4) कार्यविवरण व प्रकरण नोंदवहीचा गोषवारा संकलन.

5) लेखन साहीत्य व सामुग्री आणणे व वाटप करणे.

  कनिष्ठ सहाय्यक

पी.बी-5 यांचे सहाय्यक

 1. पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यास मदत करणे.
 2. पाणी टंचाई साप्ताहीक,मासिक अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करणे.

3) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, तालुक्यातील न.पा.पु.यो. फाईल अद्यावत ठेवणे.

 4) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड , तालुक्यातील विहिरींच्या फाईल अद्यावत ठेवणे.

5) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड,शहापूर या तालुक्यातील 10%, 5% लोकसहभाग देयके , आमदार, खासदार, ठक्करबाप्पा, टंचाई, देखभाल दुरुस्ती  देयके करुन ती  सादर करणे.

       आरेखक      

 (पी.बी-3 शाखेस सहाय्यक

1) शहापूर, भिवंडी, तालुक्यातील 5% व 10% न.पा.पु.यो. फाईल अद्यावत ठेवणे.

2) शहापूर, भिवंडी, तालुक्यातील 5% व 10% विहिरींच्या फाईल अद्यावत ठेवणे.

    सहा.आवेदक(यां.)

1)विदयुत पंप व हातपंप दुरुस्ती, वसुली, वापरलेले साहित्य यादी, माहिती संकलित करणे.

3)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम-शहापूर मुरबाड

5)TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

6)NRDWP , मानव विकास कार्यक्रम

8)गाडया दुरुस्ती प्रस्ताव व दाखले

9) शाळा,आरोग्य केंद्र ,दवाखाना,अंगणवाडी व इतर सरकारी संस्था ,विं.वि,विदयुत पंप दुरुस्ती व खोदाई.

यांत्रिकी

1)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम-पालघर,तलासरी,मोखाडा,वसई

2) TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

3)NRDWP-कल्याण ,अंबरनाथ

4) मानव विकास कार्यक्रम-शहापूर मुरबाड

5) गाडया दुरुस्ती प्रस्ताव व दाखले (जि.प.पालघर)

6) फ्लशिंग-तालुका कल्याण,अंबरनाथ,

रिगमन

1)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम

3) TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

4)NRDWP- मूरबाड, शहापूर,

5) मानव विकास कार्यक्रम

6) हातपंप साहित्य खरेदी /वितरण करणेकामी शाखा अभियंता यांना मदत करणे.

7) फ्लशिंग - तालूका शहापूर, मुरबाड

विभागांतर्गत विविध समित्या

अ.क्र.

समितीचे नाव

समितीचे सदस्य

समितीचे उद्दिष्ट

किती वेळा

घेण्यात येते

सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही

सभेचा कार्यवृत्तांत

(उपलब्ध )

1

आश्वासित पदोन्नती समिती

अध्यक्ष  तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

सदस्य तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी

सदस्य तथा उमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)

सदस्य तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी

सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता, ग्रा.पा.पु.विभाग

विभागातील/ उपविभागातील पात्र कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करणे.

वर्षातून एकदा

नाही

2

निविदा समिती

अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी

सदस्य तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी

सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता ग्रा.पा.पु.विभाग

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणणे.

आवश्यकतेनुसार

विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती

प्रकल्प शाखा

जल जीवन मिशन कार्यक्रम 

            केंद्र शासनामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत सन 2024 पर्यंत 55 लीटर दरडोई दर दिवशी प्रमाणे 100 टक्के कुटंबांना वैयक्तिक नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे.   100 टक्के नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट साध्य करणेसाठी गावामधील आवश्यक उपाययोजना उदा. उद्भव निर्मिती, वाढीव पाईपलाईन, नवीन स्वतंत्र योजना, नवीन प्रादेशिक योजना व सौर उर्जेवर आढारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहेत.  त्या अनुषंगाने पुढील 4 वर्षांसाठी महसूल गावनिहाय गाव कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.  व सदर कार्यक्रमाची कार्यप्रणाली व निकषाबाबत शासनाच्या प्राथमिक मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

तालुका

गावांची संख्या

घरांची संख्या

दि.31/03/2020 पर्यंत नळ जोडणी संख्या

दि.01/04/2020 रोजी शिल्लक उद्दिष्ट

सन 2020-21 मध्ये साध्य

अंबरनाथ

63

18158

8888

9270

1801

भिवंडी

221

87924

28907

59017

15578

कल्याण

83

31103

10028

21075

6144

मुरबाड

203

36016

5726

30290

1871

शहापूर

226

61394

20976

40418

6923

एकूण

796

234595

74525

160070

32317

जल जीवन मिशन अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे प्रस्तावित आहेत.

 1. अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनांमध्ये 55 ली. दरडोई दर दिवशी प्रमाणे पाणी उपलब्ध असलेल्या गावांमध्ये 100 टक्के नळ जोडणी करणे
 2. अस्तित्वातील योजनांमध्ये 55 ली. दरडोई दर दिवशी प्रमाणे पाणी उपलब्ध नसलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजनांसह 100 टक्के नळ जोडणी करणे
 3. नळ पाणी पुरवठा नसलेल्या गावांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध असल्यास नवीन नळ पाणी पुरवठा योजना करणे
 4. सौर उर्जेवर लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे
 5. जल जीवन मिशन कार्यक्रम 50 : 50  केंद्र व राज्य निधी अंतर्गत राबविण्यात येणार आहे. तसेच नळ जोडणीसाठी १५ वा वित्त आयोगा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध निधी वापरण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत.

 आमदार निधी

            आमदारांचे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मा.आमदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

 खासदार निधी       

            मा.खासदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

 डोंगरी विकास कार्यक्रम

            मा.आमदारांमार्फ़त शिफ़ारस करण्यात आलेल्या व निधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांचे कामांना मा.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फ़त प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फ़त करण्यात येते.

 ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना

            या योजने अंतर्गत आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी गाव/पाड्यांसाठी पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत शिफारस करण्यात आलेल्या कामांना ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तांत्रिक मान्यता देण्यात येते व प्रकल्प कार्यालयामार्फत सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्यात येते. योजनांची अंमलबजावणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येते.

महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा स्वच्छता योजना

            अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळजोडणीसाठी प्रती कुटुंब रु.4 हजार व वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रती कुटुंब रु.11 हजार अनुदान देय आहे. सदर अनुदानापैकी 95 शासकीय अनुदान व 5 टक्के लोकसहभाग अनुज्ञेय आहे.

यांत्रिकी उपविभाग

यांत्रिकी विभागाच्या कार्यकक्षेमध्येखालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

व्यवस्थापकीय कार्य

 1. टंचाई तसेच आदिवासी उपयोजना, आमदार व खासदार निधी अंतर्गत नवीन विंधन विहिर घेणे व हातपंप बसविणे.
 2. अस्तित्वातील विंधन विहिरींची ग्रामपंचायतीबरोबर करार करुन देखभाल व दुरुस्ती करणे.
 3. विद्युत पंप व सौर पंपावर आधारीत लघु न.पा.पु.योजना करणे.
 4. हातपंपाची मागणी व वसुलीची माहिती अद्ययावत करणे व प्रत्यक्षात वसूली करणे.

तांत्रिक कार्य

 1. देखभाल दुरुस्ती पथकाचे माध्यमातून करार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे अंतर्गत असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती करणे.
 2. विंधन विहिरींचे फ्लशिंग करणे.
 3. ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सर्वेक्षण करुन, छोट्या वाड्यांसाठी विंधन विहिरींवरुन विद्युत पंप व सौर पंपाच्या माध्यमातून लघु न.पा.पु.योजना करणे
 4. नवीन विंधन विहिर घेणे

देखभाल दुरुस्ती कक्ष

4 मार्च 2011 चे शासन निर्णयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत देखभाल दुरुस्ती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  देखभाल दुरुस्ती कक्षाच्या कार्यकक्षेमध्येखालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

व्यवस्थापकीय कार्य

 1. संपूर्ण जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची माहिती अद्ययावत ठेवणे
 2. ग्रामपंचायतीनिहाय पाणीपट्टी व देखभाल दुरुस्ती खर्चाचा आढावा घेणे
 3. विजेचा वापर कमी ठेवणेबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे
 4. घरगुती नळपाणी पुरवठा करीता कनेक्शन वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व लाभार्थ्यांना नियमित आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याकडे लक्ष देणे.
 5. लाभार्थ्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करणे.

तांत्रिक कार्य

 1. संबंधित ग्राम पंचायतींना पाणी पुरवठा योजनांच्या व आपत्कालिन परिस्थितीमध्ये तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षित करणे.
 2. पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत यास्तव प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत सूचना करणे.
 3. लाभार्थ्यांनी पाणी योजनांचा लाभ घेतला नाही तरी देखभाल दुरुस्ती कक्षाने सदर योजना सुरु राहिल याकडे लक्ष देणे
 4. योजनांच्या उभारणीत आवश्यक मानकानुसार निश्चित केलेया गुणवत्तेचेच साहित्य वापरात आणले जाईल याकडे लक्ष देणे.

आर्थिक कार्य

 1. ग्रामपंचायत निहाय वार्षिक खर्चाची आकडेवारी इ. माहिती तयार करणे
 2. प्रोत्साहन अनुदानासाठीचे प्रस्ताव वेळच्यावेळी शासनास पाठविले जातील याकडे लक्ष देणे
 3. योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखभाल दुरुस्ती निधीमधून करणे.

विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)

अ.क्र.

विषय

दस्ताऐवजाचा प्रकार नस्ती/ मस्टर/ नोंदपुस्तक/ व्हाऊचर इ.

प्रमुख बाबींचा तपशीलवार

सुरक्षित ठेवण्याचा कालावधी

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या विषयसुचीप्रमाणे असणारे सर्व विषय

प्रत्येक माहिती अधिकाऱ्याकडे सोपविलेल्या कामकाजानुसार त्यांच्या विषयाशी संबंधित नस्त्या, नोंदपुस्तके, मस्टर, व्हाऊचर या स्वरुपात ठेवण्यात येतात.

कलम 4(1)(ब) (v) नमुना  ( अ) मध्ये नमुद केलेल्या कामाशी संबंधित नियम/ अधिनियम पाणी पुरवठा स्वच्छता विभागाकडुन वेळोवेळी  वरिष्ठ स्तरावरुन घेतलेल्या  निर्णयाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही.

नस्तीच्या वर्गीकरणाच्या आदेशानुसार

वर्ग

वर्ग

वर्ग

वर्ग

यामध्ये दस्तऐवज विभागले जातात.

नागरीकांची सनद अनुसूची

अ.

क्र.

कार्यासनाचे नांव

विभागाकडून/ कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा

संबंधीत अधिकारी/ कर्मचारी

किती कालावधीत सेवा पुरविली जाईल

विहित कालावधीत सेवा पुरविली न गेल्यास कोणाकडे तक्रार करता येईल त्या अधिकाऱ्यांचे पदनाम

1

2

3

4

5

6

1

तांत्रिक शाखा-1

1) प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्ती

2) प्रोत्साहन अनुदान योजना

3) स्थानिक उपकर योजना

4) पाणीपटटी कर वसूल योजना

5) पा.पु.योजनांचे ऑटोमायझेशन व मिटरींग करणे.

6) अंगणवाडी पेयजल कार्यक्रम

श्री.एम.एल.पवार

शाखा अभियंता

वार्षिक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

2

तांत्रिक शाखा-3

1)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वार्षिक आराखडा तयार करणे

2) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लोकसहभागाअंतर्गत येणारी भिवंडी,  शहापूर,  येथील पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव व अंदाजपत्रक तपासणे व मंजूरीसाठी सादर करणे तसेच देयके तपासणे व मंजूरीसाठी सादर करणे

3) भिवंडी, , शहापूर तालुक्यातील ठकरबाप्पा, आमदार व खासदार निधी , दलित वस्ती, प्राथमिक आरोग्य क्रेंद्र इ. लेखाशिर्षांतर्गत कामांची अंदाजपत्रके तपासणे, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे तसेच सदर कामांची देयके तपासून सादर  करणे.

4) जलयुक्त शिवार अभियान अंमलबजावणी.

श्री.के.बी.चिवरे

शाखा अभियंता

१)वार्षिक

२)7 दिवस

३)7 दिवस

४)वार्षिक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

3

तांत्रिक शाखा-5

1)राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत वार्षिक आराखडा तयार करणे

2) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लोकसहभागाअंतर्गत येणारी कल्याण, अंबरनाथ, मुरबाड , येथील पाणी पुरवठा योजनांची प्रस्ताव व अंदाजपत्रके तपासणे व मंजुरीसाठी सादर करणे .

3) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड  तालुक्यातील ठकरबाप्पा, आमदार व खासदार निधी, दलित वस्ती, प्राथमिक आरोग्य क्रेंद्र इ. लेखाशिर्षांतर्गत कामांची अंदाजपत्रके तपासणे, तांत्रिक मान्यतेसाठी सादर करणे तसेच सदर कामांची देयके तपासून सादर  करणे

4) पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे तसेच पाणी टंचाई कृती आराखडा ऑनलाईन करणे या कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा विशेष दुरुस्तीचे अंदाजपत्रक तपासणे त्यास तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन घेणे. टंचाई कालावधीत टंचाईचे साप्ताहिक व पाक्षिक अहवाल सर्व वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

श्री.यु.जे.फुलारे

कनिष्ठ अभियंता

१)वार्षिक

२)7 दिवस

३)7 दिवस

४) 7 दिवस

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

4

लेखा

1)उपविभाग भिवंडी,   योजनांची देयके तपासून अर्थ विभागात पाठविणे व देयके तयार करणे .

2) मुदतीचे प्रस्ताव सादर करणे व टंचाई, आमदार, खासदार निधी विषयक काळ्या यादीत टाकणेचे प्रस्ताव सादर करणे.

3) अपूर्ण कामाच्या फाईलवर पत्रव्यवहार करणे.

4) पाणी पुरवठा विभागाकडील सुरक्षा अनामत देयके अदा करणे.

5)अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतनांचे धनादेश बँकेत जमा करणे.

6)योजनांच्या कपातीच्या धनादेशाची चलने भरणे.

7)कॅशबुक लिहिणे.

श्री.एल.यु.रामटेके

वरिष्ठ सहा. (लेखा)

7 दिवस

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

5

निविदा

1)ई निविदा विषयक कामकाज पहाणे व सर्व अनुषंगिक बाबींची पुर्तता करणे.

श्री.एम.एम.वाळंज

आरेखक

विहीत मुदतीत

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

6

बजेट

1)विभाग व उपविभाग अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील योजनांची देयके तपासून अर्थ विभागात पाठविणे व देयके अंतिम मंजूर करुन घेणे.

२)शासकिय योजनांची तरतुद व खर्चाचा ताळमेळ घेणे.

३)विभागाचे व  तालुक्यातील स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती महालेखाकार, भारअधिभार प्रकरणे निकाली काढणे. तसेच संबंधीत तालुक्यातील स्थानिक निधी लेखा, पंचायत राज समिती, महालेखाकार, मंबई भार अधिभार मुद्दांची पूर्तता करून परिच्छेद निकाली काढणे.

4)विनियोजन लेखे, उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा अहवाल सादर करणे.

5)रोख अनुदान कोषागारातुन अहारीत करणेचा प्रस्ताव व देयक तयार करणे.

6)वेतन व इतर भत्ते तसेच टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत मधील अनुदानाचे तालुकास्तरावर वित्तप्रेषण रक्कम वाटप करणे.

7)देखभाल व दुरूस्ती (Water Fund)  खर्चाचा ताळमेळ घेणे व वित्तप्रेषण वाटप करणे.

8) जिल्हा परिषद बजेट तयार करणे व शासनास बजेट सादर करणे.

श्री.बी.एम.बरकडे

वरिष्ठ सहाय्यक

1 ते 3 दरमहा

4)वार्षिक

5 ते 7 दरमहा

8)दरमहा

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

7

आस्था-1

1) तांत्रिक संवर्गांची अनधिकृत गैरहजेरी प्रकरणे, निलंबन व विभागीय चौकशी प्रकरणे

 2)न्यायालयीन प्रकरणे पाठपुरावा करणे.

3) कोर्टकेस प्रकरणी वकील नियुक्ती करणे व वकील फी अदा करणे.

4)वर्ग1 व वर्ग2 ची आस्थापना, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे / रजा रोखीकरण / गट विमा प्रकरणे व भ.नि.नि.प्रकरणे

6) अंतिम भ.नि.नि.रक्कम अदा करणेचे प्रस्ताव.

श्रीम.पी.पी.आठवले

वरिष्ठ सहाय्यक

1)45 दिवस व काही प्रकरणी त्याहून अधिक

2)वेळोवेळी

3)विहीत मुदतीत

4)वेळोवेळी

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

8

आस्था-2

1)तांत्रिक संवर्ग  वर्ग -3   ची आस्थापना विषयक बाबी.(जादा वय क्षमापन/ अपंगाना उपकरणे पुरविणे/रजा मंजुरी प्रस्तावइ.)

2)बिंदु नामावली नोंदवही अद्यावत ठेवणे व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविणे. कंत्राटी स्वरुपात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भरती प्रक्रिया राबविणे.

3)तांत्रिक संवर्गातील कर्मचा-यांची जेष्ठता यादी

5) कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल अद्यावत करणे

6)त्रिस्तरीय योजनेवरील रोजंदारी कर्मचा-यांना नियमित आस्थापनेवर आणणे.

श्रीम.पी.व्ही.नादकर

वरिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

9

आस्था-3

1)ग्रा.पा.पु.विभागातील वर्ग-3 व  वर्ग-4 कर्मचाऱ्यांची आस्थापना

2)अनुसुचित जमाती कल्याण समितीस माहिती पुरविणे व अनुपालन सादर करणे.

        व अन्य अनुषंगिक बाबी

श्रीम.एस.व्ही.सावंत

वरिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

10

भाडांर

1)देखभाल व दुरुस्ती कक्षातील आस्थापना विषयक कामे.

2)प्रादेशिक न.पा.पु कर्मचारी आस्थापना विषयक कामे.

3) पाणी पट्टी वसुली संबंधी कामकाज

4)  जडसंग्रह नोंदवही (स्थावर जंगम मालमत्ता)

5)  संगणक खरेदी मागणी व दुरूस्ती

6)  टि.सी.एल व ॲलम खरेदी व वाटप

7) दलित वस्ती सुधार योजना

8)देखभाल दुरुस्ती कक्षकडील लेखा परिक्षण विषयक कामांची आक्षेप पुर्तता करुन अहवाल सादर करणे.

श्री.एस.टी.घोलप

कनिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

11

वेतन

1) मुख्यालयातील वर्ग-2 वर्ग -3 व वर्ग -4 कर्मचा-यांची  सेवार्थ वेतनविषयक सर्व बाबी.

 2) कंत्राटी पध्दतीवर भरण्यांत आलेल्या कर्मचा-यांचे वेतन देयके करणे.

3) विदयुत देयके व टेलिफोन देयके.

4) गट विमा योजना प्रकरणे

5)राजपत्रित व सर्व कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ता देयके सादर करणे

श्रीम.ए.एस.पार्टे

कनिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

12

प्रशासन

1) जलव्यवस्थापन समिती सभा व अन्य समिती सभांचे कामकाज करणे.

2)सर्व मासिक समन्वय सभा, जि.प.मधील विषय समित्यांच्या सभा  व ठराव यांचे कामकाज पहाणे व माहितीचे संकलन करणे.

3)वार्षिक  प्रशासन अहवाल तयार करणे.

4)मा.आयुक्त, कोकण भवन यांचेकडील तपासणी मुददे , रजिस्टर ठेवणे व पूर्तता करणे.

5)कामकाजाचा मूल्यमापन अहवाल, माहितीचा अधिकार अहवाल व शासनाने विहित केलेले अहवाल पाठविणे व अदयावत नस्ती व बांधिव नोंदवही ठेवणे.

6)माहिती अधिकारातील अर्ज व अपिल निकाली काढणे.

 7)यशवंत पंचायत राज अभियान वार्षिक अहवाल तयार करणे.

8)पंचायत राज समिती बाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.

9)लोकशाही दिन व जनता दरबार.

10)का.अ.यांची दैनंदिनी तयार करणे. तसेच उपअभियंता दैनंदिनी व संभाव्य    फिरती कार्यक्रमास मंजुरी देणे.

11) वाहनांची डिझेल देयक तयार करणे तसेच वाहनासंबंधी पत्रव्यवहार ,देयके तयार करणे.

12)अभिलेख याद्या अद्यावत करुन आय.एस.ओ संदर्भात नियोजनबद्ध कार्यवाही करणे.

श्रीम.जे.आर.ठाकरे

कनिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

नोंदणी शाखा

1) आवक जावक टपाल नोंदणी व वाटप.

2) सर्व प्रकारच्या संदर्भ नोंदवहया ठेवणे.

3) पोस्टेज स्टँपचा हिशोब अ व ब नोंदवहीत अद्यावत ठेवणे.

4) कार्यविवरण व प्रकरण नोंदवहीचा गोषवारा संकलन.

5) लेखन साहीत्य व सामुग्री आणणे व वाटप करणे.

श्री.व्ही.धुमाळ

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

  कनिष्ठ सहाय्यक

पी.बी-5 यांचे सहाय्यक

1)पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यास मदत करणे.

2)पाणी टंचाई साप्ताहीक,मासिक अहवाल वरीष्ठ कार्यालयास सादर करणे.

3) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, तालुक्यातील न.पा.पु.यो. फाईल अद्यावत ठेवणे.

 4) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड , तालुक्यातील विहिरींच्या फाईल अद्यावत ठेवणे.

5) कल्याण, अंबरनाथ, मुरबाड,शहापूर या तालुक्यातील 10%, 5% लोकसहभाग देयके , आमदार, खासदार, ठक्करबाप्पा, टंचाई, देखभाल दुरुस्ती  देयके करुन ती  सादर करणे.

श्री.एस.टी.घोलप

कनिष्ठ सहाय्यक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

       आरेखक      

 (पी.बी-3 शाखेस सहाय्यक

1) शहापूर, भिवंडी, तालुक्यातील 5% व 10% न.पा.पु.यो. फाईल अद्यावत ठेवणे.

2) शहापूर, भिवंडी, तालुक्यातील 5% व 10% विहिरींच्या फाईल अद्यावत ठेवणे.

श्री.एम.एम.वाळंज

आरेखक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

    सहा.आवेदक(यां.)

1)विदयुत पंप व हातपंप दुरुस्ती, वसुली, वापरलेले साहित्य यादी, माहिती संकलित करणे.

3)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम-शहापूर मुरबाड

5)TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

6)NRDWP , मानव विकास कार्यक्रम

8)गाडया दुरुस्ती प्रस्ताव व दाखले

9) शाळा,आरोग्य केंद्र ,दवाखाना,अंगणवाडी व इतर सरकारी संस्था ,विं.वि,विदयुत पंप दुरुस्ती व खोदाई.

श्री.के.पी.खलाणे

सहा.आवेदक

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

यांत्रिकी

1)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम-पालघर,तलासरी,मोखाडा,वसई

2) TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

3)NRDWP-कल्याण ,अंबरनाथ

4) मानव विकास कार्यक्रम-शहापूर मुरबाड

5) गाडया दुरुस्ती प्रस्ताव व दाखले (जि.प.पालघर)

6) फ्लशिंग-तालुका कल्याण,अंबरनाथ,

श्री.व्ही.के.अधिकारी

यांत्रिकी

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

रिगमन

1)टंचाई व हंडामुक्ती कार्यक्रम

3) TSP ,आमदार-खासदार निधी अंतर्गत कामे (टंचाई प्रमाणे तालुके)

4)NRDWP- मूरबाड, शहापूर,

5) मानव विकास कार्यक्रम

6) हातपंप साहित्य खरेदी /वितरण करणेकामी शाखा अभियंता यांना मदत करणे.

7) फ्लशिंग - तालूका शहापूर, मुरबाड

श्री.पी.पी.कन्नलू

रिंगमन

कार्यकारी अभियंता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

जिल्हा परिषद ठाणे

अंदाजपत्रक

अ.क्र.

अंदाजपत्रकीय शीर्षाचे वर्णन

अनुदान

नियोजन वापर(क्षेत्र कामाचा तपशिल)

अधिक अनुदान

अपेक्षित असल्यास रुपयात

अभिप्राय

1

बिगर आदिवासी योजना

ठाणे जिल्हयातील बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 10% लोकसहभागातून मागणी आधारीतपुरवठा तत्वानुसार योजना घेवून राबविल्या जातात

अतिरिक्त अनुदानाच्या मागणीचा आराखडा नियोजन विभागास सादर

शासनाकडील शासन निर्णय परिपत्रके मार्गदर्शक सुचनेनुसार कामे घेतली जातात

अ) नळ पाणीपुरवठा येाजना       (2215 12581)

981.30

ब) साधी विहीर (2215 6999)

0.00

क) नलीका विहीर (2215 7001)

0.00

2

आदिवासी उपयोजना

ठाणे जिल्हयातील बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 5% लोकसहभागातून मागणी आधारीतपुरवठा तत्वानुसार योजना घेवून राबविल्या जातात

-----

----

अ)नपापूयो  (2215 0562)

461.57

ब)साधी विहीर (2215 2204)

27.26

क) जी.एस.डी.ए.ची नलिका विहीर  खोदण्याचा कार्यक्रम               (2215 2213)

17.02

ड)हातपंप विदयुतपंप देखभाल दुरुस्ती उच्च क्षमतेच्या विंधन विहीरीवर विजपंप बसविणे

153.00

3

विशेष घटक येाजना

ठाणे जिल्हयातील बिगर आदिवासी क्षेत्रासाठी 5% लोकसहभागातून मागणी आधारीतपुरवठा तत्वानुसार योजना घेवून राबविल्या जातात

-----

----

अ)नपापुयो (2215 1324)

0.00

ब)साधी विहीर(2215 1315 )

0.00

क)नलिका विहीर (2215 1306)

0.00

झालेल्या सभांचे इतिवृत्त

अर्ज नमुने

महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक

अक्र

विभागाचे नांव

दुरध्वनी क्रमांक

फॅक्स क्रमांक

1

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे

022-25431280

 --

आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी

यशोगाथा

 1. सन 2019-20 मध्ये मागील २ वर्षामध्ये टॅंकरग्रस्त असलेले मुरबाड व शहापूर तालुक्यातील 28 गाव /पाडे टॅंकरमुक्त करण्यात आले आहेत.

तालुका

टॅंकरमुक्त गाव/पाडे

मुरबाड

आसोळे खांद्याचीवाडी, करचॊंडे केवारवाडी, करचोंडे बोरवाडी, कान्हार्ले कातकरीवाडी, कोचरे खु., तुळई, कळंभाड मु., पाटगाव, पाटगाव पादीरवाडी, पेंढरी उंबरवाडी, थितबी, वाल्हीवरे कुंभाळे, साकुर्ली ठाकुरवाडी

शहापूर

अघई पेंढरी, अजनुप वरचा गायधरा, अजनुप बोंडारपाडा, आवरे काटीचापाडा, आवरे पुणधे, आवरे, कसारा खु. ओहळाचीवाडी, कोठारे जळकेवाडी, दळखण वैतागवाडी, धामणी भुईशेतपाडा, वरस्कोळ आंबाडा, वरस्कोळ दुधर, शिरोळ आंब्याचापाडा, शिरोळ पेठ्याचापाडा, शिरोळ चाफ्याचापाडा

 1. खर्डी पुरक नळ पाणी पुरवठा योजना -

                        अस्तित्वातील सन 1990 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेमधून 6 गावे व 10 पाड्यांना पाणी पुरवठा करण्यात येत होता. योजनेतील A.C. पाईपलाईनची वारंवार तुटफुट होत असल्याने सदर गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत होती.

             त्यासाठी तात्पुरती पुरक योजना घेण्यात आली. त्यामध्ये भातसा धरणातील पाण्यामध्ये फ्लोटींग पंप टाकून नवीन डी.आय.पाईपलाईन घेण्यात आली. यामुळे जुन्या योजनेचे बळकटीकरण झाले असून, सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा होत आहे. याचा फायदा 10,000 एवढ्या लोकसंख्येस झाला आहे. सदर योजनेमुळे खर्डी गावातील महिलांची लोकल मधून कसारा येथे जिवघेणा प्रवास करुन पाणी आणण्याची ससेहोलपट बंद झाली. गावातील जे कुटूंब पाणी अभावी गाव सोडून गेले होते त्यातील जवळपास 70% कुटूंबे गावात परत आले आहेत.  गावाच्या परिसरात अनेक गृहप्रकल्प उभारले जात आहेत. गावातील कुटँब संख्या वाढत सल्याने गावातील छोट्या मोठ्या दुकानदारांच्या उत्पादनात वाढ होत आहे.

सदर योजनेपूर्वी साधारण 450 नळ जोडण्या गावात होत्या. त्या आता 759  झालेल्या आहेत. उर्वरीत 179 कुटूंबांना जलजिवन मिशन अंतर्गत मार्च 2021 पर्यंत जोडण्या देऊन गाव 100% नळ जोडण्या असलेले गांव होणार आहे. तसेच खर्डी पुरक नळ पाणी पुरवठा योजनेमुळे फक्त खर्डी ग्रामपंचायतीचा प्रश्न सुटलेला नसुन खर्डी लगतील उंबरखाड ग्रामपंचायत अंतर्गत चांदे गावातील ग्रामस्थांनी सदरच्या योजनेचे उध:रण वाहीनी चांदे गावाच्या हद्दीतून जात असल्याने ग्रामस्थांनी ही योजना पुर्ण होणेस विशेष सहकार्य केले. त्यामुळे तेथील 50 कुटूंबांपैकी 39 कुटूंबांना पाणी पुरवठा करणेत येत आहे. त्यामुळे खर्डी व उंबरखांड या दोन्ही ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांच्या सहकार्याने सलोखा निर्माण झाला आहे.

 1. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव-पाड्यांसाठी, कायम स्वरुपी टंचाईवर मात करण्यासाठीची गुरुत्वाकर्षणावर आधारीत नळ पाणी पुरवठा योजनेचा आराखडा शासनास सादर.

समाविष्ट गाव/पाडे -                        97 गावे व 259 पाडे

उद्भव -                                            नाशिक जिल्ह्यातील भावली धरण

2051 च्या प्रकल्पित लोकसंख्या -     2,59,908

पाण्याची मागणी -                            12.70 द.ल.घ.मी. प्रतीवर्ष

मंजुर किंमत-                                   276.21 कोटी

सद्यस्थिती -                                     योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

व पाटबंधारे विभागामार्फ़त पाणी आरक्षण प्राप्त झाले आहे. सद्य सदर

योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र जीवन प्राधिरणामार्फत करण्यात येत

आहे.                

छायाचित्र दालन