महाराष्ट्र ग्रामिण रोजगार हमी योजना
प्रस्तावना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणा-या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. सन 2005 मध्ये केंद्र शासनाने संपुर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा लागु केला. (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा- विद्यमान नाव) ठाणे जिल्हयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2007 पासुन झाली.
महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी १९७७ पासून महाराष्ट्रात सुरू झाली. राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ नुसार दोन योजना सुरू होत्या.
१. ग्रामीण भागात अकुशल व्यक्तींकरिता रोजगार हमी योजना व
२. योजना. महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ कलम १२ (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या
सदर योजनांना राज्य शासनाच्या निधीतून अर्थसहाय्य केले जात होते.
२. सन २००५ मध्ये केंद्र शासनाने संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (विद्यमान नाव - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) लागू केला. तसेच केंद्र शासनाने ज्या राज्यांनी पूर्वीपासून रोजगार हमी अधिनियम मंजूर केला होता, अशा राज्यांना केंद्र शासनाच्या अधिनियमातील कलम २८ अन्वये त्यांचा कायदा राबविण्याची मुभा दिली होती. तद्नुसार महाराष्ट्र शासनाने सन २००६ मध्ये पूर्वीचा कायदा ठेवण्याचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, विधानमंडळाने केंद्रीय कायद्यास अनुसरून राज्यास निधी मिळवण्याच्या अनुषंगाने १९७७ च्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा केल्या, त्यामुळे योजना राबविण्याच्या कार्यपद्धतीत बदल झाला आहे.
३. सद्यःस्थितीत राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट २०१४ पर्यंत सुधारित) अंमलात आहे व या कायद्यांतर्गत खालील दोन योजना सुरू आहेत.
(अ) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र (MGNREGS) या योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रति कुटुंब रोजगाराची हमी देते व १०० दिवस प्रति कुटुंब मजुरीच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रति कुटुंब १०० दिवसावरील प्रत्येक मजुराच्या, मजुरीच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते.
(ब) महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ सुधारीत कलम (१२) (ई) नुसार वैयक्तिक लाभाच्या योजना अनुदान तत्त्वावर प्रतिपूर्ती योजना म्हणून राबविण्यात येतात.
उदा.: १) जवाहर / धडक सिंचन विहिर योजना.
२) रोहयोतंर्गत फळबाग लागवड योजना.
याशिवाय राज्य शासनाचा निधी पुढील बाबींकरिता वापरला जातो.
१) राज्य रोजगार हमी योजनेतील प्रगतीपथावरील अपूर्ण (कुशल) कामे पूर्ण करण्याकरिताः
२) राज्य रोजगार हमी योजनेंतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला देण्याकरिता.
विभागाची संरचना
कार्यालयीन कामकाजाची वेळ
कार्यालयीन कामकाजाची वेळ – सकाळी ९.४५ ते ६.१५
सर्व शनिवार , रविवार व शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्टया सोडून
विभागाचे ध्येय
“प्रत्येक हाताला काम व प्रत्येक हाताला दाम”
“पाहिजे ते काम“ प्रत्येक कुटूंबाला लखपती बनविणे. ग्रामीण भागातील जनतेसाठी रोजगार उपलब्ध करुन देऊन त्यांचे दारिद्रय काही प्रमाणात कमी करणे. अकुशल अंग मेहनतीचे काम करु इच्छिनाऱ्या लोकांसाठी एका आर्थिक वर्षात 100 दिवस काम उपलब्ध करुन देण्याची हमी नरेगा कायदा देतो.
विभागाची कार्यपध्दती
ग्रामिण भागाचे सुयोग्य विकासाचे धोरण आखून उपलब्ध मानवी संपत्तीव्दारा ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात राहणा-या व अंग मेहनतीची अकुशल कामे करणा-या मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील कुटुंबाला 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कार्य या योजनेव्दारे म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगारहमी योजना केले जाते. सदर योजनेतंर्गत खालील कामे करण्यात येतात.
-
जलसंधारण व जलसंवर्धन कामे.
-
दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरणासहित), जलसिंचन कालव्याची कामे.
-
अनुसूचित जाती / जमाती, नवीन भुधारक किंवा इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करण्याची कामे.
-
पारंपारिक पाणी साठयाचे योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील गाळ काढणे.
-
भूविकास कामे, पूरनियंत्रण व पूर संरक्षक कामे.
-
ग्रामीण भागात बारमाही जोड रस्त्याची कामे.
विविध स्तरावरील कर्तव्य्
1.ग्रामपंचायत स्तरः-
-
कुटुंबांची /मजुरांची नोंदणी करणे/जॉबकार्डवरील नोंदी करणे
-
मजुरांची कामाची मागणी घेणे/कामे पुरविणे
-
कामाचे सर्वेक्षण करणे/अंदाजपत्रक करणे
-
कामाचे नियोजन करणे
-
मजुरांना मजुरी व कामासाठी निधी उपलब्ध करुन देणे
-
वेळेवर मजुरी वाटप करणे
-
सामाजिक अंकेशन
2. तालुका स्तर
-
ग्रामपंचायतींना कामाच्या नियोजनाबद्दल मार्गदर्शन करणे
-
कामाचे नियोजन करुन घेणे
-
हजेरीपट व निधीचा हिशोब ठेवणे
-
तालुक्याची माहिती संगणक प्रणालीचा वापर करुन संकलित करुन जिल्हा स्तरावर पाठविणे
-
संगणक प्रणालीद्वारे झालेल्या कामांचे हजेरीपट ऑनलाईन करणे
3. जिल्हा स्तर
-
निधींचा हिशोब ठेवणे
-
केंद्र राज्य शासनाकडे आवश्यक ती माहिती पाठविणे
-
कामाचे सनियंत्रण करणे.
वार्षिक कामाचा आराखडा तयार करणे
ग्रामसभेत कामांची निवड करणे आवश्यक आहे ज्याकरीता गावात शिवार फेरी घेऊन उपलब्ध् नैसगीक स्त्रोत ठरवून त्याअनुषांगाने कामांची निवड केली जाते. ग्रामसभेने ठरवलेल्या कामांची यादी तयार करून त्याबाबत 15 ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेत चर्चा करून 2 ऑक्टोबर रोजीच्या ग्रामसभेत कामांना ठरावाव्दारे मान्यता घेण्यात येते. लाभार्थ्यांनी मागणी केल्याप्रमाणे सिंचन सुविधा, बांधावर वृक्ष लागवड, फळबाग लागवड, कृषीप्रधान तसेच गाव विकासाच्या दृष्टीकोनातून रस्ते, गाळ काढणे, गॅबीयन बांधारा, वृक्षलागवड इत्यादी प्रकारची साविजमनक कामे घेता येऊ शकतात.
-
ग्राम सभेची मान्यता घेतल्यानंतर कृती आराखडा सह कार्यक्रम अधिकारी तथा गट विकास अधिकारी यांचेकडे मान्यतेस्तव ग्रामपांचायत मार्फत सादर करण्यात येतो.
-
सर्व ग्राम पंचायत स्तरवरुन प्राप्त कृती आराखडयांना एकत्रित करुन पंचायत समितीची मान्यता घेऊन जिल्हा परिषदेच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात येतो.
-
मग्रारोहयो कक्ष जिल्हा परिषद सर्व तालुक्यांचा एकत्रीत कृती आराखडा मा. जिल्हा अध्यक्ष व मा. सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने सर्वसाधारण सभा / स्थायी समिती सभेत मान्यतेस्तव सादर करण्यात येते.
-
जिल्हा परिषदेमार्फत मान्य करण्यात आलेले कृती आराखडा व लेबर बजेट मा. आयुक्त, नरेगा नागपूर, यांचेकडे पाठवण्यात येतो.
माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार:-
कलम 4(1)(बी)(i)
कार्यालयाचे नाव
|
ग्रामपंचायत विभाग
|
पत्ता
|
३ रा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह इमारत,जिल्हा परिषद कंपाऊंड, तलावपाळी जवळ, स्टेशन रोड, ठाणे(पश्चिम) ४००६०१
|
कार्यालय प्रमुख
|
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत)
|
कार्यक्षेत्र
|
जिल्हास्तरावरील विभाग प्रमुख
तालुकास्तरावरील पंचायत समिती
जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये
|
विभागाचे ध्येय धोरण
|
प्रशासकीय तथा आस्थापना विषयक बाबी तसेच विविध कामांच्या विकास योजना
|
कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक
|
०२२-२५३४७२६८
|
कार्यालीन वेळ
|
सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
|
साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी
|
महीन्याचा प्रत्येक शनिवार व रविवार , तसेच शासकीय नियमानुसार इतर सार्वजनिक सुट्या
|
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजागर हमी योजना-महा. विभाग
|
.अ.क्र
|
अधिका-याचे नाव
|
पदनाम
|
भ्रमणध्वनी
|
१
|
श्री. अविनाश फडतरे
|
उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं)
|
9766927673
|
२
|
श्रीम. समिना शेख
|
गट विकास अधिकारी (नरेगा)
|
9422547860
|
अधिकारी/कर्मचारी यांचा वेतनाचा तपशिल
विषयाचे कार्यासननिहाय वाटप
विभागांतर्गत विविध समित्या
विभागामार्फत राबविण्यांत येणाऱ्या विविध योजनांची माहिती
विभागांतर्गत उपलब्ध दस्ताऐवजांची यादी (वर्गीकरण)
नागरीकांची सनद अनुसूची
अंदाजपत्रक
झालेल्या सभांचे इतिवृत्त
अर्ज नमुने
महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक व फॅक्स क्रमांक
आंतर जिल्हा बदलीने येणाऱ्या वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांची यादी
यशोगाथा
-
आहिल्यादेवी सिंचन विहीरीमुळे शेती समुध्दी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2019-20 मध्ये आवाळे, ग्रामपंचायत-आवाळे ता.शहापूर जि.ठाणे येथील अ.ज. जमातीचा लाभार्थी असुन श्री. राघो धर्मा दरोडा याने अहिल्याबाई सिंचन विहीर या योजनेचा लाभा घेतला आहे. त्यांच्या कुंटूंबात मी, पत्नी, 1 मुलगा व 2 सुना,1 नात मुले असे एकूण 6 सदस्य आहेत. त्यांच्याकडे उपजिविकेचे दुसरे साधन नसल्याने त्यांचे कुटूंब संपुर्ण शेतीवर अवलंबुन असुन सिंचनाची सोय नसल्यामुळे त्यांना शेतीत कोणतेही दुबार पिक घेता येत नव्हते. परंतु सन 2019-20 मध्ये त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रेाजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत विभागाकडून अहिल्यादेवी सिंचन विहीर मंजुर करण्यात आली.
सदर विहीरीचे काम पुर्ण केले असून त्यासाठी 2,63,200/- रुपये अनुदान मिळाले आहे. सदर विहीरीच्या माध्यमातुन त्यांना मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे त्यांना मोठया प्रमाणावर फायदा झालेला आहे. त्यांच्यामते या योजनेमुळे त्यांच्या कुटूंबाचे भाग्य उजळलेले आहे जेणेकरुन रोजगार हमी योजनेने मला जिवन जगण्याचे वेगळे सामर्थ्य निर्माण करुन दिलेले आहे. यापुर्वी फक्त खरीप अंतर्गत भात शेतीचे पिक घेत असल्याने उत्पादन कमी मिळायचे परंतु मोठया प्रमाणावर पाणी उपलब्ध झाल्याने मी आता उन्हाळी पिकासोबत आंबा लागवड, भाजीपाला व भेंडी लागवड इ. अशी विविध प्रकारची पिके घेत आहे. सदर योजनेमुळे मोठया उत्पादानात मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे माझी व माझ्या कुटूंबाची आर्थिक उन्नती व प्रगती होण्यास मदत झालेली आहे. जेणेकरुन या योजनेने माझ्या कुटूंबाला मोठया प्रमाणावर उत्पन्न मिळवून देण्याची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यामुळे त्यांना मजुरीसाठी शहरात जाण्याची गरज नाही व संपुर्ण कुटूंब शेतीत राबून मोठया प्रमाणात उत्पन्न घेत आहे.
यशोगाथा
-
सिंचन विहीर
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायत चवरे म्हसरुंडी येथील लाभार्थी श्री. शिवाजी भाऊ शेलार याने सन 2015-16 मध्ये पंचायत समिती कल्याण या कार्यालयांकडून सिंचन विहीरीचा लाभ देण्यात आलेला होता. सदर लाभार्थी याने सिंचन विहिरीचे काम पुर्ण केलेले आहे. सदर लाभार्थी सिंचन विहिरीचा लाभ मिळण्यापुर्वी स्वत:च्या शेतीमध्ये पावसाळयात भात शेती करत असून इतर हंगामात पाण्याअभावी कोणतेही पिक घेऊ शकत नसे व सोजगारासाठी त्याला इतर ठिकाणी जावे लागत होते. सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आल्याने त्याला बारमाही पाण्याची सोय झालेली असून भात हंगामानंतर लाभार्थ्याने भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली त्यामुळे त्याला त्याच्या शेतात कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध झालेला आहे व भाजीपाला विक्रीपासून त्याला प्रतिवर्षी रक्कम रुपये 75,000/- निव्वळ नफा मिळत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मिळालेल्या सिंचन विहिरीमुळे त्याला कायमस्वरुपी रोजगार व त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे राहणीमानात सुधारणा झाली आहे असे लाथार्थी याने सांगितले आहे.