बंद

    परिचय

    भौगोलीक स्थान व विस्तार-

    ठाणे हा महाराष्ट्र राज्याच्या वायव्येस हा जिल्हा वसलेला असून या जिल्हयाच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, तर दक्षिणेस रायगड जिल्हा व उत्तरेस पालघर जिल्हा आहे. संहयाद्री पर्वतरांगांनी या जिल्हयाची पुर्व व इशान्य सीमा सीमित केली असून या रांगांच्या पलीकडे अनुक्रमे अहमदनगर व नाशिक जिल्हे आहेत.ठाणे जिल्हयाचे भौगोलीक क्षेत्रफळ 409186 हेक्टर असुन मुंबई जवळचा औद्योगिकद्रुष्टया पुढारलेला जिल्हा असुन सरासरी क्षेत्र 65909 हेक्टर लागवडीखालील आहे.

    हवामान व पर्जन्य-

    जिल्हयाचे हवामान उष्ण व दमट असुन जिल्हयाच्या किनारी भागात आद्रतेचे प्रमाण अधिक; तर अंतर्गत भागात आद्रतेचे प्रमाण कमी आढळते. जिल्हयाचे वार्षिक तापमान साधारणत: 23® से. ते 31® से. इतके आढाळते. सरासरी पाउस 250 सें.मी. इतका पडतो व त्याचे प्रमाण दक्षिणेकडुन उत्तरेकडे कमी होत जाते. जुन ,जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोंबर या पावसाळी हंगामात सरासरी अनुक्रमे 445.5मि.मि.,1003.6 मि.मि.,640.3 मि.मि.,323.2 मि.मि.,95.2 मि.मि. एवढा पाउस पडतो. सर्वसाधारणपणे 70 दिवस पाउस पडतो.

    नद्या व धरणे-

    ठाणे जिल्हयातील बहुतेक नद्या पश्चिमवाहिनी असुन त्या संहयाद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावतात. वैतरणा व उल्हास या नद्या जिल्यातील प्रमुख नद्या आहेत. नाशिक जिल्यातील त्रंबकेश्वर जवळ संहयाद्री पर्वतरांगात उगमपावणारी वैतरणा नदी जिल्यातुन पुर्व – पश्चिम अशी वाहत जाउन पालघर तालुक्यातील विरारच्या उत्तरेस अरबी समुद्रास मिळते. तिच्या मुखाशी दतिव-याची खाडी असुन तानसी ही तीची प्रमुख उपनदी आहे.
    तसेच बोरघाट जवळ डोंगरात उगम पावणा-या उल्हास या नदीचे साष्टी या बेटाजवळ एक ठाण्याच्या खाडीव्दारे अरबी समुद्रास मिळणारा असे दोन फाटे तयार होतात. बारवी, भातसई (भातसा) काळू व मुरबाडी या तीच्या उपनद्या आहेत. वैतरणनदीवर “मोडकसागर”व तानसा नदीवर शहापूर तालुक्यात “तानसा तलाव” असून उंची 41 मीटर व लांबी 2804 मीटर तसेच घनता 640 क्यु.से. आहे. याशिवाय शहापूर तालुक्यात भातसई नदीवर “भातसा” हा मोठा जलप्रकल्प उभारण्यात आला आहे.

    वने व मृदा-

    ठाणे जिल्हयातील डोंगराळ भागात वने असून मुख्यत्वेकरून शहापूर व मूरबाड तालुक्यात दाट वने आहेत. खैर, बांबू यांसारखे पानझडी वृक्ष आढळतात. चिंच, वड, कडूलिंब, आंबा, माड यांसारखे वृक्षही वनात आहेत. जिल्हयात आढाळणा-या गवताच्या जातींपैकी “मूशी” ही गवताची महत्वाची जात होय. शहापूर तालुक्यातील तानसा येथील अभयारण्यात वाघ, सांबर, तरस, कोल्हा, रानडुक्कर यांसारखे प्राणी व विविध जातींचे पक्षी आढाळतात. जिल्यातील पुर्व भागात तांबडी रेताड मृदा, मध्य भागात तपकिरी व काळसर मृदा; तर किनारी भागात वाळूमिश्रित मृदा आढाळते.

    शेती पिकपध्दती व मत्स्यव्यवसाय-

    डोंगराळ भू-रचणेमुळे लागवडीखालील क्षेत्राचे प्रमाण एकूण भौगोलीक क्षेत्राच्या एक तृतीयांशाहुनही खूपच कमी आहे. भात, वरी व नाचणी ही जिल्यातील महत्वाची पिके असून या पिकांसोबत फळे व भाजीपाला यांचेही उत्पादन घेतले जाते. किनारी भागात मत्स्यव्यवसाय केला जात असून उत्तण हे बंदर मासेमारीकरीता प्रसिद्ध आहे. यात पापलेट, सुरमई, बॉम्बे-डक आदी माशांची पकड मोठया प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार ठाणे जिल्हा परिषदेची पहिली लोकनियुक्त परिषद (निवडून आलेली संस्था) दि.12/08/1962 रोजी अस्तित्त्वात आली व दहावी लोक प्रतिनिधींची लोकनियुक्त परिषद दि.15/01/2018 पासून दि.14/01/2023 पर्यंत कार्यरत होती.

    ठाणे जिल्हा सर्वसाधारण माहिती-

    • एकुण तालुके :- 07
    • एकुण पंचायत समित्या:- 05
    • आदिवासी पंचायत समित्या :- 01 (शहापूर)
    • अंशत : आदिवासी पंचायत समित्या :-02
    • नागरी पंचायत समित्या -:02
    • एकुण ग्रामपंचायतींची संख्या :- 431
    • एकुण महसुली गावांची संख्या :- 814
    • पेसा ग्रामपंचायत संख्या :-204
    • लोकसंख्या (2011 जनगणना अस्थायी):- 80,58,930
    • जिल्हा परिषद गट:-53
    • जिल्हा परिषद कार्यकारीणी अस्तित्वात. :- दि.15/01/2018
    • जिल्हा परिषद सर्वसाधारण बॉडी-:01
    • विषय समित्या -: 10 (8 ते 15 सदस्य)
    • जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील कुटूंब संख्या :- 71,692
    • बेघर/कच्चे घर असलेल्या कुटूंबांची संख्या :- 37,280

    भौगोलिक स्थिती

    • दुर्गम डोंगरी -:शहापूर
    • सागरी -:ठाणे.
    • औदयोगिकदृष्टया -:भिवंडी,कल्याण,मुरबाड व अंबरनाथ
    • हवामान -:उष्ण व दमट
    • पर्जन्यमान -:3500 ते 2000 मि.मि. सरासरी.
    • नदी -: वैतरणा, उल्हास (पश्चिमवाहिन्या नदया), तानसा, भातसा, बारवी.
    • धरणे -: तानसा,भातसा,बारवी.

    कृषि विषयक माहिती

    • भौगोलिक क्षेत्र:- 409186हे.
    • जंगलव्याप्त क्षेत्र:- 146601हे. (36%)
    • शेतीस उपलब्ध नसलेले क्षेत्र
    • बिगर शेती क्षेत्र :- 88917 हे. (22%)
    • पडीत व लागवडी लायक नसलेले :- 84500 हे. (22%)
    • पडीत जमिन व्यतिरिक्त लागवड नझालेले क्षेत्र-:6329 हे. (1.54%)
    • पडीक क्षेत्र :- 8242हे.(2 %)
    • लागवडी खालील एकुण क्षेत्र -: 65909 हे.
    • लागवडीलायक एकुण क्षेत्र-: 170656 हे.

    जिल्हयातील प्रेक्षणिय स्थळे

    • पर्यटन स्थळे-: माहुली, आजापर्वत, वज्रेश्वरी,शितगड,गोरखगड, संगम, टाकीपठार
    • मंदिरे -: सोमनाथ मंदिर,टिटवाळा येथिल गणपती मंदिर.

    आरोग्य पायाभूत सुविधा

    • प्राथमिक आरोग्य केंद्र:-33
    • उपकेंद्र:- 180
    • पथक:- 05
    • जिल्हा परिषद दवाखाना:-02
    • आयुर्वेदिक दवाखाना:-01
    • पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-1 :-22
    • पशुवैदयकीय दवाखाना श्रेणी-2 :-42
    • एकात्मिक बालविकास सेवा केंद्र :-09
    • एकूण मुळ अंगणवाडी केंद्रे :-1351
    • एकुण मिनी अंगणवाडी केंद्रे :-295
    • जिल्हा ‍ परिषदेच्या प्राथमिक शाळा :-1328
    • जिल्हा परिषदेंतर्गत एकूण 14 विभाग कार्यरत असून वर्ग-1 चे130व वर्ग-2 चे 78 अधिकारी कार्यरत आहेत. वर्ग-3 चे 4594 आणि वर्ग-4 चे 295 असे एकूण 4889 कर्मचारी कार्यरत आहेत.