आनंद- तरंग दिनदर्शिका
पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषद शाळेमध्ये मध्ये शिक्षण घेत असलेल्या बालकांचा सर्वांगी विकास करणे. त्यांच्यामध्ये संकल्पनात्मक मानवी आणि घटनात्मक मूल्य विकसन करणे. तर्कशुद्ध निर्णय नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे. संवाद सहकार्य आणि लवचिकता निर्माण करून सुलभ शिक्षण आणि व्यवस्थापन करणे. आणि जिज्ञासा आधारित शिक्षण देणे. पंचायत समिती कल्याण, शिक्षण विभाग डॉ. रूपाली खोमणे मा. गटशिक्षणाधिकारी यांच्या संकल्पनेतून आनंद तरंग दिनदर्शिका तयार करण्यात आली. 1496 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.