बंद

    ‘क’ कवितेचा

    क कवितेचा

    प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही अंगभूत प्रतिभा असता. त्या शोधून त्या विकसित करण्यासाठी कवितांचे दालन या उपक्रमांतर्गत अंतर्गत बालसाहित्य निर्मिती हा एक अभिनव उपक्रम पंचायत समिती कल्याण शिक्षण विभागाच्या प्रेरणेने व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद शाळेतील कवितासंग्रह प्रकाशित केला आहे विद्यार्थ्यांची संवेदनशीलता जागृत होईल त्यांच्या मनातील भावना विचार कल्पना यांच्या अभिव्यक्तीला उत्तम संधी मिळावी त्यातूनच कळतं नकळत भाषेला समृद्ध करावी. क कवितेचा या विद्यार्थ्याच्या स्वरचित कविता संग्रहाच्या बाल साहित्यिक नाविन्यपूर्ण करावा. इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे नवी पिढी मराठी पासून दूर जात आहे. त्यामुळे नव्या जुन्या कवींची बालकविता संग्रह काढणे व मराठीशी आपली नाळ जोडण्याचा प्रयत्न करणे. भाषेतल्या शिक्षणात, मूल्यात्मक, ची वाढ केली पाहिजे. सर्वसामान्य घरातील मर्यादित संसाधन असणाऱ्या बालकांमधील सर्जनशीलतेचा शोध उद्याचे वाचक लेखक आणि कडवी कवी घडविणे या उद्देशाने अगदी लहान वयोगटात सुद्धा बालकाची सुजनक्षमता उच्च दर्जाची असू शकते याचा पुरावा या संग्रहातून मिळाला आहे. आई बाबा शाळा नातेवाईक सण मॅरेथॉन व्यवसाय कविता निश्चित समाधानाची व आनंदाची बाब ठरली आहे. ‘मला वाटते साखर व्हावे,तिच्यासारखे गोड रहावे. यावरून स्वाभाविक गोडवा मृदुता सामाजिक सहसंबंध आणि अर्थपूर्ण व सुसंवादात्मक संप्रेषण याबाबत खात्री पटते. त्यांच्या या मूलभूत प्रेरणांच्या पंखांना बळ यासाठी डॉक्टर रूपाली खोमणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कल्याण शिक्षण विभाग संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळा कल्याण मधील विद्यार्थ्यांनी स्वरचनेवर कवितांचे दालन या उपक्रमामध्ये क कवितेचे कविता संग्रह तयार करण्यात आला आहे.

    • लेखक : शिक्षण विभाग पंचायत समिती कल्याण
    • भाषा : मराठी
    • वर्ष : 2025