बंद

माता व बालक आरोग्य सेवा

  • तारीख : 22/04/2025 -

माता व बालक आरोग्य सेवा

अ) प्रसुतीपूर्व काळजी : सर्व गरोदर स्ञियांची नोंदणी (12 आठवडयांचे आत) गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी

  1. पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबर
  2. दुसरी तपासणी (12 आठवडेत)
  3. तिसरी तपासणी 4 ते 6 महिन्यांमध्ये (26 आठवडेत)
  4. चौथी तपासणी आठव्या महिन्यांमध्ये (32 आठवडेत)
  5. पाचवी तपासणी 9 व्या महिन्यामध्ये (36 आठवडेत)

ब) प्रसुतीदरम्यान सेवा : आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्ती करणे) स्वच्छतेच्या 5 नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे. तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.

क) प्रसुतीपश्चात सेवा : प्रसुतीपश्चात कमीत कमी 2 वेळा गृहभेटी देणे.

1) पहिली प्रसुतीनंतर 48 तासांच्या आत

2) दुसरी 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान मुल कमी वजनाचे असल्यास 48 तासांच्या आत

3) 7, 14, 21 व 28 दिवसात अशा पाच भेटी दयाव्यात.

लाभार्थी:

सर्व गरोदर स्ञियां

फायदे:

1. प्रसुतीदरम्यान सेवा 2.प्रसुतीपश्चात सेवा

अर्ज कसा करावा

वर नमूद केल्याप्रमाणे