सामान्यता: शिक्षण पध्दतीत निश्चेष्ट पध्द्तीने शिक्षण देण्यांत येत असल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर फार परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आंध्रप्रदेशातील ऋषिव्हॅली स्कुल, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये सुरु आहे. या राज्यांमध्ये सदर पध्दत यशस्वी झाल्याचे सिध्द झाल्याने महाराष्ट्र राज्यातील पुणे, अहमदनगर या जिल्हयांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यांत आली आहे. या सर्वांचा अनुभव विचारात घेऊन कृतियुक्त अध्ययन पध्दतीवर आधारित शिक्षण पध्दत प्रायोगिक तत्त्वावर ठाणे जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातून सर्व शाळांमध्ये 2015-2016 या आर्थिक वर्षापासून शिक्षण विभाग,(प्राथमिक) जि.प.ठाणे मार्फत राबविण्याचे निश्चित करण्यांत आले आहे.
कृतियुक्त अध्ययन पध्दतीसाठी (ABL) अभ्यास क्रमावर आधारित आवश्यक प्रशिक्षण साहित्य, साधने, सामुग्री, कार्डस्, इत्यादी तयार करणे, तसेच तयार केलेली सामुग्री, साधने, साहित्य, कार्डस् छापून प्रत्यक्षात शाळेपर्यंत पोहचविणे, शिक्षकांचे ABL साठीचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन घेणे व त्याकरीता प्रशिक्षणासाठीची आवश्यक पुस्तिका, कार्यपध्दती निर्माण करुन शिक्षकांना प्रोत्साहीत करणे. शाळांमध्ये ABL साठी आवश्यक त्या सुधारणा करुन घेणे, सर्व शाळांमध्ये किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी करणे, building as Learning Aids(BaLA) चा वापर करुन सजावट करणे आणि गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रोत्साहन म्हणून प्रत्येक शाळेला ABL पुरक साहित्य निर्मितीसाठी निधी उपलब्ध करणे, खरेदी करणे, शाळा दुरुस्ती करणे यासाठी अनुदान वितरीत करणे.