राज्यात पडणाऱ्या पावसाची अनियमितता, त्यामुळे सतत टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन त्याचा मोठा परिणाम कृषि क्षेत्रावर होत आहे. जिल्हयातील सिंचनाच्या मर्यादित सुविधांचा विचार करता, शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी जलसंधारण अंतर्गत उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासन निर्णय दिनांक 5 डिसेंबर 2014 नुसार जलयुक्त शिवार अभियान सुरु झाले आहे. या अभियानांतर्गत जिल्हयातील निवडलेल्या 26 गावांमध्ये जिल्हा परिषद ठाणेच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करणे.