कृषी उपयोगी साहित्य, साधने व उपकरणे यांचा जास्तीत जास्त वापर व्हावा व नव-नवीन अत्याधुनिक यांत्रिकीकरणाद्वारे शेती व्हावी याकरिता महिलांच्या ग्राम संघास औजार बँक उपलब्ध करून देणे: हरित यंत्रे

विभाग : कृषी विभाग
प्रस्तावना

पार्श्वभूमती:-

ठाणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 3,82,480 हेक्टर असुन मुंबईच्या जवळचा औद्योगिकदृष्टया पुढारलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहरीकरण झालेला जिल्हा असला तरी सर्व पिके मिळून एकूण लागवडी खालील क्षेत्र हे 77,644 हेक्टर एवढे आहे.

जिल्हयात एकूण 1,32,800 शेतकरी खातेदार आहेत. जिल्हयातील संपूर्ण शेतकरी खातेदारांची क्षेत्रधारणा पाहिली तर एकूण खातेदारांच्या 82 टक्के खातेदार (1,08,812) हे अल्प व अत्यल्प भुधारक (2 हेक्टरच्या आत )आहेत. म्हणजेच ठाणे जिल्हयात छोटे क्षेत्र असणा-या शेतक-यांची संख्या जास्त आहे.

पर्जन्यमान :-

ठाणे जिल्हयात सरासरी 2422.50 मि.मि.पाऊस पडतो.जुन,जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर व ऑक्टोबर या पावसाळी हंगामात सर्वसाधारणपणे अनुक्रमे 445.5 मि.मि., 1003.6 मि.मि., 640.3 मि.मि., 3232 मि.मि.95.2 मि.मि. एवढा पाऊस पडतो. या हंगामात सर्वसाधारणपणे 70 दिवस एकूण पाउुस पडतो.

जमीन व पिके :-

ठाणे जिल्हयात प्रामुख्याने चढ उताराची छोटया - छोटया खाचरांची जमिन आढळून येते. पुर्वेला सहयाद्री पर्वतांच्या रांगा तर पश्चिमेला समुद्र किनारा असल्याने समुद्र व खाडयांच्या किनारी क्षारयुक्त खारजमिन आढळून येते. तर पुर्व व मध्य भागात तपकिरी मध्यम काळी आम्लधर्मीय जमिन आढळून येते. या जमिनीची पाणीधारण क्षमता कमी असते. जमिनीच्या या वैशिष्टयामुळेच पावसाळयात जेवढया वेगाने पाऊस पडतो, तेवढयाच वेगाने पडलेल्या पावसाचे पाणी नदया नाल्यांमार्फत समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामात पाण्याचे दुर्भिक्ष्य भासते. जमिन व पावसाच्या या वैशिष्टयामुळेच ठाणे जिल्हयात एकच खरीप हंगाम घेतला जातो त्यामध्ये भात पिकाशिवाय अन्य पर्याय रहात नाही.

खरीप हंगामात जिल्हयाचे भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 60,717 हेक्टर असुन, त्याखालोखाल 3,677 हेक्टर क्षेत्रावर नागली हे पीक घेतले जाते. म्हणजेच खरीपातील एकूण पेरणीच्या 89 टक्के क्षेत्रावर भात पिक घेतले जाते.

भात पिकाची सरासरी उत्पादकता 2508 किलो/हेक्टर एवढी आहे. म्हणजेच जिल्हयात भात पिकाचे एकूण उत्पादन एवढे 152278 मे.टन होत असुन रुपये 1410 प्रति क्विंटल दरानुसार त्याची एकूण किंमत रक्कम रु. 214.71 कोटी एवढी होते.

मजूर व मजूरी :-

भात शेतीमध्ये सर्वात जास्त खर्च हा मजुरांवर होतो. भात लागवडीसाठी जमिन तयार करणे,चिखलणी, लावणी,काढणी,मळणी या प्रत्येक कामासाठी मोठया प्रमाणावर मजूर लागतात ते खालील प्रमाणे.

अ.क्र. कामाचे नाव प्रतिदिन प्रति हेक्टर मजूर व मजूरी संपुर्ण ठाणे जिल्हयात (60717 हेक्टर)
मजूर संख्या दर प्रति मजूर (र.रु) एकूण खर्च (र.रु) मजूर संख्या एकूण खर्च (कोटीत)
1 चिखलणी 05 350 1750 303585 10.62
2 भात लावणी 35 350 12250 2125095 74.37
3 भात कापणी 30 350 10500 1821510 63.75
4 भात मळणी 17 350 5950 1032189 35.80
  एकूण 87   30450 5282379 184.54

एक हेक्टर भात लागवडीसाठी पूर्ण कालावधीत एकूण 87 मजूर लागतात. र.रु. 350/- प्रति मजूर प्रतिदिन एवढी मजूरी दिली जाते, म्हणजेच एका हेक्टरसाठी फक्त मजूरीवर रक्कम रुपये 30,450/- एवढा मोठा खर्च होतो. म्हणजेच एकूण उत्पादन खर्चाच्या 90 टक्के खर्च हा फक्त या घटकावर होतो.

संपूर्ण जिल्हयाचा विचार केल्यास 60,717 हेक्टर भात शेतीसाठी र.रु.52.82 लाख मजूर लागत असुन त्याची एकत्रित मजूरी र.रु.184.52 कोटी एवढे होते. अर्थात बहुतांश शेतकरी स्वत:च्या घरातील माणसे मजूरीच्या कामासाठी वापरतात.

यांत्रिकीकरणाची गरज :-

भात शेती फायदयात आणावयाची झाल्यास मजूरीवरील खर्च कमी होणे आवश्यक आहे.भातशेतीसाठी जमिन तयार करणे,चिखलणी,लावणी,काढणी व मळणी या कामांना कालमर्यादा असते. ही कामे त्या-त्या वेळेत होणे आवश्यक असते. गावांमध्ये ही सर्व कामे एकाच वेळी सुरु होतात त्यामुळे मजूरांची मागणी एकाचवेळी वाढते. काम जास्त व मजूर कमी या व्यस्त प्रमाणामुळे ही कामे पूर्ण व्हायला उशीर होतो. ही कामे ठरलेल्या वेळेपेक्षा उशीरा झाल्यास त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम पडतो व उत्पादनात घट होते. त्यासाठी मजूरांची कामे शेतीच्या अत्याधुनिक अशा यंत्राने केल्यास खालील प्रमाणे फायदे होतात.

 1. यंत्रामुळे अत्यंत कमी मजूर लागतात.
 2. मजुरांच्या मजुरीवरील खर्च कमी होतो त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.
 3. कामांना वेळ कमी लागत असल्यामुळे गावातील सर्व शेतक-यांची कामे एकाच वेळी पूर्ण होतात.
 4. काम वेळेत व गुणवत्तापूर्ण झाल्यामुळे उत्पादनात वाढ होते.

या सर्व बाबींचा अभ्यासाअंती ठाणे जिल्हा परिषदेने सेस निधी योजनेतून “औजारे बँक” ही नाविन्यपूर्ण योजना सन 2015-16 या आर्थिक वर्षात हाती घेतलेली आहे.

जिल्हयात महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान, व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या महिला बचत गटांची संख्या मोठी आहे.

तालुका लोक संचलित साधन केंद्र(CMRC) ग्राम संघ (VO) महिला बचत गट समाविष्ट कुटुंब संख्या
शहापूर 2 83 1631 24465
भिवंडी 2 83 1775 26625
मुरबाड 1 38 243 3645
कल्याण _ 4 31 265
अंबरनाथ _ 2 19 285
एकूण 5 210 3699 55485

जिल्हयामध्ये एकूण 3699 एवढे बचतगट,210 ग्रामसंघ व 5 लोकसंचालित साधन केंद्र (CMRC) असुन त्यामध्ये एकूण 55485 कुटुंब समाविष्ट आहेत. ग्रामीण भागात या बचतगटांचे शिस्तबध्द जाळे सर्वदुर पसरलेले आहे. शेतीमध्ये बहुतांश महिला काम करतात. चिखलणी,लावणी,कापणी,मळणी,फवारणी,खुरपणी इत्यादी कामे महिला करतात. प्रत्यक्ष शेतावर काम करणा-या महिलांचे शारीरिक श्रम कमी व्हावे, मजुरांच्या वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्च कमी व्हावा तसेच शेतीची कामे वेळेत व वेगाने होणेच्या हेतूने नोंदणीकृत महिला बचत गटांच्या ग्राम संघांनाऔजारे बँक (Tool Bank ) या घटकाअंतर्गत औजारांचा संच अनुदानावर उपलब्ध करुन देण्यांत येत आहे. ही औजारे बचतगटांच्या ग्राम संघा कडून भाडेतत्वावर पुरविली जातील. बचतगटाअंतर्गत सदस्यांना नाममात्र दराने तर अन्य शेतक-यांना ठरवलेल्या दराने उपलब्ध करुन दिली जातील. त्याचप्रमाणे शेतक-यांच्या मागणीनुसार काही शुल्क आकारुन शेतीची कामे उदा.चिखलणी,लावणी,फवारणी, काढणी,मळणी इत्यादी कामे करुन दिली जातील. यातुन या महिला बचत गटांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण होणार आहे. यांत्रिकीकरणामुळे मजुरांच्या समस्येवर मात करणे शक्य होईल, वाढत्या मजूरीच्या दरामुळे उत्पादन खर्चात होणारी वाढ आटोक्यात येईल.शेतीची कामे वेगात व वेळेत पूर्ण झाल्याने कामाची गुणवत्ता चांगली राहील. औजारे बँकेमध्ये मिनी ट्रॅक्टर,पॉवर टिलर,भात रोवणी यंत्र,भात मळणी यंत्र,भात कापणी यंत्र,गवत कापणी यंत्र,कोनो विडर,पंपसंच,स्प्रेपंप,दातेरी विळे,प्लॅस्टिक क्रेट्स,तसेच कृषि विभागाने त्यांच्या विविध योजनांमध्ये नमुद केलेल्या अन्य औजारांचा समावेश आहे.

सदरची योजना प्रामुख्याने महिला बचत गट, महिला बचतगटांचे ग्रामसंघ, लोकसंचलित साधन केंद्र(CMRC) यांच्यासाठी असल्याने तालुका पातळीवरुन या योजनेची प्रसिध्दी करणेत यावी. पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान,महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी सर्व बचतगटांपर्यंत या योजनेच्या प्रचार होण्याची दक्षता घ्यावी.

 

 1. या योजनेतील घटकांचा लाभ घेण्यास इच्छुक असणा-या क्रियायाशिल बचतगट, ग्रामसंघ व लोक संचलित साध केंद्र यांना प्रस्ताव कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
 2. लाभार्थींनी प्रपत्र अ, ब, यासह आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीला सादर करावा.
 3. पंचायत समितीने दिलेल्या लक्षांकाप्रमाणे “प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य” या तत्वानुसार लाभर्थ्याचे प्रस्ताव स्विकारुन क्रमांकानुसार नोंदवहीत नोंद घ्यावी. प्रस्ताव परिपूर्ण व योग्य असल्याची खात्री करावी.
 4. गट विकास अधिकारी किंवा सहा.गट विकास अधिकारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक,महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान व जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी प्रस्तावातील लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी व “प्रपत्र क” मध्ये एकत्रित तपासणी अहवाल तयार करावा.
 5. पंचायत समितीने “प्रपत्र क” मधील तपासणी अहवालातील शिफारशी नुसार सदर प्रस्ताव योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सदरी प्रस्ताव कृषि विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा.
 6. कृषि विकास अधिकारी यांनी येणा-या प्रस्तावाची नोंदवहीत क्रमाने नोंद घ्यावी व प्रस्तावाची तपासणी करुन प्रस्ताव मंजूरीसाठी संबंधित विषय समितीकडे सादर करावा.
 7. संबंधित विषय समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तसे कळवावे.
 8. लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार मेक व मॉडेल निहाय औजारे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेकडून खरेदी करावीत. खरेदी केलेल्या औजारांची प्रत्यक्ष क्षेत्रिय तपासणी पंचायत समिती,महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी एकत्रित करुन अनुदान अदा करण्याची शिफारस जिल्हास्तरावर करावी.जिल्हास्तरावरुन लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे अनुदान अदा करावे.

  किंवा

 9. लाभार्थ्याने त्यांच्या पसंतीची औजारे एकत्रितरित्या मागणी करावी.कृषि विकास अधिकारी यांनी सर्व जिल्हयाची औजारांची मागणी एकत्रित करुन महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ या शासनाच्या यंत्रणेकडे नोंदवावी. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने सदरची औजारे स्वखर्चाने गट पातळीवर पोहोच करावी पंचायत समितीने सदर औजारांची तपासणी करुन साठा नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी व लाभार्थीला त्याचे वितरण करणे. तत्पूर्वी 10% लाभार्थी हिस्स्याची रक्कमेचा धनादेश (महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या.यांचे नावे असलेला ) ताब्यात घेऊन तो कृषि विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा. लाभार्थी हिस्सा व अनुदानाची रक्कम कृषि विकास अधिकारी यांनी महाराष्ट्र कृ‍‍षि उद्योग विकास महामंडळ यांना अदा करावी.

योजनेतील घटक :-

औजारे बँक ( Tool Bank ) स्थापन करणे.

खालील औजार किंवा कृषि विभागाने विविध योजनांमध्ये नमुद केलेली औजारे,बचत गटांनी त्यांच्या पसंतीनुसार निवड करावयाची आहेत.

अ.क्र. औजाराचे नाव
1 पॉवर टिलर / मिनी ट्रॅक्टर
2 भात रोवणी यंत्र (Paddy Transplanter)
3 भात मळणी यंत्र (मनुष्यचलित /यंत्राने)
4 भात कापणी यंत्र ( Power Repear )
5 गवत कापणी यंत्र (Brush Cutter)
6 कोनो विडर Cono Weeder
7 डिझेल पंपसंच
8 पेट्रोल स्टार्ट डिझेल रन पंपसंच
9 पिक संरक्षण औजारे
10 दातेरी विळे
11 ग्रेडींग ॲन्ड पॅकिंग मटेरियल
12 कृ‍‍षि विभागाने विविध योजनांमध्ये नमुद केलेली इतर औजारे

लाभार्थी निवडीचे निकष :-

 1. ग्रामीण भागातील नोंदणीकृत महिला बचत गट.
 2. महिला बचत गटांचे नोंदणीकृत ग्रामसंघ.
 3. महिला बचत गटांचे नोंदणीकृत लोक संचलित साधन केंद्र.

अनुदान मर्यादा :-

 1. प्रति लाभार्थी एकूण खर्चाच्या 90% किंवा जास्तीत जास्त रक्कम रुपये 07.00 लाखाच्या मर्यादेत.
 2. अनुदान लाभार्थ्यास त्यांच्या मागणीनुसार धनादेशाद्वारे किंवा घटकाच्या ( औजारांच्या ) स्वरुपात देय राहील.

लाभार्थी हिस्सा :-

 1. औजारे संचाच्या किंमतीच्या 10% लाभार्थी हिस्सा देय राहील.

योजनेची कार्यपध्दती :-

सदरची योजना प्रामुख्याने महिला बचत गट, महिला बचतगटांचे ग्रामसंघ, लोकसंचलित साधन केंद्र(CMRC) यांच्यासाठी असल्याने तालुका पातळीवरुन या योजनेची प्रसिध्दी करणेत यावी. पंचायत समिती, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनन्नोती अभियान,महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा यांनी सर्व बचतगटांपर्यंत या योजनेच्या प्रचार होण्याची दक्षता घ्यावी.

 1. या योजनेतील घटकांचा लाभ घेण्यास इच्छुक असणा-या क्रियायाशिल बचतगट, ग्रामसंघ व लोक संचलित साध केंद्र यांना प्रस्ताव कसे करावे याबाबत मार्गदर्शन करावे.
 2. लाभार्थींनी प्रपत्र अ, ब, यासह आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून परिपूर्ण प्रस्ताव संबंधित पंचायत समितीला सादर करावा.
 3. पंचायत समितीने दिलेल्या लक्षांकाप्रमाणे “प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य” या तत्वानुसार लाभर्थ्याचे प्रस्ताव स्विकारुन क्रमांकानुसार नोंदवहीत नोंद घ्यावी. प्रस्ताव परिपूर्ण व योग्य असल्याची खात्री करावी.
 4. गट विकास अधिकारी किंवा सहा.गट विकास अधिकारी, जिल्हा अभियान व्यवस्थापक,महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान व जिल्हा समन्वयक, महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी प्रस्तावातील लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी व “प्रपत्र क” मध्ये एकत्रित तपासणी अहवाल तयार करावा.
 5. पंचायत समितीने “प्रपत्र क” मधील तपासणी अहवालातील शिफारशी नुसार सदर प्रस्ताव योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर सदरी प्रस्ताव कृषि विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा.
 6. कृषि विकास अधिकारी यांनी येणा-या प्रस्तावाची नोंदवहीत क्रमाने नोंद घ्यावी व प्रस्तावाची तपासणी करुन प्रस्ताव मंजूरीसाठी संबंधित विषय समितीकडे सादर करावा.
 7. संबंधित विषय समितीची मंजूरी मिळाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना तसे कळवावे.
 8. लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार मेक व मॉडेल निहाय औजारे महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेकडून खरेदी करावीत. खरेदी केलेल्या औजारांची प्रत्यक्ष क्षेत्रिय तपासणी पंचायत समिती,महाराष्ट्र ग्रामीण जिवनन्नोती अभियान व महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी एकत्रित करुन अनुदान अदा करण्याची शिफारस जिल्हास्तरावर करावी.जिल्हास्तरावरुन लाभार्थ्यांना धनादेशाद्वारे अनुदान अदा करावे.

  किंवा

 9. लाभार्थ्याने त्यांच्या पसंतीची औजारे एकत्रितरित्या मागणी करावी.कृषि विकास अधिकारी यांनी सर्व जिल्हयाची औजारांची मागणी एकत्रित करुन महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ या शासनाच्या यंत्रणेकडे नोंदवावी. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने सदरची औजारे स्वखर्चाने गट पातळीवर पोहोच करावी पंचायत समितीने सदर औजारांची तपासणी करुन साठा नोंदवहीमध्ये नोंद घ्यावी व लाभार्थीला त्याचे वितरण करणे. तत्पूर्वी 10% लाभार्थी हिस्स्याची रक्कमेचा धनादेश (महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्या.यांचे नावे असलेला ) ताब्यात घेऊन तो कृषि विकास अधिकारी कार्यालयास सादर करावा. लाभार्थी हिस्सा व अनुदानाची रक्कम कृषि विकास अधिकारी यांनी महाराष्ट्र कृ‍‍षि उद्योग विकास महामंडळ यांना अदा करावी.

यां‍त्रिकी पदध्तीने भात लागवड

 1. मॅट पद्धतीची रोपवाटिका तयार करणे :-
  • प्रथम रोपवाटीकेसाठी जमीन समपातळीत आणावी. आणि त्या जमिनीत 10 मी X 1.2 मी X 2.5 सेंमी आकाराचे गादीवाफे तयार करावेत. दोन वाफयांमध्ये पाण्याचा निचरा होण्याकरिता अंतर ठेवावे.
  • गादीवाफे 50 मायक्रॉन जाडीच्या व 1.2 मी रुंदीच्या प्लास्टीक कागदाने झाकावेत व त्या कागदावर (21 सेंमी X 55 सेंमी X 2 सेंमी ) आकाराच्या लोखंडी फ्रेम्स ठेवाव्यात.
  • लोखंडी फ्रेममुळे रोपांची एकसारखी वाढ होते व मातीचे चौकोनी आकाराचे केक तयार होण्यास मदत होते.
  • या फेम्सच्या मध्ये एक गोणी माती (दगड व कचरा नसलेली) चांगले कुजलेले शेणखत असलेली भरावी.
  • तयार मातीच्या केकवर मोड (कोंब) आलेले बियाणे एकसारखे अलगदपणे पसरावे.बियाणे अतिदाट किंवा अति विरळ होणार नाही. याची दक्षता घ्यावी एकरी 15 ते 20 किलो बियाणे वापरावे.
  • बियाणे भाताच्या पेंढयाने झाकावे. यामुळे पक्ष्यांपासून संरक्षण होऊन रोपे चांगली वाढतात.
  • सुरुवातीस बेडवर दिवसातून 2-3 वेळा झारीच्या साहय्याने 3 ते 4 दिवस पाणी देण्यात यावे. तसेच रोपवाटीकेचा बेड कधीही कोरडा राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • 4 ते 5 दिवसांनी भाताचा पेंढा काढून टकावा आणि रोपवाटीकेस रोपांच्या निम्या उंचीपर्यंत पाणी राहील इतके पाणी सोडावे. रोपवाटीकेतील रोपांवर युरीयाची फवारणी करु नये.
  • यंत्राद्वारे रोवणीसाठी लागणारी 10 ते 15 सेंमी उंचीची व 3 ते 4 पाने असलेली रोपे 16 ते 18 दिवसांत तयार होतात.
 2. रोवणीसाठी बांधी तयार करणे :-
  • यां‍त्रिकीकरणाद्वारे रोवणीसाठी कमी खोलीची म्हणजे 10 ते 15 सेंमी खोल चिखलणी करावी लागते. म्हणून पॉवर टिलरच्या साहाय्याने चिखलणी केल्यास अपेक्षित परिणाम मिळतो. चिखलणी रोवणीपुर्वी एक दिवस अगोदर करावी म्हणजे रोवणी पर्यंत चिखल व्यवस्थित स्थिर होईल. बांधीतील जादाचे पाणी रोवणीपूर्वी काढून घ्यावे तसेच रोपवाटीकेतील पाणी ही काढून घ्यावे.
 3. यंत्राद्वारे रोवणी :-
  • रोपवाटीकेतील रोपांचे केक यंत्रावर ठेवून दोन मजुरांच्या सहाय्याने रोवणी करावी. रोपांची वाहतुक करताना “बेड केक” तुटणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोवणी करण्यापूर्वी रोपांवर पाणी शिंपडत राहावे.
  • रोवणी यंत्राद्वारे एका फेरीत 5-6 ओळींची रोवणी होते. एका चुडात 4 ते 6 रोपे, 5 सेंमी खोलीवर लावली जातात.
  • एका रोवणी यंत्राद्वारे एका दिवसात अंदाजे 8 एकर क्षेत्राची रोवणी करता येते.
  • रोपाच्या दोन ओळींतील अंतर 22 ते 24 सेंमी दोन रोपांतील अंतर 10 ते 23 सेंमी पर्यंत ठेवता येते.
 4. भात रोवणीसाठी यंत्र वापराचे फायदे :-
  • अत्यंत कमी मजूर लागतात- फक्त 3 मजूरांची आवश्यकता.
  • वेळेची बचत- यंत्राद्वारे एका तासात अर्धाएकर क्षेत्राची लावणी शक्य
  • बियाण्याची बचत - दोन रोपांमधील व ओळींमधील अंतर समान, त्यामुळे रोपाची संख्या (Plant Population) आवश्यक तेवढीच.
  • फुटव्याची संख्या,लोंबीची लांबी,दाण्याची संख्या यामध्ये वाढ झाल्याने उत्पादनात 20 ते 30% वाढ.
  • पिकासाठी लागणा-या पाण्याची 50% बचत.

तुलनात्मक निरिक्षणे

भात शेतीची कामे अनुक्रमे चिखलणी,लावणी,कापणी व मळणी या क्रमाने होतात. यामध्ये जास्त मजुर प्रामुख्याने लावणी व कापणीसाठी लागतात. खरीप- 2015 मध्ये महिला बचतगटांनी भात शेतीची कामे यंत्राद्वारे केलेली होती. त्यांची निरिक्षणे नोंदवली गेली होती ती खालील प्रमाणे:

 1. मजुरी वरील खर्च ( तुलनात्मक तक्ता ):-
  कामाचे नाव पारंपारिक ( मजूरी र.रु. 350/- प्रतिदिन ) यंत्राने बचत गटाचे दर ( र.रु.) बचत गटाचा नफा शेतकरी बचत ( र.रु.)
  मजुर (संख्या) एकूण मजुरी (र.रु.) मजुर (संख्या) मजुरी (र.रु.) इंधन (र.रु.) एकूण (र.रु.) वेळ (तास)
  चिखलणी 3 1050 2 200 200 400 2 600 200 450
  लावणी 14 4900 4 400 200 600 1 2500 1900 2400
  कापणी 12 4200 2 200 100 300 1 1500 1200 2700
  मळणी 7 2450 2 200 100 300 2 1000 700 1450
  एकूण 36 12600 10 1000 600 1600 6 5600 4000 7000

  वरील निरिक्षणांच्या विश्लेषणानुसार, पारंपारीक पध्दतीने केलेल्या भातशेतीसाठी प्रति एकर 36 मजूर लागले होते. त्यामध्ये लावणीसाठी सर्वात जास्त म्हणजेच 14 तर कापणीसाठी 12 मजूर लागले होते. मजूरांना प्रतिदिन र. रुपये 350/- एवढी मजूरी दयावी लागली शिवाय या मजूरांना दुपारचे जेवणही दयावे लागते. भात शेतीच्या संपूर्ण कालावधीत एका एकरसाठी 36 मजूर लागले. त्यासाठी र.रुपये 12600/- एवढा खर्च एकटया मजुर या घटकावर करावा लागला.

  पारंपारिक लागवडीच्या तुलनेत यंत्राद्वारे भात लागवडीसाठी संपूर्ण कालावधीत प्रति एकर 10 एवढे मजूर लागले त्यांचा खर्च र.रुपये 1000/- एवढा आलेला होता. यंत्राच्या इंधनासाठी र.रुपये 600/- खर्च आला. म्हणजेच मजूरी व इंधन मिळून र.रुपये 1600/- प्रति एकर एवढा खर्च आलेला होता. या संपूर्ण कामांसाठी फक्त 6 तास एवढा अल्प कालावधी लागला.

  महिला बचत गटांनी चिखलणी,लावणी,कापणी व मळणी यासाठी अनुक्रमे र. रुपये 600/-, 2500/-, 1500/- व 1000/- प्रति एकर एवढे दर निर्धारित केलेले होते. त्यातून बचत गटांना चारही कामांसाठी मजूरी व इंधनाचा खर्च वजा जाता निव्वळ नफा र. रुपये 4000/- प्रति एकर एवढा मिळाला, तर शेतक-याची प्रति एकर खर्चात रुपये 7000 इतकी बचत झाली.

 2. उत्पादन प्रति एकर (तुलनात्मक तक्ता) :-

  पारंपारिक भात लागवडीसाठी मजूर हाताने लागवड करत असल्याने एकाच ठिकाणी 5 ते 6 रोपे लागवड करित असल्याचे निदर्शनास आले. तसेच दोन रोपांमधील अंतर एक समान नव्हते त्यामुळे रोपांची गर्दी होऊन एकंदरीत रोपांच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून आला. तुलनेत यंत्राद्वारे केलेल्या लागवडीमध्ये एका ठिकाणी एकच रोप लावणी झाले शिवाय दोन रोपांमधील अंतर ही समसमान असल्याने रोपांची वाढ जोमात झाल्याचे आढळून आले.

  अ.क्र. बाब पारंपारिक यंत्राद्वारे
  1 एका चुडामधील फुटव्याची संख्या 16 ते 18 22 ते 24
  2 रोप संख्या (Plant Population) 1,50,400 1,33,320
  3 उत्पादन (क्विंटल /एकर) 12 16

 

 • योजनेचे उद्देश
  1. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना कृषि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करणे.
  2. कृषि क्षेत्रात यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देवून मजुरांअभावी येणारी समस्या दूर करणे.
  3. वाढत्या मजुरीच्या दरामुळे उत्पादन खर्चात होणारी वाढ कमी करणे.
  4. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेगात,वेळेत व गुणवत्तापूर्ण करणे.
 • योजनेचे स्वरूप
 • लाभार्थी पात्रता
 • यशोगाथा

  वरील तक्त्याचे निरीक्षण केले असता, एका चुडामधील फुटव्याची संख्या पारंपारिक लागवडीमध्ये 16 ते 18 एवढी आढळून आली. तुलनेत यंत्राद्वारे केलेल्या लागवडीमध्ये ती रोपांमधील अंतर योग्य असल्यामुळे 22 ते 24 एवढी आढळून आली. मात्र रोपांची सर्वांगिण वाढ जोमदार आढळून आली. याचा परिणाम उत्पादनावर दिसून आला. पारंपारिक भात लागवड पध्दतीमध्ये प्रति एकर 12 क्विंटल एवढे उत्पादन मिळाले. तुलनेत यंत्राद्वारे केलेल्या लागवडीमध्ये ते 16 क्विंटल प्रति एकर आढळून आले म्हणजेच सरासरी 20 ते 25 टक्के वाढ उत्पादनात आढळून आली.

 • छायाचित्र दालन