सर्व गरोदर मातांची सोनोग्राफी द्वारे तपासणी

विभाग : आरोग्य विभाग
प्रस्तावना

योजनेचे कार्यक्षेत्र:- जिल्हा परिषद ठाणे

योजनेचे लेखाशिर्ष:- 8 सार्वजनिक आरोग्य, जि.प.योजना, सन 2017-2018

योजनेचे प्रारुप:-

ठाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दरवर्षी 26000 गरोदर मातांची नोंदणी होत असून जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी तपासणीची सुविधा व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्यामुळे मातांना त्यांची सोनोग्राफी खाजगी रुग्णालयात करुन घेणेसाठी स्वत: खर्च करावा लागतो. सदर सोनोग्राफी चाचणी प्रा.आ.केंद्राचे वैदयकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने करुन घेतल्यास माता व बालकांना आरोग्याच्या दृष्टीने थेट फायदा होऊन माता मृत्यू, बाल मृत्यू, अभ्रक मृत्यू इत्यादी जीवनविषयक आकडेवारीमध्ये सुधारणा होऊ शकते. या योजनेंतर्गत देण्यांत येणारा निधी हा प्रोत्साहनपर निधी म्हणून देण्यांत येईल.

 

 • योजनेचे उद्देश

  गरोदर मातांची गरोदरपणात किमान एक सोनोग्राफी तपासणी करुन जोखमीच्या माता, जन्मत: व्यंग, जुळे मुलं, Hydraminious, Oligohydominious किंवा बाळाची हालचाल इत्यादी बाबींचे वेळीच निदान करुन त्याबाबत गरोदर मातेला पुढचे नियोजन व औषधोपचार करणे सोपे जाईल व त्यामुळे माता व अभ्रक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

 • योजनेचे स्वरूप
  1. गरोदर मातेस गरोदरपणात खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये शासकीय वैदयकीय अधिका-यांच्या सल्ल्याने किमान 1 सोनोग्राफी करुन घेण्यासाठी र.रु. 500/- अनुदान व र.रु. 100/- प्रवास खर्चाचे असे एकुण र.रु. 600/- देय राहतील.
  2. शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी करुन घेतल्यास प्रवास खर्चाचे र.रु. 100/- गरोदर मातेस देय राहतील.
  3. सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यास प्रा.आ.केंद्र स्तरावर संबंधित वैदयकीय अधिकारी यांचे मार्फत अधोरेखित धनादेशा द्वारे अदा करण्यात येईल.
  4. स्त्रीरोग तज्ञांनी दुस-या सोनोग्राफी चाचणीची (Anomaly Scan) शिफारस केल्यास

  दुस-या सोनोग्राफी चाचणीसाठीचा खर्च गरोदर मातेस देय राहील.

 • लाभार्थी पात्रता
  1. लाभार्थी हा ठाणे जिल्हयातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील असावा.
  2. लाभार्थ्यांनी शासकीय रुग्णालयातील वैदयकीय अधिका-यांच्या सल्ल्यानुसार खाजगी सोनोग्राफी सेंटर मध्ये सोनोग्राफी करुन घेणे बंधनकारक राहिल.
  3. गरोदर मातेने सोनोग्राफी अहवालाची प्रत व रक्कम अदा केल्याची पावती संबंधित प्रा.आ.केंद्राचे वैदयकीय अधिकारी यांचेकडे देणे बंधनकारक आहे
  4. गरोदर मातेच्या नावाची नोंद MCTS मध्ये असणे आवश्यक आहे.
  5. गरोदर मातेने शासकीय रुग्णालयात नाव नोंदविल्याचे एएनसी कार्डाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
 • यशोगाथा

  सन 2015-2016 या आर्थिक वर्षात 9451 गरोदर मातांना सोनोग्राफी तपासणीसाठी संदर्भित करण्यांत आले आहे.

  • ग्रामीण भागातील प्रत्येक गरोदर मातांची वैद्यकीय अधिकारी व डॉक्टराच्या सल्ल्यानुसार किमान एक सोनोग्राफी चाचणी गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी:-

   ठाणे जिल्हयात प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दरवर्षी 25000 गरोदर मातांची नोंदणी होत असून जिल्हयातील ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे सोनोग्राफी तपासणीची सुविधा व तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्यामुळे मातांना त्यांची सोनोग्राफी खाजगी रुग्णालयात करुन घेणेसाठी स्वत: खर्च करावा लागतो. सदर सोनोग्राफी चाचणी प्रा.आ.केंद्राचे वैदयकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने करुन घेतल्यास माता व बालकांना आरोग्याच्या दृष्टीने थेट फायदा होऊन माता मृत्यू, बाल मृत्यू, अभ्रक मृत्यू इत्यादी जीवनविषयक आकडेवारीमध्ये सुधारणा होऊ शकते.

   गरोदर मातांची गरोदरपणात किमान एक सोनोग्राफी तपासणी करुन जोखमीच्या माता, जन्मत: व्यंग, जुळे मुलं, Hydraminious, Oligohydominious किंवा बाळाची हालचाल इत्यादी बाबींचे वेळीच निदान करुन त्याबाबत गरोदर मातेला पुढचे नियोजन व औषधोपचार करणे सोपे जाईल व त्यामुळे माता व अभ्रक मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल या उद्देशाने जि.प.अर्थसंकल्प सन 2015-2016 या आर्थिक वर्षात 1,25,00,000/- इतकी भरीव तरतूद करण्यांत आली होती. सदरचा निधी हा प्रोत्साहनपर म्हणून देण्यांत येत आहे. मार्च 2015 अखेरपर्यंत एकुण 9441 गरोदर मातांना सोनोग्राफी तपासणीसाठी संदर्भित करुन लाभ देण्यांत आलेला आहे. खाजगी सोनोग्राफी सेंटर व शासकीय सोनोग्राफी सेंटरमध्ये सोनोग्राफी तपासणी करुन घेतल्याने गरोदर पणातील संभाव्य धोके, गुंतागुंत वेळीच निदर्शनास आल्याने वैदयकीय अधिकाऱ्यांना वेळीच कार्यवाही करण्यांत यश आले. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्भक व मातामृत्यूचे प्रमाण कमी झाले असून संस्थेतील प्रसुतीच्या संख्येत वाढ झाली आहे. या योजनेचा मोठयाप्रमाणांत लाभ झाल्याने ही योजना पुढील वर्षी देखील राबविण्यांत यावी अशी मागणी सर्व स्तरातून करण्यांत येत आहे.

 • छायाचित्र दालन