लोकसहभागातून वनराई बंधारे बांधणे

विभाग : लघु पाटबंधारे विभाग
प्रस्तावना
 • कार्यक्षेत्र:- ठाणे जिल्हा .

लोकप्रतिनिधी, अधिकारी, व संघटना यांना मोठया प्रमाणांवर सहभाग:-

जिल्हा परिषद अथवा शासनाकडील कोणत्याही प्रकारचा निधी खर्च न करता लोकसहभागातुन ही मोहिम राबविण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायत विभाग, मगांराग्रारोहयो, लघु पाटबंधारे विभाग, इतर विभाग, स्थानिक लोकप्रतीनिधी, पत्रकार, पंचायत समिती विभागातील अधिकारी/ कर्मचारी, ग्रामसेवक, स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बचत गटातील महिला, जिल्हा परिषद विविध संवर्गातील अधिकारी/ कर्मचारी संघटना, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ यांची श्रमदान शिबीरे, इत्यादी घटकांचा मोठया प्रमाणात सहभाग मिळाला.

लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याच्या मोहिमेत विदयार्थ्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये पाण्याविषयी जाणीव व जागृती निर्माण व्हावी, जलसाक्षरता वाढावी याकरिता मुंबई विद्यपीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रो. श्री. बी. एस. बिडवे यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी, विभागीय समन्वयक,जिल्हा समन्वयक यांच्या समन्वय बैठका घेवून राष्ट्रीय सेवा योजनेची सात दिवसीय 26 विशेष निवासी शिबीरांचे आयोजन करण्यात आले. आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या छात्रांच्या श्रमदानातून एकुण 65 वनराई बंधारे बांधण्यात आले.

मा.ना.पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शहापुर तालुक्यातील दहागांव, आसनगांव, सावरोली, सारंगपुरी येथे भेट देउून वनराई बंधा-यांची पाहणी केली.आणि सारंगपुरी येथील वनराई बंधाऱ्यांच्या कामावर स्वत: श्रमदान केले. तसेच वनराई बंधाऱ्यांवर भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहित केले. त्याच प्रमाणे वनराई बंधारे बांधण्याची मोहिम राबविल्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.

मा.श्री.कपिल पाटील खासदार भिवंडी यांनी भिवंडी तालुक्यातील मौजे पहारे व इतर ठिकाणी भेटी देऊन वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली आणि शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.

मा.श्री.श्रीकांत शिंदे खासदार कल्याण आणि मा.श्री.अनिल देसाई खासदार राज्यसभा यांनी मौजे खरड येथे वनराई बंधाऱ्यांच्या कामांचा शुभारंभ केला.

मा.श्री.किसन कथोरे आमदार मुरबाड यांनी मौजे वांगणी व इतर ठिकाणी वनराई बंधाऱ्यांचा शुभारंभ केला.

मा.श्री.पांडुरंग बरोरा आमदार शहापुर यांनी मौजे चेरपोली ता.शहापुर येथे आपल्या कार्यकर्त्यांसह स्वत: श्रमदान करून वनराई बंधारा बांधला आणि तालुक्यामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन वनराई बंधारे बांधण्याबाबत कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना प्रेात्साहित केले.

मा.डॉ.अश्वीनी जोशी जिल्हाधिकारी ठाणे यांनी जिल्हयातील महसुल अधिकाऱ्यांना स्वत: वनराई बंधारे बांधणेचे उद्दिष्ट दिले आणि त्यांनी महसुल अधिकाऱ्यासोबत स्वत: मौजे वांद्रे ता.शहापुर, मौजे वाल्हिवरे ता.मुरबाड येथे वनराई बंधारे बांधण्यासाठी श्रमदान केले.

मा.श्री.उदय चौधरी मुख्य कार्यकारी अधिकारी व मा.श्री.रविंद्र पाटील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व खाते प्रमुखांसोबत वारंवार भेटी देऊन वनराई बंधाऱ्यांची पाहणी केली आणि अधिकारी,कर्मचारी,ग्रामसेवक इत्यादीना प्रोत्साहित केले. तसेच शेतकरी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन केले.

वनराई बंधाऱ्यामुळे होणारा फायदा:-

 • लोकसहभागातून ग्रामीणभागातील नदी, नाले, ओढे, आदींवर वनराई बंधारे बांधल्यास पाणी

  आडविल्यास

  • पाणी जमिनीत जिरुन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल.
  • पिण्याच्या पाण्याची टंचाईची तिव्रता कमी होण्यास मदत होईल.
  • जंगलातील पशुपक्षी यांनाही या पाण्याचा उपयोगत होईल.
  • पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा वापर करता येईल.
 • योजनेचे उद्देश

  संपूर्ण जिल्हा टंचाईमुक्त करणे तसेच शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढवून दुबार पिके, भाजीपाला, रब्बी पिके उत्पादन करण्याची क्षमतावृध्दी निर्माण करण्याच्यादृष्टीने व जिल्हयाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मोठया प्रमाणावर ओढे, नाले इत्यादी जलस्त्रोतांना बांध घातल्याने पाणी आडविल्यास ठिक-ठिकाणी पाण्याचे साठे उपलब्ध होऊन त्या काठच्या शेतकऱ्यांना या पाण्याचा उपयोग होऊ शकेल.

 • योजनेचे स्वरूप
 • लाभार्थी पात्रता
 • यशोगाथा

  वनराई बंधाऱ्यामुळे प्रत्यक्षात झालेला फायदा:-

  1. मोठया प्रमाणात लोकसहभाग वाढला.
  2. या मोहिमेत एकुण 360 ग्रामपंचायतींनी प्रत्यक्षात सहभाग नोंदविला.
  3. लोकसहभागातून एकुण 1041 वनराई बंधारे बांधण्यांत आलीत.
  4. वनराई बंधाऱ्यामुळे एकुण 724.80 स.घ.मी. पाणी साठा निर्माण करता आला.
  5. वनराई बंधाऱ्यामुळे 678.03 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली.
  6. पाणी जमीनीत जिरुन भुगर्भातील पाण्याची पातळी वर येण्यास मदत झाली आहे.
  7. भाजीपाला, कडधान्य तसेच रब्बी पिकाची लागवड मोठया प्रमाणात करणेत आलेली आहे.
  8. पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्त दैनंदिन वापरासाठी उदा. कपडे धुणे, इत्यादीसाठी या पाण्याचा उपयोग झाला.
  9. शेतीसाठी उपयोगी असलेल्या जनावरांनाही वनराई बंधा-यामुळे पाणी उपलब्ध झालेले आहे.
  10. वनराई बंधाऱ्यांमुळे जंगलातील पशुपक्षी यांचे साठी ही पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
  11. वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर एकुण 1205 शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड केली.
  अक्र तालुका ग्राम पंचायतीची संख्या वनराई बंधा-यांची संख्या झालेल्या कामाचे मुल्यांकन रुपयात झालेला पाणीसाठी स.घ.मी सिंचनासाठी वापर असल्यास निर्माण झालेली सिंचन क्षमता(हेक्टर मध्ये) किती शेतक-यांनी भाजीपाला लागवड केली
  1 2 3 4 5 6 7 8
  1 अंबरनाथ 24 102 1383750 69.95 16.90 193
  2 भिवंडी 68 221 2207940 146.26 54.00 115
  3 कल्याण 37 114 1171711 51.36 21.13 117
  4 मुरबाड 126 298 2807200 220.48 413.00 311
  5 शहापुर 105 306 3007618 236.73 173.00 469
    एकुण 360 1041 10578219 724.8 678.03 1205
 • छायाचित्र दालन