"आरोग्य भरारी, संकल्प सुदृढ ठाण्याचा" योजना

विभाग : आरोग्य विभाग
प्रस्तावना
 • विभाग प्रमुख नाव- डॉ.बाळासाहेब संभाजीराव सोनावणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
 • फोटो-
 • मोबाईल नंबर- 9920119617
 • ऑफिस दूरध्वनी क्रमांक-022-25346405/022-25369682
 • ई-मेल- dhozpthane@rediffmail.com , healthzpthane@gmail.com
 • विभागविषयक माहिती-

  भारतात आरोग्य सेवा पध्दती ब्रिटीश राजवटीपासून सुरु झाली. सुरवातीस आरोग्य सेवेची उददीष्ट सैनिक व युरोपीयन नागरी नोकरांना सेवा देणे हे होते व साथरोग नियंत्रण उदा.प्लेग, कॉलरा, देवी हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने प्राधान्याने कॅन्टोमेंट भागात सुरु केली. ब्रिटीश राजवटी पाश्चात पध्दतीचे औषधोपचार सुरु केल्यामूळे अस्तित्वात असलेल्या पारंपारिक औषधोपचार व आयुर्वेदिक उपचार याकडे दुर्लक्ष झाले. सुरवातील मोठया शहरात हॉस्पिटल व दवाखाने यांच्यामार्फत उपचारात्मक सेवा देणे सुरु केले. नियोजन समितीने 1940 साली ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणेची सूचना केली व 1000 लोकसंख्येला 1 आरोग्य सेवक व प्रमाणात आरोग्य सेवकांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले पहिले प्राथमिक आरोग्य केंद्ग 1942 साली कलकत्याजवळ (पश्चिम बंगाल) शिंगुर या गावी सुरु केले. त्याला ग्रामीण आरोग्य पथक असे संबोधण्यात आले. ग्रामीण आरोग्य सेवा डॉ.जेम्स ग्रॅड, संचालक, अखिल भारतीय स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविला आहे.

  त्याचसुमारास मुंबई प्रांत सरकारच्या आर्थिक सहाय्याने आरोग्य सेवा पदध्ती महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे दवाखाने राज्यात सोयीच्या ठिकाणी सुरु करण्यात आले त्यालाच नागरी दवाखाने म्हणत नंतर हे सर्व दवाखाने जिल्हा परिषदेमध्ये वर्ग करण्यात आले. 1977 साली झालेल्या 13 व्या जागतीक आरोग्य परिषदेमध्ये आरोग्य संघटना व त्याचे सभासद देश यांनी समाजाचे आरोग्य एका ठराविक पातळीवर संवादाचे मुख्य उदिदष्ट ठरविले हेच 2000 साली सर्वांना आरोग्य या नावाने प्रसिध्द झाले. या उदिदष्ट पूर्तीसाठी प्राथमिक आरोग्य सेवा हिच गुरुकिल्ली आहे हे स्विकत करण्यात आले.

आरोग्य संस्थाद्वारे मिळणा-या विविध सेवा

 1. माता आणि बालकांचे आरोग्यविषयक सेवा
  • प्रसुतीपूर्व काळजी -
   • सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत)
   • गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी - पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे)
   • संलग्र आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तक्षयाकरिता तपासणी, पोटावरुन तपासणी, उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अ‍ॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अ‍ॅसिड गोळयांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार)
   • प्रयोगशाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी.
   • जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व तत्पर योग्य ठिकाणी संदर्भसेवा.
  • गरोदर मातांसाठी सोनोग्राफी सुविधा:-
   • जिल्हा परिषद सेस फंडातून गरोदर मातांसाठी सेवा देणेत येत आहे.
  • प्रसुतीदरम्यान सेवा -
   • आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे)
   • स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे.
   • तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.
  • प्रसुतीपश्चात सेवा -
   • प्रसुतीपश्चात कमीत कमी २ वेळा गहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात.
   • प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे.
   • सल्ला व समुपदेशन - आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोधन, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, ए.आय.व्ही.एड्‌स इ.बाबत.
  • प्रसुतीपश्चात काळजी -
   • उपकेंद्गाच्या कर्मचार्‍यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी - पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत.
   • प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे.
   • आहार, स्वच्छता, कुटूंबनियोजनाबाबत आरोग्य शिक्षण देणे.
  • बालकाचे आरोग्यः-
   • नवजात अर्भकाची काळजी
   • ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
   • सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणा-या आजारांबाबत लसीकरण करणे.
   • ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
   • बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.
    • नवजात अर्भकाची काळजी -
   • नवजात अर्भकासाठी सोयी व तज्ञसेवा
   •  
  • * नवजात अर्भकामधील तापमान कमी होण व कावीळ आजाराचे व्यवस्थापन.
   • नवजात शिशु व बालकांमधील आजारांच्या एकात्मिक व्यवस्थापनासह ( imnci ) आजारी बालकांची तातडीची काळजी.
   • बालकांमधील नेहमीच्या आजारांची काळजी.
   • जन्मानंतर पहिले सहा महिने निव्वळ स्तनपानास प्रवत्त करणे.
   • लसीकरणाने टाळता येणार्‍या आजारांविरुध्द मार्गदर्शक सूचनांप्रमाणे अर्भकांचे व बालकांचे संपूर्ण लसीकरण करणे.
   • अ जीवनसत्वाचे प्रतिबंधात्मक डोस देणे.
  • कुपोषण, जंतूसंसर्ग यांसारख्या बालकांमधील आजारांचे प्रतिबंधन व नियंत्रण इ.
 2. कुटुंबनियोजन विषयक सेवा
  • कुटूंबनियोजन आणि गर्भनिरोधन - • कुटूंबकल्याणाची योग्य ती पध्दत वापरण्यासाठी, आरोग्य शिक्षण देणे, प्रवत्त करणे व समुपदेशन करणे. • कुटूंबनियोजनाच्या साधनांची उपलब्धता - निरोध, तांबी, तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया, तात्काळ गर्भनिरोधन इ. • कुटूंबकल्याणाच्या कायमस्वरुपी पध्दती अवलंबणार्‍या योग्य जोडप्यांसाठी पाठपुराव्याच्या सेवा. • आवश्यकतेनुसार सुरक्षित गर्भपातासाठी समुपदेशन व योग्य प्रकारे संदर्भसेवा.
  • पौगंडावस्थेतील आरोग्य सेवा - • आरोग्य शिक्षण, समुपदेशन व संदर्भसेवा • शालेय आरोग्य सेवेसाठी मदत
  • उपचारात्मक सेवा - • किरकोळ आजारावर औषधोपचार उदा.ताप, अतिसार, श्वसनसंस्थेचे आजार, जंताचे विका, अपघात व तात्कालिक परिस्थितीत करावयाचे प्रथमोपचार. • तत्पर व योग्य संदर्भसेवा. • प्राथमिक आरोग्य केंद्गाचे वैद्यकीय अधिकारी आशा अंगणवाडी सेविका, पंचायत राज संस्था, स्वयंसहाय्यता गट यांच्या मदतीने अंगणवाडीमध्ये कमीतकमी दरमहा एक आरोग्य दिवस आयोजित करणे.
  • जीवनविषयक घटनांची नोंद:- जन्म - मत्यू, मातामत्यू , अर्भकमत्यू यांसारख्या जीवनविषयक आकडेवारीची (घटनांची) नोंद घेणे व अहवाल पाठविणे (२१ दिवसांचे आत)
 3. इतर आरोग्य विषयक सेवा
  • क्षयरोग, कुष्ठरोग,हिवताप निर्मुलन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मोफत निदान व उपचार
  • राष्ट्रीय अंधत्व निर्मुलन कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे दृष्टीदोष तपासणी व ग्रामीण भागातील गरीब/गरजू रुग्णांसाठी मोतिबिंदू निदान व उपचार
 • योजनेचे उद्देश

  जिल्हयातील प्रा.आ.केंद्राकरिता दैनंदिन कामकाज करणे, रुग्णसेवेसाठी आवश्यक प्रयोगशाळा रसायने, अति गंभीर रुग्णास उपचारासाठी काही तातडीची औषधे, इंजेक्शने इ. तात्काळ खरेदी करणे. तसेच प्रा.आ.केंद्रातील विदयुत बिल, टेलिफोन बिल भरणे, आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम शिबीरे आयोजन करणे इ. बाबीसाठी राज्यस्तरावरुन विवक्षित अनुदान प्राप्त होत नाही. परिणामी अनेकवेळा उपचाराअभावी रुग्णास ठाणे/मुंबई येथील आरोग्य संस्थांन कडे संदर्भित करावे लागते. अशावेळी रहदारीबाबत प्रवासातील अडथळे व इतर अनेक कारणामुळे वैदयकीय अधिकारी यांना रुग्णांचे नातेवाईकांचा दोष पत्करण्याची वेळ येते व क्वचित प्रसंगी डॉक्टर/कर्मचारी यांना धक्काबुक्की, मारहाण इत्यादी प्रकार घडतात. असे प्रकार घडु नयेत यासाठी जि.प.च्या सेस फंडातुन निधी उपलब्ध करुन देवुन प्रा.आ.केंद्र स्तरावरिल सोयी-सुविधा अभावी रुग्णसेवेतील येणा-या अडचणी दुर करणे.

 • योजनेचे स्वरूप

  सन 2017-18 या कालावधी करिता जि.प.च्या सेस फंडातुन प्रा.आ.केंद्रांना विविध सोयी-  

        सुविधा पुरविणेसाठी प्रति प्रा.आ.केंद्र र.रु.3,20,000/- (अक्षरी रु. तीन लाख विस हजार रुपये मात्र) अनुदान  

        खालील बाबीसाठी परिपत्रकामधील अटींच्या अधिन राहुन खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

        1) प्रा.आ.केंद्र,उपकेंद्र, जि.प.दवाखाना यांना आवश्यक साहित्य व उपकरणे खरेदी

        2) प्रा.आ.केंद्रातील वाहनांकरिता अतिरिक्त इंधन व दुरुस्ती

        3) प्रा.आ.केंद्रास, लेखन साहित्य, झेरॉक्स, इतर लेखन साहित्य तसेच डेटा एन्ट्रीसाठी मानधन तरतुद

        4) आरोग्य विषयक जनजागृती करिता विविध समारंभा, सप्ताह साजरा करणे, शासकीय व जिल्हा

            परिषद योजनांची प्रचार व प्रसिध्द करणे.

        5) ग्रामीण भागातील गरोदर स्त्रीयांसाठी डोहाळे जेवण्याची व तत्सम आरोग्यविषयक जनजागृती

            करणारे छोटे खानी कार्यक्रम आयोजित करणे

        6) शवविच्छेदन कर्मचा-यांना वाढीव मानधन

        7) बिगर आदिवासी क्षेत्रातील अति जोखीमीच्या मातांची व बालकांची विशेष तज्ञांकडुन तपासणी

            शिबीर

        8) जैविक कचरा व्यवस्थापन

        9) शासकीय संस्थेत प्रसूती झालेल्या मातेस व बालकास आरोग्य किट देणे.

        10) प्रा.आ.केंद्रस्तरावर नाविन्यपूर्ण योजना राबविणे.                                                                     

         सदर योजनेचे अनुदान प्रा.आ.केंद्र निहाय संबंधिस गटास वित्तप्रेषणाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. गटस्तरावरिल गटविकास अधिकारी यांनी उपलब्ध अनुदान संबंधित वैदयकीय अधिका-यांच्या खात्यावर जमा करावयाचे असुन खर्चाचे लेखे ठेवणे तसेच भौतिक व आर्थिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी वैदयकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची राहिल. सदर योजनेचा खर्च प्रति प्रा.आ.केंद्र र.रु.3,20,000/-  प्रमाणे 33 प्रा.आ.केंद्रासाठी  एकुण र.रु.1,05,60,000/- किंवा अंदाज पत्रकिय तरतुद यापैकी कमी असलेल्या रकमेच्या मर्यादेत जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधितुन करावयाचा आहे.

 • लाभार्थी पात्रता

  योजना वैयक्तिक लाभाची नसल्याने लाभार्थी निवड निकष नाहीत.   

 • यशोगाथा

  सदर योजनेचा सन 2017-18 या वित्तीय वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास विदयुत परुवठा व संदर्भ सेवा देणे तसेच रुग्णांना तातडीची औषधे, नवजात बालकास किट इ. बाबी प्रा.आ.केंद्रस्तरावरुन पुरविल्या गेल्याने अर्भकमृत्यु, बालमृत्यु व मातामृत्यु प्रमाण कमी होऊन संस्थेतील प्रसुतीचे प्रमाण 100 टक्के झाले आहे.

                    विविध प्रकारच्या आरोग्य विषयक कार्य्क्रमांच्या जनजागृती  मुळे शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचुन योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत झाली आहे. 

 • छायाचित्र दालन