स्वच्छ भारत मिशन (SBM)

विभाग : स्वच्छ भारत मिशन
प्रस्तावना

भारतामध्ये सर्व प्रथम 1986 साली केंद्रीय पुरस्कृत ग्रामीण परिसर स्वच्छता कार्यक्रम (Centraly Sponsored Rural Sanitation Programme) सुरु झाला. स्वच्छतेशी निगडीत असलेला हा पहिला कार्यक्रम प्रामुख्याने ग्रामीण लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारणे हे उद्दिष्ट समोर ठेवून सुरु केला होता. सन 1991 च्या जनगणनेत प्रथम घरांमधील शौचालयाची आकडेवारी जमा केली गेली होती. तेंव्हा ग्रामीण भागात हे प्रमाण निराशाजनक असल्याचे आढळून आले. केंद्र सरकारने देशभरातील 67 जिल्हयांमध्ये सन 1999 साली क्षेत्र सुधारणा पथदर्शक कार्यक्रम सुरु केला. प्रस्तावित मागणीधिष्ठीत पध्दतीतून काय बोध घेता येईल असा विचार यामागे होता. यासाठी महाराष्ट्रातून अमरावती, नांदेड, धुळे व रायगड या चार जिल्हयांची निवड करण्यात आली. सन 1986 ते 1999 या काळात या कार्याक्रमाच्या धोरणात आवश्यक बदल करण्यात आले. आज हा कार्यक्रम “उदिष्टांवर अधारित नसून तो मागणी अधारित” झाला आहे.

ग्रामीण भागांतील लोकांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागरुकता वाढविण्यासाठी आणि स्वच्छता सुविधांची मागणी निर्माण करण्यासाठी सन 1999 पासून संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून माहिती, शिक्षण व संवाद, मानवी संसाधन विकास, क्षमता उभारणी कार्यक्रम यावर भर देण्यात आला.

स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संपूर्ण स्वच्छतेची खात्री करुन उघडयावर मलविसर्जन करण्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने दिनांक 1/4/2012 पासून निर्मल भारत अभियान सुरु करण्यात आले. स्वच्छतेच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना राष्ट्रपिताच्या हस्ते निर्मल ग्राम पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला. यानंतर दिनांक 2 ऑक्टोंबर 2014 पासून स्वच्छतेचा हा कार्यक्रम “स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)” या नावाने सर्व भारतभर राबविण्यांत येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील तसेच दारिद्रये रेषेच्या वरील आर्थिकदृष्टया मागास कुटूंबांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान देण्यांत येते. तसेच ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम आणि सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठीही ग्राम पंचायतींना अनुदान देण्यांत येते. वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करुन त्याची सवय लागावी यासाठी स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत माहिती शिक्षण व संवाद (IEC) आणि क्षमता वर्धन या घटकांवर विशेष भर दिला जातो.

प्रोत्साहन पर अनुदान वितरीण व्यवस्था

  • लाभार्थी कुटूंबाने वैयक्तीक शौचालय बांधकाम पुर्ण करुन वापर सुरु केल्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरुन ग्रामसेवक खात्री करुन झाल्यावर गटविकास अधिकारी, पंचायत समितीकडे प्रोत्साहन पर निधी मागणी करावी.
  • तालुकास्तरावर गटसमन्वयक, समुहसम्वयक आणि संबधित विस्तार अधिकारी शौचालयांची मागणीनुसार खात्री करतात व गट विकास अधिकारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे प्रोत्साहनपर अनुदानाची एकत्रित मागणी करतात.
  • तालुक्याची मागणी प्राप्त होताच या मागणीतील लाभार्थ्यांची पायाभुत सर्वेक्षणानसुार नमुना चाचणी जिल्हा कक्षास केली जाते. तसेच तालुका संपर्क अधिकारी अधिका-यांकडुनही नमुना तपासणी 10% करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्र दिल्यावर मुख्य कार्यकरी अधिकारी यांच्या मान्यतेने तालुक्यास निधी धनादेशाद्वारे वितरीत केला जातो.
  • जिल्हयाकडुन निधी प्राप्त होताच संबधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार लाभार्थीनिहाय ग्रामपंचायतींना तालुकास्तरावरुन निधी RTGS अथवा धनादेशाद्वारे वितरीत केला जातो.
  • तालुक्याकडुन प्राप्त अनुदान लाभार्थीनिहाय झालेले प्रोत्साहनपर अनुदान RTGS/ धनादेशाद्वारे संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरीत केले जाते.
  • योजनेचे उद्देश
    • ग्रामीण क्षेत्रातील सर्वसाधारण जीवनमानात सुधारणा घडवुन आणणे.
    • ग्रामीण स्वच्छ्तेच्या व्याप्तीची गती वाढवुन सन 2019 पर्यंत देशातील सर्व ग्रामपंचायतीना निर्मल दर्जा मिळवुन देऊन स्वच्छ भारताचे स्वप्न पुर्ण करणे
    • शाश्वत स्वच्छ्तेच्या साधनांचा प्रसार करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि सामाजिक गटांना जाणीव जाग्रुती व आरोग्य शिक्षण याद्वारे प्रेरीत करणे.
    • सर्व शिक्षा अभियान अंतर्गत (SSA) येत नसलेल्या शाळा व अंगण्वाडयांना सुयोग्य स्वच्छता सोयी पुरविणे आणि विद्यार्थाना आरोग्य शिक्षण आणि स्वच्छतेच्या सवयी याबद्दल महिती देणे.
    • पर्यावरणाच्या दष्टीने सुरक्षित, कायम स्वरुपी स्वच्छेतेसाठी स्वस्त आणि योग्य तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे.
    • ग्रामीण भागात सार्वत्रिक स्वच्छता राखण्यासाठी लोकांचे व्यवस्थापन असलेल्या आणि घनकचरा व सांडपाण्याच्या विल्हेवाटीला प्राधान्य देणाऱ्या पर्यावरणानुकुल स्वच्छतेच्या पध्दती विकसीत करणे.
  • योजनेचे स्वरूप

    निधीचा स्त्रोत:-

    स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हि केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्यामध्ये 60 % निधी केंद्र हिस्सा व 40 % निधी राज्य हिस्सा कडुन प्राप्त होणारा निधी खालील 6 घटकावर खर्च होतो व तो खालील प्रमाणात वितरीत केला जातो.

    अ.क्र घटक तपशील निधी
    केंद्र राज्य
    1 वैयक्तिक शौचालय स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अभियानातील सर्व प्रवर्गासाठी 9000/- 3000/-
    2 माहिती शिक्षण व संवाद एकुण प्रकल्प किमंतीच्या 5% 75% 25%
    3 फिरता निधी एकुण प्रकल्प किमंतीच्या 5% (प्रति जिल्हा रक्कम रु50 लाखापर्यंत) 80% 20%
    4 सार्वजनिक शौचालय रक्कम रु 2 लक्ष (Per Unit) ( 10) 60% 30%
    5 प्रशासकिय खर्च एकुण प्रकल्प किमतीच्या 2% 75% 25%
    6 घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन (भांडवली किमंत) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण प्रमाणे कुटूंबनिहाय 75% 25%

    स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पायाभुत सर्वेक्षण 2012 च्या यादीतील पात्र लाभार्थी कुटूबाना 2 ऑक्टोबर 2014 पासुन वैयक्तीक शौचालय बांधकाम करुन त्याचा वापर करणा-या कुटूंबास रु. 12000/- इतके प्रोत्साहन पर अनुदान वितरीत जिल्हस्तरावरुन वितरित केला जातो.

  • लाभार्थी पात्रता
  • यशोगाथा

    हात धुवा मोहिम

    विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्वं शाळांमध्ये ‘हात धुवा’ मोहिम राबविण्यांत आली.

    काही अनुभव सुखवणारे (Good Response):-

    आदिवासी गावामध्ये सरपंच व ग्रामस्थानी स्वत: पुढाकार घेवुन एकत्रितरित्या साहित्य खरेदी करुन मोठया प्रमाणावर शौचालय बांधकाम

    करण्यात आले.

    ग्रामपंचायत नांदवळ यशोगाथा:-

    • नांदवळ ग्रामपंचायतीमध्ये बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 262 कुटूंबे असुन त्यातील 17 कुटूंबांकडे शौचालय असल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंब हि उघडयावर शौचास जात होती.
    • प्रथम नांदवळ ग्रामपंचायत मध्ये रोटरी क्लब ऑफ हिल हया सामाजिक संस्थेने भेट देऊन गावातील कुटूंबांची अडचण पाहुन तेथे शौचालय बांधकाम करणेसाठी पुढाकार घेतला.
    • शौचालय बांधकाम करणेसाठी प्राधान्याने युनिसेफ व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)ठाणे यांच्या संयुक्त्‍ प्रय त्नाने तांत्रिक मार्गदर्शन व लोकसहभाग मिळविण्यासाठी सहभाग दर्शविला.
    • रोटरी क्लब ऑफहिल यांचे निकषानुसार लाभार्थी हिस्सा 3000/- रु तर रोटरी क्लब ऑफ हिल यांचे 15000/- असे एकूण 18000/- रुपयांत शौचालय बांधकाम करण्यात आले.
    • रोटरि क्लब ऑफ.हिल या संस्थेमुळे एकूण 161 शौचालय बांधकामे पुर्ण करण्यात आली.

    ग्रामपंचायत कोठारे ,तालुका शहापुर यशोगाथा:- ( एक अदिवासी महिलेने घेतलेला पुढाकार)

    बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 525 कुटूंबे असुन त्यातील 299 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. आदिवासी डोंगराळ

    भाग असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची उदासिनता दिसुन आली. मोठया प्रमाणात हि कुटूंब उघडयावर शौचास जात होती.

    • गावात आदिवासी सरपंच श्री मधुकर भसाडे व महिला उपसरपंच श्रीमती सखुबाई भस्मा यांच्या प्रयत्नाने एकूण 75 शौचालय बांधकामे पुर्ण झाली आहेत. आजमितीस उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत.

    ग्रामपंचायत खरीवली,तालुका शहापुर यशोगाथा:- (एका उपसरपंचाने शौचालयाकरीता केलेला सहकार्य )

    1. बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 372 कुटूंबे असुन त्यातील 311 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. खरीवली स ही ग्रुप ग्रामपंचायत असुन यात जमिन पाण्याची (दलदलीची) व अडचणीची असल्याने तेथे शौचालय बांधकामाबाबतची काम करतांना प्रथम सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभा घेऊन जिल्हा व तालुका समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचतगट तसेच ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन उपसरपंच श्री योगेश कष्णा भोईर यांनी पुढाकार घेऊन गावात विट,सिमेंद,रेती, शौचालय भांडी ,सिमेंट पत्रे ,बेसीन व गवंडी उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतली व कामास गति मिळाली.
    2. ग्रामपंचायतीमध्ये एकूण आजमितीस 181 कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरित कामे प्रगति पथावर आहेत.

    ग्रामपंचायत चरगाव व आंबेशीव ,तालुका अंबरनाथ यशोगाथा:- ( महिला ग्रामसेवकाचे प्रयत्न पण योजनेकडे गावक-यांची पाठ )

    1. ग्रामपंचायत चरगाव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 611 कुटूंबे असुन त्यातील 390 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. उर्वरित कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती भोईर यांनी आदिवासी सरपंच यांच्या मदतीने स्वत: साहिल्य खरेदीकरुन शौचालय बांधकामास सुरुवात केली यात गावाचा कोणताहि सहभाग नसतांना 310 कुटूंबांकडे शौचालय बांधकाम करण्याचे काम केले.
    2. योजना शासनाची आहे त्यामुळे बांधकामे शासनाने करावी अशी गावक-यांची धारणा आहे , परंतु ग्रामसेवकांचे योजना राबविण्यासाठी प्रयत्न
    3. ग्रामपंचायत आंबेशीव तालुका अंबरनाथ येथे बेसलाईन 2012 च्या सर्वेक्षणानुसार 321 कुटूंबे असुन त्यातील 244 कुटूंबांकडे शौचालय नसल्याचे दिसुन आले. त्यापैकी 150 कुटूंबासाठी महिला ग्रामसेवक श्रीमती चव्हाण यांनी प्रयत्न शौचालय बांधकामे पुर्ण केली व पुढील कामे प्रगतिपथावर आहेत.
  • छायाचित्र दालन

सूचना फलक