प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

विभाग : बांधकाम विभाग
प्रस्तावना
 • योजनेचे उद्देश

  सदर योजनेअंतर्गत सन 2001 च्या जनगणनेनुसार, न जोडलेल्या वाडया-वस्त्या बारमाही रस्त्याने जोडणे. अस्त्त्विातील दुरावस्था झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्यांची दर्जोन्नती करणे.

  तसेच

  राज्यातील न जोडलेल्या वाडया-वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधान मंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत अंतर्भूत न झालेल्या अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे. यासाठी प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर सदर योजना राबविण्यात येत आहे.

 • योजनेचे स्वरूप

  सन 2001 च्या जनगणनेनुसारआदिवासी क्षेत्रातील 250 व त्यापेक्षा अधिक तसेच बिगर आदिवासी क्षेत्रातील 500 व त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली गावे.

  रस्त्याची निवड PMGSY अंतर्गत विचारात घेतलेल्या निकषानुसार म्हणजे (Pavment Condition Index) व तालुका निहाय रस्त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल.

  1. लोकसंख्या 500 पेक्षा अधिक लोकसंख्येचा विचार करण्यात येईल.
  2. मात्र यामध्येही नदीघाट किंवा वाळूच्या उत्खननामध्ये ज्या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.
  3. उपरोक्त 1 येथे नमुद केलेल्या निकषात ज्या गावांची निवड झालेली असेल त्या ग्रावांनी त्यांना उपलब्ध झालेल्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 15% टक्के निधी स्वइच्छेने दिल्यास त्याचा प्राथम्याने विचार करण्यात यईल.
  4. वरील 1 मध्ये नमूद प्रक्रियेप्रमाणे निवड झालेल्या रस्त्यावरील राज्य परीवहन महमंडळ यस्टीच्या फे-यांची संख्या विचारात घेण्यात येईल.म्हणजे ज्या ग्रामीण रस्त्यावर जास्त वरदळ आहे, अशा रस्त्यांचा प्राधान्यतेने विचार करण्यात यईल.

   वरील 1 ते 5 यांना गुण देण्यात येतील व त्या मुल्यांकनाआधारे रस्त्यांची निवड करण्यात येईल.

  5. दर्जोन्नतीसाठी रस्ते विकास आराखडयानुसार राज्यातील अस्तित्वात असलेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण यांची लांबी 50 % गुण व त्या जिल्हयाच्या मानव विकास निर्दशांकास 50% गुण या आधारे त्या जिल्हयास अनुदेय होणारी लांबी विचारात घेऊन प्रत्यक जिल्हांतर्गत तालुकानिहाय उद्दहष्टये निश्यिच करण्यात येईल. प्रत्येक जिल्हयांअतर्गत तालुक्याच्या भौेगेलिक क्षेत्रानुसार तालुका निहाय उद्दीष्ट निश्चित करण्यात येईल.
 • लाभार्थी पात्रता
 • यशोगाथा
 • छायाचित्र दालन