बंद

    आरोग्य विभाग

    विभागाबद्दल माहिती

    आरोग्य विभाग हा जिल्हा परिषदे मध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागां पैकी एक महत्वाचा विभाग आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हेया विभागाचे प्रमुख असतात. ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत एकुण 33 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 209 उपकेंद्रे, 4 वैद्यकीय भरारी पथके, 5 प्राथमिक आरोग्य पथके, 2 जि.प.दवाखाने, 1 आयुर्वेदिक दवाखाना  आरोग्य सेवा देत आहेत.

    प्राथमिक आरोग्य केंद्र :-

    प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व  तातडीच्यावैद्यकीयसेवांचीउपलब्धता, बाहयरुग्ण कक्ष, 6 खाटांचे आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, (कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया) प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्राकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात. बिगर आदिवासी क्षेत्रासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये 13 व आदिवासी क्षेत्रासाठीप्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 14 अधिकारी/कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्वच्छता व वाहन सेवा कंत्राटी पध्दतीने देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सर्व राज्यांमध्ये प्रा. आ. केंद्राची रचना ही समान आहे. ही सर्व प्रा.आ.केंद्र जिल्हा परिषदेच्या नियंञणाखाली येतात.

    उपकेंद्र :-

    उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक(पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा 3 पदांस शासनाने मान्यता दिली आहे.

    प्राथमिक आरोग्य पथक :-

    ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासुन वंचित व अर्धवंचित ग्रामस्थांना त्यांच्या गावांमध्ये आरोग्य सेवेची सुविधा पुरविणे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत निदानात्मक उपचार पुरविण्याची तरतुद आहे. अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांसह निदानात्मक सुविधा पुरविणे. बालमृत्यु, मातामृत्यु दरात घट करुन आर्युमान वृध्दी करणे हाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

    आर्युवेदिक दवाखाने :-

    ठाणे जिल्हयामध्ये आयुष विभागाअंतर्गत 1 आयुर्वेदिक दवाखाना कार्यरत असन सदर दवाखान्यांमार्फत ग्रामीण भागामध्ये आयुर्वेंदिक उपचार केले जातात. आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता व परिचर कार्यरत असतात.

    राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हयात खालील आरोग्य संस्था कार्यरत आहेत.

    शासनाचे निकषानुसार साधारणत: बिगर आदिवासी भागात 30 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत प्रत्येक 5 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आदिवासी भागाकरिता 20 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य व 3 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे.  ठाणे जिल्हयात शहापूर हा तालुका संपुर्ण आदिवासी आहे. भिवंडी व मुरबाड हे अंशत: आदिवासी तालुके आहेत. व कल्याण व अंबरनाथ हे शहरी तालुके आहेत.

    परिचय

    विभाग प्रमुखाचे नाव डॉ. गंगाधर परगे
    पदनाम जिल्हा आरोग्य अधिकारी
    दुरध्वनीक्रमांक 022-20812885
    ईमेलआयडी thanedhozp[at]gmail[dot]com

    व्हिजन आणि मिशन

    • ग्रामीणभागातीलप्रत्येक व्यक्तींला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरुन वैद्यकीय सेवा पुरविणे व आरोग्य विषयक योजनाचा लाभ मिळवुन देणे.
    • सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक सुविधांच्या दर्जा उंचावणे, प्रशिक्षणाद्वारे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे तांत्रिक ज्ञान व रुग्णसेवेप्रतिनिष्ठ उंचावणे, नियमावलीनुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे तत्काळ संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे पर्यावरण पूरक नैसर्गिक ऊर्जास्त्रोताचा वापर करणे.
    • प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुपांतरण करणे.

    उद्दीष्टे कार्येमजकूर

    • प्रा.आ. केंद्रांनी आरोग्य संवर्धनाचे काम करावे तसेच आरोग्य सेवेचा विस्तार ग्रामीण भागात व्हावा ही प्रा.आ. केंद्राकडुन अपेक्षा आहे.
    • आरोग्य शिक्षण हा या कार्यक्रमाचा आवश्यक (मुलभूत) भाग आहे. आरोग्य संवर्धनाचे काम करित असताना लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे, व त्यांचे पूर्ण सहकार्य मिळविणे आणि त्यांचा सहभाग प्राप्त करणे.
    • मातामृत्यु प्रमाण कमी करणे, 2. अर्भक मृत्यु प्रमाण कमी करणे, 3. आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारणे, 4. असंसर्गजन्य आजाराचे प्रमाणे व त्यामुळे होणाऱ्या गुतागुती रोखणे हे आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे.

    प्रशासकीय सेटअप

    या सर्व आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी पदे मंजूर आहेत.

    1. जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1)                  01
    2. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 01
    3. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 01
    4. जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी (वर्ग 1) 01
    5. प्रशासकिय अधिकारी (वर्ग 2) 01
    6. सांख्यिकी अधिकारी (वर्ग 2) 01
    7. जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (वर्ग 2) 01
    8. सांख्यिकी पर्यवेक्षक 01
    9. सांख्यिकी अन्वेषक 01
    10. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 01
    11. प्रोजेक्टनिस्ट 01
    12. आर्टिस्ट कम फोटोग्राफर 01
    13. सार्वजनिक आरोग्य परिचारीका 02
    14. शितपेटी तंत्रज्ञ 01
    15. तालुका आरोग्य अधिकारी 05
    16. वैद्यकिय अधिकारी (गट अ) 57
    17. वैद्यकिय अधिकारी (गट ब) 25
    18. आरोग्य पर्यवेक्षक (पुरूष)सरळसेवा        05
    19. आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती             16
    20. आरोग्य सहाय्यक (पुरूष) पदोन्नती 50
    21. आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदोन्नती 38
    22. आरोग्य सेवक (पुरूष) सरळसेवा 122
    23. आरोग्य सेवक (पुरूष) पदोन्नती 12
    24. आरोग्य सेवक (स्त्री) सरळसेवा 346
    25. औषध निर्माण अधिकारीसरळसेवा       41
    26. प्रयोगशाळा तंत्रज्ञसरळसेवा        18

    पुरस्कारआणि प्रशंसा

    • पुरस्काराचे शीर्षक*- कायाकल्प पुरस्कार ( NQAS Award )
    • पुरस्काराचे वर्ष*- 2024-25
    • पुरस्काराचे नाव*- प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा व वर्जेश्वरी यांना केंद्रस्तरीय

    (National Level ) कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला.

    • पुरस्काराची तारीख- 2024-25

    संघटनात्मक रचना

    जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय ठाणे
    Sl No. पद नाव
    1 जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे
    2 अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार
    3 जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील
    4 प्रशासकीय अधिकारी डॉ. स्वाती पाटील
    5 जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोषी शिंदे
    6 जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दिनेश सुतार
    7 जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अर्चना मोहिते
    8 जिल्हा कुष्ठरोग अधिकारी डॉ. मनीष रेगे
    9 जिल्हा आयुष अधिकारी डॉ. बालाजी गावडे
    10 जिल्हा प्रशिक्षण पथक डॉ. अंजली चौधरी
    11 तालुका आरोग्य अधिकारी – अंबरनाथ डॉ. नलिनी ठोंबरे
    12 तालुका आरोग्य अधिकारी – भिवंडी डॉ. भाग्यश्री सोनपिंपल
    13 तालुका आरोग्य अधिकारी – शहापूर डॉ. आशा मुंजाळ
    14 तालुका आरोग्य अधिकारी – कल्याण डॉ. श्रीधर बनसोडे
    15 तालुका आरोग्य अधिकारी – मुरबाड

    संलग्नकार्यालये

    • जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय ठाणे
    • जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय
    • जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय
    • जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालय
    • जिल्हा प्रशिक्षण पथक
      • तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती स्तर
        • प्राथमिक आरोग्य केंद्र
          • उपकेंद्र
        • प्राथमिक आरोग्य पथक
        • जिल्हा परिषद दवाखाना

    संचालनालय/आयुक्तालय

    • आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य कार्यालय मुंबई
    • संचालक, आरोग्य सेवा, रा.कु.क.मा.बा.सं.व शा.आ, राज्य कार्यालय मुंबई व पुणे

    मंडळे/उपक्रम

    • उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, मंडळ कार्यालय ठाणे

    कोण कोण आहे (संपर्कतपशील)

    जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे
    Sl No. नाव पदनाम ई-मेल पत्ता पत्ता फोन क्रमांक फॅक्स क्रमांक
    1 डॉ. गंगाधर परगे जिल्हा आरोग्य अधिकारी thanedhozp[at]gmail[dot]com वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे 022-20812885
    2 डॉ. दिनेश सुतार अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी thanedhozp[at]gmail[dot]com वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे
    3 डॉ. स्वाती पाटील जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी thanedhozp[at]gmail[dot]com वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे
    4 डॉ. स्वाती पाटील प्रशासकीय अधिकारी thanedhozp[at]gmail[dot]com वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे
    5 डॉ. बालाजी गावडे जिल्हा आयुष अधिकारी thanedhozp[at]gmail[dot]com वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प. मुख्यालय ठाणे

    निर्देशिका

    आरोग्य सेवा विभाग
    Sl No. नाव पदनाम ई-मेल पत्ता पत्ता फोन क्रमांक फॅक्स क्रमांक
    1 श्रीमती. कादंबरी बळकवडे आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ.अ mdnrhm०९[at]gmail[dot]com मुंबई ०२२-२२७१७५१८

     

    सेवा

    • राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
    • राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम
    • सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
    • राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम
    • राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
    • राष्ट्रीय कर्करोग मधुमेह व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम
    • साथरोग नियंत्रण कार्यक्रम
    • कॉलरा नियंत्रण कार्यक्रम
    • एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प
    • राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
    • प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम
    • माता व शिशुरेखापथन (ट्रॅकिंग) कार्यक्रम
    • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
    • जननी सुरक्षा योजना
    • प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
    • नियमीत लसिकरण कार्यक्रम
    • बालकांमध्ये अचानक उद्भवलेला लुळेपणा बाल पक्षाघात
    • पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रजनन व लैंगिक आरोग्य योजना
    • गर्भधारणा पुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंद कायदा 1994
    • वैद्यकिय गर्भपात कायदा
    • राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम
    • नागरी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम
    • सहायक अनुदान योजना
    • राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
    • नवसंजीवनी योजना
    • मानव विकास कार्यक्रम
    • राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम
    • राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम

    फॉर्म

            आरोग्य विषयक विविध सेवा, कार्यक्रम व योजनाचे फॉर्म जिल्हयातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत उपलब्ध करुन दिले जातात.

    योजना/ उपक्रम

    केंद्र सरकार

    आरोग्य योजना माहिती
    Sl No. योजनेचे नाव कालावधी प्रारंभ क्षेत्र लाभार्थी फायदे अर्ज कसा करावा
    1 जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana) दि. 12 एप्रिल 2005 जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्र 1. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील गरोदर माता.
    2. पात्र महिलेस कितीही अपत्य असले तरी शासकीय किंवा मानांकित आरोग्य संस्थेत प्रसूती झाल्यास लाभ देय.
    1. घरी प्रसूती झाल्यास रु. 500/-
    2. ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी – रु. 700/-
    3. शहरी क्षेत्रातील लाभार्थी – रु. 600/-
    4. सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी तज्ञास रु. 1500/-
    जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत अर्ज भरला जातो.
    2 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना जानेवारी 2017 जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्र • पहिल्या खेपेच्या सर्व गरोदर व स्तनदा माता.
    • दुसऱ्या खेपेस मुलगी अपत्य असलेल्या सर्व स्तनदा माता.
    • पहिल्या अपत्यासाठी दोन टप्प्यात रु. 5000/-
    • पहिला टप्पा रु. 3000/- – गरोदरपण नोंदणी व प्रसूतीपूर्व तपासणी.
    • दुसरा टप्पा रु. 2000/- – जन्मनोंदणी व प्राथमिक लसीकरण पूर्ण.
    • दुसरी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात रु. 6000/-.
    आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत ऑनलाईन अर्ज भरला जातो.
    नोंदणीसाठी: https://pmmvy.wcd.gov.in/

    राज्य सरकार

    आरोग्य योजना माहिती
    Sl No. योजनेचे नाव कालावधी प्रारंभ क्षेत्र लाभार्थी फायदे अर्ज कसा करावा
    3 मानव विकास कार्यक्रम दि. 29 जून 2006 जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुका अनु. जाती, अनु. जमाती व दारिद्र रेषेखालील गरोदर व स्तनदा माता प्रसूतीपूर्व रक्कम रु. 2000/-
    प्रसूती पश्चात रक्कम रु. 2000/-
    जिल्ह्यातील शहापूर व मुरबाड तालुक्यातील आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी,
    आरोग्य सेवक/सेविका, गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत अर्ज भरला जातो.

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे

    बजेट माहिती

    बजेट माहिती

     

    सार्वजनिक आरोग्य जि.प. योजना सन 2024-25 सुधारित व 2025-26 मुळ अर्थसंकल्प
    अ. नं. लेखाशिर्ष योजनेचे नांव सन 2024-25 जि.प. सुधारित अंदाजपत्रकीय तरतुद सन 2025-26 जि.प. मुळ अंदाजपत्रकीय तरतुद
    1 2210-0101 लिनन व गाद्या व फर्निचर साहित्य खरेदी करणे 1000000 1000
    2 2210-0102 द्रवरुप क्लोरीनचा पुरवठा करणे 300000 300000
    3 2210-0104 मुख्यालयातील जि.प. दवाखान्यासाठी औषध व सामुग्री पुरवठा तसेच औषध भांडार देखभाल दुरुस्ती इत्यादी 200000 200000
    4 2210-0105 साथीचे आजार / सर्पदंश / विंदुदंश / श्वानदंश लस व औषध साहित्य खरेदी 7500000 11500000
    5 2210-0106 आरोग्य विषयक कार्यक्रमाबाबत प्रसिध्दी / छपाई साहित्य व संगणक खरेदी 2500000 2500000
    6 2210-0107 यात्रा / आपत्कालिन घटनेत सोयी सुविधा पुरविणे 500000 500000
    7 2210-0108 सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करणे 11000000 25000000
    8 2210-0109 गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी 3000000 2500000
    9 2210-0110 गरोदर मातांची प्रयोगशाळा चाचणी तपासणी 1500000 1500000
    10 2210-0112 कर्करोग, हृदयरोग, किडणी अशा दुर्धर आजारी रुग्णांना आर्थिक मदत 500000 500000
    11 2210-0113 आरोग्य संस्थांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा 1300000 0
    12 2210-0116 आरोग्य विभागाच्या अत्यावश्यक निकडीच्या बाबींचा खर्च 6000000 6000000
    13 2210-0117 शव वाहिनी / बहुउद्देशीय वाहन अनुषंगिक खर्च 500000 0
    14 2210-0118 नाविन्यपूर्ण योजना – प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ऑनग्रिड सोलर प्रणाली बसविणे 500000 0
    15 2210-0119 प्रा. आ. केंद्र व मुख्यालयासाठी सुरक्षा रक्षक सेवा 2000000 0
    16 2210-0120 प्रा. आ. केंद्राकरिता स्वच्छता सुविधा पुरविणे 3300000 3300000
    17 2210-0121 मुख्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संगणक, इंटरनेट व ई-ऑफिस सुविधा 2000000 500000
    18 2210-0122 महाआरोग्य शिबीर आयोजित करणे 3000000 3000000
    19 2210-0123 ग्रामीण आरोग्य संस्थांसाठी औषधे / साहित्य वाहतूक खर्च 200000 50000
    20 2210-0124 आपत्कालीन परिस्थितीत बास्केट स्ट्रेचर खरेदी 200000 0
    21 2210-0125 गुणवंत वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुणगौरव 500000 200000
    22 2210-0126 सॅम / मॅम बालकांना CTC / NRC मध्ये संदर्भ सेवा 500000 200000
    23 2210-0127 शवविच्छेदनासाठी खाजगी स्वीपर सेवा 500000 500000
    24 2210-0128 प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील CTC कार्यान्वित करणे 2000000 200000
    25 2210-0129 तालुका आरोग्य अधिकारी यांना पर्यवेक्षणासाठी वाहतूक सेवा 500000 0
    एकूण 51000000 58451000

     

    नागरिकांची सनद 2025-26

    नागरिकांची सनद (आरोग्य विभाग)
    अ. नं. सेवांचा तपशील सेवा पुरविणारे अधिकारी नाव व हुद्दा सेवा देण्याची विहीत मुदत तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
    1 1. गरोदर मातांची नोंदणी / तपासणी व उपचार
    2. सर्व प्रकारचे लसीकरण
    3. लोहयुक्त गोळ्या व जीवनसत्वांचे वाटप
    4. बाळंतपणाच्या सुविधा व प्रसूतीपश्चात सेवा
    5. निरोध, गर्भनिरोधक गोळ्या वाटप व तांबी बसविणे
    6. आरोग्य सेवा सत्राचे आयोजन
    7. हिवताप, अतिसार, न्युमोनिया उपचार
    8. मोतीबिंदू रुग्ण नोंदणी
    9. लैंगिक आजार माहिती व उपचार
    10. कुष्ठरोग व क्षयरोग शोध व उपचार
    11. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अमलबजावणी
    12. किरकोळ आजार उपचार
    13. गंभीर रुग्णांसाठी संदर्भ सेवा
    14. छोट्या शस्त्रक्रिया
    15. श्वानदंश / सर्पदंश लस व उपचार
    16. अपघात / न्याय-वैद्यक प्रकरणे तपासणी
    17. प्राथमिक प्रयोगशाळा तपासणी
    18. बालकांना BCG / पोलिओ / गोवर लस
    19. गरोदर स्त्रियांना धनुर्वात प्रतिबंधक लस
    20. कुटुंब नियोजन माहिती व साधन वाटप
    21. ताप रुग्णांवर गृहभेट उपचार
    22. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिक्षण
    23. जननी सुरक्षा योजना
    वैद्यकीय अधिकारी,
    तालुका आरोग्य अधिकारी,
    परिचारिका / प्रसाविका
    वेळापत्रकानुसार दिलेल्या भेटीनंतर
    1) आगमनानंतर
    2) विविक्षित दिवशी
    3) शिबिरांच्या दिवशी
    जिल्हा आरोग्य अधिकारी
    2 कुटुंब कल्याण योजना संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणेनिहाय दरमहा जिल्हा आरोग्य अधिकारी
    3 गर्भवती मातांना बुडीत मजुरी देणे संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणेनिहाय दरमहा जिल्हा आरोग्य अधिकारी
    4 मातृत्व अनुदान (आदिवासी मातांसाठी) संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र लाभार्थीनिहाय जिल्हा आरोग्य अधिकारी
    5 गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्रा.आ.केंद्र प्रकरणेनिहाय जिल्हा आरोग्य अधिकारी
    6 गरोदर मातांची प्रयोगशाळा तपासणी संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणेनिहाय जिल्हा आरोग्य अधिकारी
    7 माता व बालकांना संदर्भ सेवा देणे (JSSK) संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकरणेनिहाय / तात्काळ वाहन उपलब्धतेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी
    8 प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र लाभार्थीनिहाय जिल्हा आरोग्य अधिकारी

     

    कार्यक्रम

    क्षयरोग निदानासाठी ए आय सक्षम X-ray मशिन

    TB XRay 1TB XRAY 2

    संकल्पना

    • गावस्तरावर AI Based Portable X-ray मशिन व्दारे तपासणी
    • नागरीकांचा प्रवास, वेळ व खर्च वाचणार असुन गावपातळीवर निदान व उपचार

    उद्दिष्टे

    • क्षयरोग मुक्त गाव करणे
    • दुर्गम भागात तत्पर सेवा देणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे

    कार्यपध्दती

    • वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , बाह्यरुग्ण ( OPD ) तपासणी व camp मधुन तसेच गृहभेटी मधुन संशयित रुग्णांचा शोध घेता येतॊ.
    • यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांना खात्रीशिर निदान करण्यासाठी Portable X-ray AI मशिनचा गावस्तरावर उपयोग करुन तपासणी करण्यात येते.

    निरीक्षण / परिणाम

    मार्च 2025 ते जून 2025 या कालावधीचा अहवाल
    अ. नं. तपशील संख्या
    1 सर्वेक्षण करण्यात आलेली लोकसंख्या 54114
    2 संशयित रुग्णांची X-ray व Sputum तपासणी 501
    3 संशयित मधून Positive क्षयरुग्ण 27
    4 Abnormal X-ray 50