बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    परिचय

    व्हिजन आणि मिशन –

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 14 विभागांपैकी एक विभाग आहे. कार्यकारी अभियंता हे विभागाचे प्रमुख असतात. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे, साधी विहीर दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीर घेणे, विद्युत पंप/सौर पंपाद्वारे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे, टंचाई कार्यक्रम राबविणे कामे प्रस्तावीत करण्यात येतात.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर-

    जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हर घर जल योजना करणे.

    सन 2009-2010 पासुन केंद्र शासन पुरस्कृतसुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीणपेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनामध्ये समाविष्ठ पुर्नरचना करणेत आली. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2025 पर्यत हर घर नल से जल (एफएचटीसी-एफ घरगुती नळ कनेक्शन ) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे. सन 2025 पर्यत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरांत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिअर प्रती दिन,गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्यिष्ठ आहे.

    योजनेचे निकष – 

    1. गावातील प्रत्येक घराला दररोज 55 ली. प्रती माणसी नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे.
    2. गावातील प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळांनाव अंगणवाड्यांना शुद्ध पाणी पुरवठा करणे.
    3. 30 वर्षे संकल्पीत लोकसंख्येला पुरेसा असेल असा उद्भव विकसीत करुन सदर उद्भवावरुन योजना आखने.
    4. यांत्रिकी उपविभाग

      यांत्रिकी विभागाच्या कार्यकक्षेमध्ये खालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

      व्यवस्थापकीय कार्य

      1. टंचाई तसेच आदिवासी उपयोजना, आमदार व खासदार निधी अंतर्गत नवीन विंधन विहिर घेणे व हातपंप बसविणे.
      2. अस्तित्वातील विंधन विहिरींची ग्रामपंचायतीबरोबर करार करुन देखभाल व दुरुस्ती करणे.
      3. विद्युत पंप व सौर पंपावर आधारीत लघु न.पा.पु.योजना करणे.
      4. हातपंपाची मागणी व वसुलीची माहिती अद्ययावत करणे व प्रत्यक्षात वसूली करणे.
      5. तांत्रिक कार्य

        1. देखभाल दुरुस्ती पथकाचे माध्यमातून करार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे अंतर्गत असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती करणे.
        2. विंधन विहिरींचे फ्लशिंग करणे.
        3. ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सर्वेक्षण करुन, छोट्या वाड्यांसाठी विंधन विहिरींवरुन विद्युत पंप व सौर पंपाच्या माध्यमातून लघु न.पा.पु.योजना करणे.
        4. नवीन विंधन विहिर घेणे
        5. देखभाल दुरुस्ती कक्ष

          4 मार्च 2011 चे शासन निर्णयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत देखभाल दुरुस्ती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.  देखभाल दुरुस्ती कक्षाच्या कार्यकक्षेमध्येखालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.

          व्यवस्थापकीय कार्य

          1. संपूर्ण जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची माहिती अद्ययावत ठेवणे
          2. ग्रामपंचायतीनिहाय पाणीपट्टी व देखभाल दुरुस्ती खर्चाचा आढावा घेणे
          3. विजेचा वापर कमी ठेवणेबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे
          4. घरगुती नळपाणी पुरवठा करीता कनेक्शन वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व लाभार्थ्यांना नियमित आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याकडे लक्ष देणे.
          5. लाभार्थ्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करणे.
          6. प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती करणे.
          7. पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, पुरक योजना करणे.

          तांत्रिक कार्य

          1. संबंधित ग्राम पंचायतींना पाणी पुरवठा योजनांच्या व आपत्कालिन परिस्थितीमध्ये तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षित करणे.
          2. पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत यास्तव प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत सूचना करणे.
          3. लाभार्थ्यांनी पाणी योजनांचा लाभ घेतला नाही तरी देखभाल दुरुस्ती कक्षाने सदर योजना सुरु राहिल याकडे लक्ष देणे
          4. योजनांच्या उभारणीत आवश्यक मानकानुसार निश्चित केलेया गुणवत्तेचेच साहित्य वापरात आणले जाईल याकडे लक्ष देणे.

          आर्थिक कार्य

          1. ग्रामपंचायत निहाय वार्षिक खर्चाची आकडेवारी इ. माहिती तयार करणे
          2. प्रोत्साहन अनुदानासाठीचे प्रस्ताव वेळच्यावेळी शासनास पाठविले जातील याकडे लक्ष देणे
          3. योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखभाल दुरुस्ती निधीमधून करणे.

          प्रशासकिय सेटअप-

          1. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
          2. उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, मुरबाड
          3. उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, भिवंडी.
          4. उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, कल्याण.
          5. उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अंबरनाथ.
          6. उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, शहापुर.

          जलयुक्त शिवार अभियान.

          सन २०१२-१३ मध्ये टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोकण विभागातील ५ जिल्हयांत जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये सर्व विभागाच्या समन्वयातून एकत्रितपणे वेगवेगळ्या योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. या अभियानात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून विभागात अस्तित्वातील जलस्तोत्र बळकटीकरण करणे, विंधन विहिर पाऊस पाणी संकलन व्यवस्था करणे इ. कामे हाती घेण्यात आली.

          अभियानाचा उद्देश :

          1. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
          2. राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे शेती साठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
          3. राज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे.
          4. भूजल अधिनियम अंमलबजावणी.
          5. अस्तित्वातील जलस्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढून जलस्रोतांचा पाणी साठा वाढविणे.
          6. योजना—

            योजनेचे उद्दीष्ट-

            • आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे.
            • पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
            • जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कामे हाती घेण्यात आली.