जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
परिचय
केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी करणे, बेघर व कच्चे घर असलेल्या गरजू कुटूंबांना अर्थसहाय्य करणे.
सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षण सन 2011 चे यादीचे आधारे लाभार्थीची निवड करण्यात येते.
सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षण सन 2011 चे यादीचे आधारे घरकुल लाभार्थीची निवड झाल्यानंतर लाभार्थीच्या राहत्या घराचा [कच्चेघर] Geo Tag, Job Card Mapping, निधी वितरित करण्यासाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्न करुन, पंचायत समितीला लाभार्थीची नावे जिल्हास्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित करते. जिल्हास्तरावरुन मान्यता प्राप्त लाभार्थी यांना तालुकास्तरावरुन थेट लाभ हस्तांतरण [DBT] नुसार लाभार्थीस पहिला हप्ता दिला जातो. लाभार्थीने स्वत:च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्याला स्वत:च्या अपेक्षेनुसार घर बांधता येईल, यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत नाही. या साठी काटेकोर प्रयत्न केले गेले आहेत.
घरबांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा व तालुकास्तरावरून आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला 2 रा, 3 रा, व अंतिम हप्ता भौतिक प्रगतीशी सुसंगत पध्दतीने अदा केला जातो. लाभार्थीस मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार 297/- रू प्रतीदिन इतकी रक्कम अदा केली जाते. स्वच्छ. भारत मिशन अंतर्गत बेसलाईन च्या यादीमध्ये असलेल्या लाभार्थीस शौचालय बांधणीसाठी स्वतंत्र्यपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या रुपरेषेनुसार बेघरांचे “स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते”.
व्हीजन आणि मिशन
बेघर व कच्चे घर असलेल्या गरजू कुटूंबांना अर्थसहाय्य करुन स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे |
उदिदष्टे कार्ये मजकूर
- केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योगधंदे काढण्याच्या दृष्टीनेआदर्श योजना तयार करणे.
प्रशासकिय सेटअप
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे | ||
प्रकल्प संचालक (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्ग) | ||
सहाय्य्क प्रकल्प संचालक (मविसे वर्ग-2) | ||
घरकुल शाखा | लेखा शाखा | प्रशासन शाखा |
कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता | सहाय्यक लेखाधिकारी (वर्ग-3) | कार्यालयीन अधिक्षक |
विस्तार अधिकारी | वरिष्ठ सहाय्यक | |
कॉम्प्युटर प्रोग्रामर | कनिष्ठ सहाय्यक | |
डेटा एन्ट्री ऑपरेटर |
विभागप्रमुख व कार्यालयातील कर्मचारी
अ.
क्र. |
अधिकारी/कर्मचारी यांचे नांवे | पदनाम | पत्ता | वर्ग | संपर्क क्र | ई मेल |
1 | श्रीम. छायादेवी शिसोदे | प्रकल्प संचालक | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
1 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
2 | श्रीम.आरती गगे | सहाय्यक प्रकल्प संचालक | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
2 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
3 | श्री.संजय दामोदर नंदनवार | सहाय्यक लेखा अधिकारी | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
3 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
4 | श्री.हर्षद जगन्नाथ मोरे | कार्यालयीन अधीक्षक | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
3 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
5 | रिक्त पद | शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता | – | – | – | |
6 | श्री. विजय कान्हा थोरात | विस्तार अधिकारी | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
3 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
7 | श्री. नारायण गोटीराम उंबरगोंडे | वरीष्ठ सहाय्यक | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
3 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
8 | श्रीम. सोनाली भगवान शेवाळे | कनिष्ठ सहाय्यक | पी.डब्लू.डी.
कंपाऊंड ठाणे (प) |
3 | 25369132
25334250 |
Drdathane2013@gmail.com |
नागरीकांची सनद
अ.क्र | सेवांचा तपशील | सेवा पुरविणारे अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा | सेवा पुरविणेची विहित मुदत | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा |
1. | योजना विषयक माहितीचा अधिकार प्राप्त झालेल्या अर्जावर सही करणे | माहिती अधिकारी तथा जन माहिती अधिकारी श्री.थोरात, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) | 30 दिवस | प्रकल्प संचालक |
2 | आस्थापना विषयक माहितीचा अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे | माहिती अधिकारी तथा कनिष्ठ प्रशासन अधिकारी | 30 दिवस | प्रकल्प संचालक |
3 | जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती (दिशा) | श्रीम. आरती गगे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,
श्री. विजय थोरात, वि.अ. (सां), श्री.हर्षद मोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. नारायण उंबरगोंडे, वरि.सहा |
16 दिवस | प्रकल्प संचालक |
4 | धनादेश काढणे व मासिक ताळमेळ घेणे | श्री. संजय नंदनवार, सलेअ | 7 दिवस | प्रकल्प संचालक |
5 | गोपनीय अहवाल पुर्तता करणे | श्री. नारायण उंबरगोंडे, वरि.सहा | वर्षाच्या एप्रिल पर्यंत | प्रकल्प संचालक |
6 | प्रकल्प संचालक यांची मासिक दैनंदिनी व संभाव्य फिरती कार्यक्रम मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर करणेत | श्री. नारायण उंबरगोंडे, वरीष्ठ सहाय्यक | महिन्याच्या 5 व 10 तारखेपर्यंत | प्रकल्प संचालक |
7 | आस्थापना विषयक सर्व कामे व सेवापुस्तके अदयावत करणे | श्री. नारायण उंबरगोंडे, वरि.सहा | 7 दिवस | प्रकल्प संचालक |
8 | वाहन देखभाल दुरुस्ती, इंधन अग्रीम, इंटरकॉम देखभाल दुरुस्ती, जडवस्तुसंग्रह नोंद व निर्लेखन, कार्यालयीन फर्निचर व साहित्य खरेदी, अभिलेख कक्ष | श्री. नारायण उंबरगोंडे, वरि.सहा | 15 दिवस | प्रकल्प संचालक |
9 | आवक जावक विभागातील टपाल | श्रीम.सोनाली शेवाळे, कनि.सहा | 1 दिवस | प्रकल्प संचालक |
10 | रमाई आवास योजना
राजीव गांधी घरकुल योजना मच्छीमार घरकुल योजना आदिम जमाती घरकुल प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) पारधी घरकुल योजना शबरी आदीवासी घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना PM-JANMAN प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्यास महाअभियान पंडीत दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी योजना |
श्री. विजय थोरात, वि.अ. (सां)
श्रीम. सोनाली शेवाळे, कनि.सहा |
30 दिवस | प्रकल्प संचालक |
योजना/उपक्रम
राज्य सरकार
अ.
क्र |
योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
1 | शबरी आदिवासी घरकुल योजना | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/-चार टप्प्यांत देण्यात येते तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशन मधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/-देय आहे व नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजूरीकरिता प्रति दिन र.रु.297/- प्रमाणे र.रु.26,730/- मजूरीच्या स्वरुपात दिली जाते.
|
1. लाभार्थी अनुसुचित जमाती संवर्गाचा असावा.
2. लाभार्थ्याकडे अनुसुचित जमातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. 3. महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्षे असावे. 4. लाभार्थीकडे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची अथवा शासनाची जमीन असणे आवश्यक आहे. 5. लाभार्थीकडे स्वत:चे अथवा कुटुंबाचे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे. 6. विधवा, परितक्त्या, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थींना प्राधान्य. 7. ग्रामीण क्षेत्रासाठी उत्पन्न मर्यादा रक्कम रु.1.20 लाख पर्यंत असावे. 8. लाभार्थ्यांने इतर योजनांमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. |
2 | आदिम जमातीच्या कुटुंबासाठी घरकुल योजना | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते. तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे व नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजूरीकरिता प्रतिदिन र.रु. 297/- प्रमाणे र.रु.26,730/- मजूरीच्या स्वरुपात दिली जाते. | 1. लाभार्थी हा कातकरी, कोलाम, माडीया-गोंड या आदिम जमातीचा असावा.
2. लाभार्थ्याकडे अनुसुचित जमातीचा दाखला असणे आवश्यक आहे. 3. घरकुल बांधकामास स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जागा असावी 4. लाभार्थीचे स्वत:चे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे. 5. यापुर्वी शासनाच्या कोणत्याही योजनेमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. |
3 | रमाई आवास योजना | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते. तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देयआहे व नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजूरीकरिता प्रतिदिन र.रु. 297/- प्रमाणे र.रु.26,730/- मजूरीच्या स्वरुपात दिली जाते | 1. लाभार्थी अनुसुचित जाती/नवबौध्द संवर्गातील असावा.
2. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे. 3. लाभार्थी बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे. 4. योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात यावा, विभक्त असल्यास रेशनकार्ड विचारात घ्यावे. 5. यापुर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 6. लाभार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखाच्या आत असावे. 7. सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) च्या प्रपत्र ड मध्ये असलेले अनुसुचित जाती तथा नवबौध्द घटकातील जे लाभार्थी रमाई आवास योजनेचे (ग्रामीण) अद्ययावत निकष पुर्ण करत असतील असे लाभार्थी रमाई आवास घरकुल या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र असतील. घर बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी |
4 | मोदी आवास घरकुल योजना
|
राज्यातील इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी घरकुल योजना
|
1.इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जातो.
2.राज्यस्तरीय बँक खात्यातून (SNA) लाभार्थ्यांच्या बैंक / पोस्ट खात्यामध्ये टप्पानिहाय निधी Awaas Soft व PFMS प्रणालीद्वारे DBT योजनेंतर्गत वितरीत करण्यात येतो. 3.घरकुल अनुदाना व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) (SBM) अंतर्गत पात्र लाभार्थ्यास शौचालयासाठी रु.12,000/- प्रोत्साहनपर अनुदान व मनरेगा (MGNREGA) अंतर्गत 90/95 इतक्या अकुशल मनुष्य दिवसांची मजूरी साधारणपणे रु.24,570/-देय. 4.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५०० चौ. फुट जागेपर्यंत रू. ५०,०००/- पर्यंत अनुदान देय.
|
5 | पंडीत दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना
|
केंद्र व राज्य पुरस्कृत योजना ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत
घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांस जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे.
|
1) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणारी जागा व गावठाण हद्दीबाहेरील
निवासी प्रयोजनासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने मंजूरी दिलेल्या जागा. 2) जिल्हाधिकारी वा शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय/संपादित जागा. 3) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 25 चौ.मी. घरकुलाचे बांधकाम करता येऊ शकते.याव्यतिरिक्त इतर मुलभूत सुविधा यासाठी घरकुलाच्या सभोतालची जागा गृहित धरल्यास साधारणपणे 500 चौ. फुटापर्यंत जागा प्रति लाभार्थी खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. 4) प्रत्यक्ष जागेचे क्षेत्रफळ हे प्रति लाभार्थी 500 चौ.फुटापर्यंत असल्यास प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रु.1,00,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य लाभार्थ्यांस देण्यात येईल. 5) जागेची किंमत रु.1,00,000/पेक्षा जास्त असल्यास व त्यावरील रक्कम लाभार्थी स्वत: देण्यास तयार असल्यास त्यास या योजनेचा लाभ देण्यात येईल. 6) प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतील पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांना लाभ लागू आहे. 7) या योजनेतील लाभार्थ्यांच्या निवडीसाठी गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. |
केंद्र सरकार
अ.
क्र |
योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
1 | प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.2,00,000/-देण्यात येते. तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे व नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजूरीकरिता प्रतिदिन र.रु. 297/- प्रमाणे र.रु.26,730/- मजूरीच्या स्वरुपात दिली जाते. | 1) लाभार्थी कोलाम, कातकरी व माडीया गोंड या आदिम जमातीमधील असावा.
2) लाभार्थ्यांकडे कुठेही पक्के घर नसावे. 3) लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसावा.
|
संयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)
अ.
क्र |
योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
1 | प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत (केंद्र हिस्सा- 60%, राज्य हिस्सा 40%) देण्यात येते. तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे व नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजूरीकरिता प्रतिदिन र.रु. 297/- प्रमाणे र.रु.26,730/- मजूरीच्या स्वरुपात दिली जाते. | सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC-2011) माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. |
अंदाजपत्रक माहिती
लेखाशिर्षनिहाय प्राप्त रक्कम व झालेला खर्च सन 2024-25 माहे डिसेंबर 2024 अखेर (रक्कम रुपये लाखात)
अ.क्र. | योजनेचे नांव | लेखाशिर्ष | एकूण प्राप्त निधी | झालेला खर्च |
1 | जिग्रावियं-प्रशासन- राज्य हिस्सा | 25152601 | 64.23 | 48.41 |
विक्री केंद्र प्रदर्शने | 25011993 | 0.00 | 0.00 |