बंद

    शिक्षण विभाग (माध्यमिक)

    विभागाबद्दल माहिती

    जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेवर शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार सनियंत्रण ठेवण्याचे काम करणे तसेच माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढविणे इ. प्रकारचे कामकाज करणे.

    व्हिजन आणि मिशन

    कार्यासनाचे कामकाज सांभाळणारे कर्मचारी सबंधित विषयांची संचिका खालीलप्रमाणे सादर करतात.

    आस्थापना विषयक बाबी -, कक्ष अधिकारी, अधिक्षक गट ब,  यांचेमार्फत शिक्षणाधिकारी  माध्यमिक  यांचेकडे अंतिम निर्णय / मान्यतेसाठी सादर केले जातात.

    लेखा विषयक बाबी – सहायक प्रशासन अधिकारी, अधिक्षक राजपत्रीत ,   यांचेमार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचेकडे अंतिम निर्णय व मान्यतेसाठी सादर केले जातात.

    सबंधित कार्यासनाचे कर्मचा-यांची तालुकास्तरावरून माहिती / अहवाल प्राप्त करून सादर करण्याची जबाबदारी आहे. व या कामांवर पर्यवेक्षण करण्याची सबंधित कार्यासनाच्या कर्मचा-यांची त्यांच्याकडे असलेल्या अभिलेखांचे अद्यावतीकरण करून ठेवण्याची जबाबदारी आहे.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर

    शिक्षण समिती सभा.

    शिक्षण समिति सभा दर महा घेणेची तरतूद आहे. या सभेच्या कामकाजात शिक्षण समितीतील सर्व जिल्हा परिषद सदस्य सहभाग घेतात. शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत माहिती संकल व या सभेचे आयोजन करण्यात येते. शिक्षण प्राथमिक विभागामार्फत शिक्षण समिति सभेसाठी विषय पत्रिका नोटीस सभेपूर्वी 10 दिवस अगोदर पाठविली जाते. सभेचे इतिवृत्त घेवून मा.अध्यक्ष, शिक्षण समिति यांचे मान्यतेने अंतिम करून सर्व सन्माननीय सदस्य यांना पाठविले जाते.

    प्रशासकीय सेटअप

    शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

    उप शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

    गट शिक्षणाधिकारी पं.स.(सर्व)

    विस्तार अधिकारी, शिक्षण (सर्व)

    केंद्र प्रमुख

    मुख्याध्यापक

    शिक्षक

    पुरस्कार आणि प्रशंसा

    आदर्श शिक्षक पुरस्कार

    सेवा

    1.शिक्षणाधिकारी(माध्यमिक)

    शिक्षण उप संचालक, मुबई विभाग मुंबई

    शिक्षण संचालक, पुणे

    शिक्षण आयुक्त, पुणे

    2.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे संनियंत्रण करणे.

    इ. 10 वी इ. 12 वी, टंकलेखन, लघुलेखन परिक्षेचे नियोजन व अंमलबजावणी करणे.

    3.शासन नियमानुसार विविध प्रकारच्या मान्यता देणे.

    अनुदानित माध्यमिक शाळांचे पेन्शन विषयक कामकाज करणे.

    शाळांना भेटी देणे व मार्गदर्शन करणे व गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करणे.

    4.मानव विकास अंतर्गत मुलीना मोफत बस सेवा, सायकल वाटप,

    विभागप्रमुख

    श्रीम.ललिता दहितुले,

    शिक्षणाधिकारी(माध्यमिक)

    जिल्हा परिषद, ठाणे

    दुरध्वनी क्रमांक –

    तळमजला

    दालन क्रमांक- तिसरा मजला

    योजना/ उपक्रम

    राज्य सरकार

    अ.क्र योजनेचे नाव योजनेचे स्वरुप योजनेचे निकष
    1 विज्ञान प्रदर्शन भरवणे विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण करणे प्राथमिक गट, माध्यमिक व आदिवासी गटात सहावी ते बारावीपर्यतचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.
    2 मानव विकास कार्यक्रम योजना
    8 वी ते 12 वी पर्यत मुलींना सायकल वाटप 1)विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी चालना मिळणे.             2) तसेच मुलींची शाळेतील गळती रोखणे 1)घरापासुन ते शाळेपर्यतचे अंतर 5 कि.मी             2)प्रती विद्यार्थीनीसाठी रु.5000/- थेट लाभार्थी विद्यार्थीनीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.
    गाव ते शाळा वाहतुक सुविधा उपलब्ध करुन देणे ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इ. 12 वी पर्यतचे शिक्षण घेणे शक्य घेणे शक्य व्हावे या करिता गाव ते शाळा दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देणे. गाव ते शाळा 5 कि.मी पेक्षा जास्त अंतर असणाऱ्या विद्यार्थीनीसाठी
    3 Inspire Award manak सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इ. 6 वी व 10 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. इ. 6 वी व 10 मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यानी विज्ञान व तंत्रज्ञान अंतर्गत्‍ नवोक्रम केद्रशासनाच्या www.inspireawards- dst.gov.in  या वेबसाईटवर  सादर करणे.

    केंद्र सरकार

    राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार.

    नागरिक सनद

    महाराष्ट्र शासनाच्या व शिक्षण विभागाकडून भविष्यात उज्वल पिढी घडविण्या करिता तसेच आर्थिक सामसजिक परिवर्तनाच्या दृष्टीने शैक्षणिक पायाभुत सुविधा निर्माण करण्या करिता विविध उपक्रम राबविण्यात येतात त्याची प्रत्येक्ष अमलबजावणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग माध्यमिक मार्फत जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर केली जाते.

    विभागाचे उद्दिष्ट 1. शिक्षणाचा दर्जा उंचावणे सर्व मुला मुलींचे प्राथमिक शिक्षण पुर्ण करणे.2. शाळांतील विद्यार्थ्यांची गळती कमी करुन 100% उपस्थितीचे उद्दष्टि साध्य करणे.3. ०६ ते १८ वयोगटातील शाळा सोडलेले, शाळेत कधीच न गेलेले स्थलांतरीत मुला व मुलीकरीता पर्यायी शिक्षणाचे उपक्रम राबविणे. 4. शैक्षणिक विकासासाठी असलेल्या खालील प्रमाणे केंद्र व राज्याच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात.

    १.      मानव विकास अंतर्गत मुलीना मोफत बस ,

    २.       सायकल वाटप,

    शिक्षण विभागातील योजनांची प्रत्यक्षअंमलबजावणी क्षेत्रीय कार्यालयातील विभाग प्रमुख व त्यांच्या अभिपत्याखालील कर्मचारी अधिका-यांमार्फत होते

    शिक्षण विभाग माध्यमिक क्षेत्रिय स्तरावरील विभाग

    शिक्षण विभाग जिल्हा परिषद, ठाणे

    शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक)
    विस्तार अधिकारी (शिक्षण)

    क्षेत्रीय कार्यालय विवरण पत्र- 2 तालुकास्तर

    गट शिक्षणाधिकारी, कल्याण गट शिक्षणाधिकारी,

    अंबरनाथ

    गट शिक्षणाधिकारी, शहापूर गट शिक्षणाधिकारी, मुरबाड
    गट शिक्षणाधिकारी, भिवंडी

    नियमावली

    माध्यमिक शाळा संहिता नियमावली 1981.

    कायदे आणि नियम

    १.      सेवा हमी कायदा

    २.      बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९

    ३.      बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २०११

    ४.      महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम २०१२.

    ५.      लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२.

    भरती

    अनुदानित खाजगी शाळांतील भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत राबविले जाते.

    आरटीआय संपर्क (PIOs/ APOs/ AA)

    श्री.ललिता दहितुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक तथा प्रथम अपिलीय अधिकारी,

    श्री.संजय राऊत,अधिक्षक गट तथा जनमाहिती अधिकारी (माध्यमिक)