समाज कल्याण विभाग
प्रस्तावना
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फंत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा अहवाल सादर करणेत येत आहे. मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना सर्व त-हेच्या सोयी सवलती देवुन त्यांची उन्नत्ती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे. त्यानुसार मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांचे शिक्षणावर प्रामुख्याने भर दिला जातो. इतरही बाबींचा विचार करुन प्रामुख्याने खालील योजनांची अंमलबजावणी या विभागामार्फंत केली जाते.
1) शैक्षणिक विकासाच्या योजना
2) आर्थिक विकासाच्या योजना.
3) 20% सेस फंडातुन वैयक्तिक विकासाच्या योजना.
4) जाती निर्मूलन विषयक इतर योजना.
5) दलित वस्ती सुधार योजना
6) अपंग कल्याणाच्या योजना.
वरील योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात. या योजनांसाठी योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते. प्राप्त तरतूदीमधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे यास्तव खर्च केला जातो. तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी विविध योजनोवर समाज कल्याण विभागामार्फंत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो. व्यसनमुक्ती प्रचार कार्यासारखे काम या विभागामार्फंत सुरु आहे.
विभागाची कार्यपध्दती
मागासवर्गीयांची दारिद्रयरेषेखालील लोकांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असते. त्यांना सर्व त-हेच्या सोयी सवलती देवून त्यांची उन्नती घडवुन आणण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आहे. या विभागामार्फत खालीलप्रमाणे योजना शासकिय अनुदानातुन राबविण्यात येतात. या योजनांची योजनेत्तर, योजनातंर्गत व आदिवासी उपयोजनेतंर्गत तरतूद दरवर्षी प्राप्त होत असते. प्राप्त तरतुदी मधुन सर्वसाधारणपणे मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे, लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ/अर्थसहाय्य तसेच मागासवर्गीयांचा सामुदायिक विकास घडवुन आणणे, यास्तव खर्च केला जातो. तसेच जिल्हा परिषदेच्या 20% सेस व 3% अपंग कल्याण सेस फंडातुन मागासवर्गीयांच्या/अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजनांवर समाज कल्याण विभागामार्फत शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार खर्च केला जातो. व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार कार्य या विभागामार्फत सुरू आहे.
विभागाचे ध्येय
प्रशासकीय तथा आस्थापना विषयक बाबी तसेच विविध कामांच्या विकास योजना
विभागाची संरचना
- सामाज कल्याण विभागाची रचना
मा.अति मुख्यकार्यकारी अधिकारी हे समाज कल्याण विभागाचे प्रमुख असुन त्यांच्याकडे या विभागाचे नियंत्रण आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी आहे समाजकल्याण विभागातील कर्मचा-यांकडे एकुण 8 शाखांमध्ये विषयाची विभागणी करण्यात आली आहे.
विषयांचे कार्यासन निहाय वाटप
अ.क्र. | कर्मचा-याचे नाव | कार्यासन | विषय |
1 | श्री.ज्ञानेश्वर सखाराम धोडकर | 1 | वसतीगृह योजना, समाज कल्याण योजना, वृध्द कलाकार आंतरजरतीय विवाह योजना मानधन, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे |
2 | श्रीम.प्राजक्ता पाटील | 2 | 5% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वृध्दाश्रम योजना, कोर्ट प्रकरण अनुषंगीक कामे, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे |
3 | श्रीम.प्राजक्ता पाटील | 3 | 20% जि.प.सेस फंड योजना संपूर्ण, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे |
4 | श्री.ज्ञानेश्वर सखाराम धोडकर | 4 | अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी, 7 % वन अनुदान, वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे |
5 | श्रीम.सविता गोसावी | 5 | सर्व शासकीय शिष्यवृत्ती- 1) माध्यमीक शाळांमध्ये शिकणा-या विदयार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती 2) मागास वर्गीय विदयार्थ्यांना शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क (अनु.जाती) 3) औदयागीक प्रशिक्षक संस्थेतील मागासवर्गीय विदयार्थ्यांना विदयावेतन 4) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती 5) 5 वी ते 7 वी त शिकणा-या मागासवर्गीय विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती 6) 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या अनु.जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे |
6 | श्रीम.सरिता चौगुले | 6 | लेखा परिक्षण मुद्दयांची पूर्तता करुन घेणे, विभागांतील आर्थिक बाबींच्या सर्व संचिकांवर अभिप्राय, योजनांच्या खर्चाचा ताळमेळ, समाज कल्याण विभागतील सर्व देयके,वित्त विभागाशी खर्चाचा ताळमेळ, |
7 | श्रीम.एस.जे.शिर्के
वैदयकीय सामाजिक कार्यकर्ता (अतिरिक्त) |
7 | दिव्यांग शाळांबाबत सर्व आस्थापना विषयक व वेतनदेयक विषयक कामे व दिव्यांग शाळा वेतन कमिटी बैठका |
8 | श्रीम.एस.जे.शिर्के | 8 | कार्यालयात येणा-या दिव्यांगांना मार्गदर्शन करणे, दिव्यांगांसाठी राबविण्यात येणारी बीज भांडवल योजना, अपंग शिष्यवृत्ती देणे, दिव्यांग विवाह अनुदान योजना, दिव्यांग शाळांचे आस्थापना विषयक व इतर सर्व प्रकरणे तपासून वै.सा.का. यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे सादर करणे. |
9 | श्री.सी.जी.पाटील | 9 | आवक – जावक कार्यालयीन कर्मचारी आस्थापना समाज कल्याण अधिकारी यांनी वेळोवेळी सोपविलेली कामे |
विभागप्रमुख
जिल्हा समाज कल्याण अधिकारी ठाणे -श्रीम.उज्वला सपकाळे
दुरध्वनी क्रमांक -022-25448677
नागरीकांची सनद सन 2024
नागरिकांची सनद 2024 समाजकल्याण