बंद

    अंबरनाथ

    विभागा बद्दल माहिती

    ठाणे जिल्हयातील अंबरनाथ तालुका असून अंबरनाथ तालुक्याची भौगोलिक क्षेत्र 30021 चौ. कि.मी इतके आहे. तालुक्याची लोकसंख्या सन 2011 चे जनगणनेनुसार ग्रामीण भागातीललोकसंख्या 125011 आहे. त्यामध्ये पुरुष 65804 व स्त्री 59207, अनु.जाती 12763,व अनु जमाती 18822 तसेच शहरी भागातील लोकसंख्या एकूण 440329 अनु. जाती 63373 व अनु जमाती 17399 आहे. तालुकयातील ग्रामीण कुटूंब संख्या एकूण 27662 आहेच. तालुकयात दारिद्रयरेषेखालील कुटुंब 4498 आहेत पैकि अनुजाती 437 व अनु जमातीचे 2227 , तसेच इतर 1834 कुटूंबांची संख्या आहे. तालुक्यातील ग्रामीण बेघर कुटुंबसंख्या निरंक आहे. तालुक्यातील गाव 64 व आदिवासी पाडे 55 आहेत. तालुक्यातील एकूण 28 ग्रामपंचायत आहेत.

    परिचय

    पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.

    महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.

    पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी हे असतात. गटविकास अधिकारीला बीडीओ असेही म्हटले जाते. गटविकास अधिकारीची नेमणूक राज्यशासन मार्फत केली जाते. गटविकास अधिकारी कर्मचारी – ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी असतो. पंचायत समितीचा सचिव म्हणून ते कामकाज पाहत असतात.

    व्हिजन आणि मिशन

    १. पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करणे.

    २. पंचायत समितीचा सचिव म्हणून जबाबदारी पार पाडणे.

    ३. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

    ४. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे.

    5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

    6. पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.

    7. पंचायत समितीचा अहवाल तयार करून तो मा.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांस सादर करणे.

    8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर

    कार्ये

    1.     पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.

    2.     गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

    3.     समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे

    4.     जिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे

    5.     विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे.

    6.     पंचायत समितीच्या सभा बोलावील त्या सभांचे अध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.

    7.     पंचायत समितीचे अभिलेख पाहू शकेल.

    8.     अंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीचे ठराव आणि निर्णय कार्यान्वत करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अभिलेख यांच्या बाबतीत गटात काम कणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या करतीचे पर्यवेक्षण करील व त्यांवर नियंत्रण ठेवील.

    9.     गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यात संबंधात राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.

    10. पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार.

    11. पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे.

    12. पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-याकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.

    13. गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेत किंवा जिल्हा परिषदेने अशा पंचायत समितीने अथवा तिच्या निर्देशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.

    प्रशासकीय सेटअप

    गटविकास अधिकारी (BDO):

    • गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो.
    • त्याला राज्य शासनाद्वारे नियुक्त केले जाते.
    • त्याच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे सर्व कामकाज व योजनांची अंमलबजावणी केली जाते.

      पंचायत समिती सचिव:

    • सचिव पंचायत समितीच्या प्रशासनाचे प्रमुख असतो.
    • तो पंचायत समितीच्या सर्व कामकाजाची माहिती राखतो आणि योजनांची अंमलबजावणी करतो.
    • सचिव हे पद विविध सरकारी आदेशांचे पालन करणारे आहे.

      कर्मचारी:

    • पंचायत समितीमध्ये विविध वर्ग-1 आणि वर्ग-2 चे अधिकारी व कर्मचारी असतात.
    • प्रत्येक विभागासाठी आवश्यक कार्ये पार पाडण्यासाठी संबंधित अधिकारी असतात.

      पंचायत समितीचे कार्य:

    • पंचायत समितीच्या प्रत्येक कामासाठी संबंधित विभागांनी आपापल्या कामांची जबाबदारी घेतलेली असते.
    • पंचायत समितीच्या बैठकीत निर्णय घेऊन कार्यान्वयनासाठी सूचना दिल्या जातात.

      विभागीय अधिकारी आणि कर्मचारी:

    • विविध योजनांच्या कार्यान्वयनासाठी या विभागीय अधिकार्‍यांची भूमिका असते.
    • हे अधिकारी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करतात.

    सलग्न कार्यालये

    पंचायत समिती अंबरनाथ अंतर्गत विभाग –ग्रामपंचायत, समाजकल्याण, लेखा, बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, नरेगा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, ,स्वच्छ भारत मिशन

    आयुक्तालये

    मा.विभागीय आयुक्त, कोकण विभाग,कोकण भवन

    संपर्क तपशील

    नाव – श्रीम.पंडीत कौर राठोड

    पदनाम – गटविकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती अंबरनाथ

    ई मेल पत्ता:- मेल bdotscambarnath@gmail.com

    पत्ता- नविन  प्रशासकिय  इमारत ३ रा मजला पंचायत समिती अंबरनाथ

     

    योजना/ उपक्रम

    राज्य सरकार

    कागदपत्रे

    अर्जाचा फॉर्म

      आधिकारिक प्रमाणपत्र

      ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/पासपोर्ट)

      पत्ता प्रमाणपत्र (वोटर ID, रेशन कार्ड, किंवा विद्युत बिल)

      कार्यक्षेत्रातील माहिती आणि मागील कामाचा अनुभव

      कायदेशीर कागदपत्रे (संपूर्ण प्रकल्पाची माहिती, कंत्राट इत्यादी)

    प्रत्येक सरकारी विभागाच्या संबंधित कागदपत्रांची यादी (उदा. कृषी विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादी)

     

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे

      सुरक्षा (Security):

    • सरकारी वेबसाइट्ससाठी सर्वोच्च सुरक्षा मानकांचा अवलंब केला जाईल.
    • प्रत्येक वेबसाइटसाठी डेटा एन्क्रिप्शन आणि सुरक्षित लॉगिन प्रक्रिया लागू केली जाईल.

      स्केलेबिलिटी (Scalability):

    • वेबसाइट्स आणि पोर्टल्सचे डिजिटलीकरण करताना स्केलेबिलिटी सुनिश्चित केली जाईल.
    • जास्त ट्रॅफिकच्या परिस्थितीत वेबसाइट कार्यक्षमपणे कार्यरत राहील.

      सुलभता (Accessibility):

    • वेबसाइट्स नागरिकांसाठी सुलभ आणि अॅक्सेसिबल असाव्यात.
    • वेबसाइट्स वर्ल्ड वाइड वेब अॅक्सेसिबलिटी गाइडलाइन्स (WCAG) पाळतील.

      कंटेंट मॅनेजमेंट (Content Management):

    • वेबसाइटवर मॅनेज करण्यायोग्य कंटेंट तयार करण्यासाठी एक स्ट्रक्चर्ड आणि सुसंगत कंटेंट मॅनेजमेंट प्रणाली असावी.
    • वेबसाइटवरील सर्व माहिती नियमितपणे अद्ययावत केली जाईल.

      पारदर्शकता (Transparency):

    • सरकारी योजनांची माहिती पारदर्शकपणे नागरिकांना पोहोचविण्यासाठी कार्य करणे.
    • नियमितपणे पोर्टल्स आणि वेबसाइट्सवर माहिती प्रकाशित केली जाईल.

      नागरिकआधारित केंद्रित सेवा (Citizen-Centric Service):

    • नागरिकांना सर्व सेवा डिजिटलीकृत स्वरूपात देण्यात येतील.
    • योजनांचा लाभ आणि प्रक्रिया नागरिकांना सोप्या पद्धतीने उपलब्ध होईल.

      नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब (Adoption of New Technology):

    • नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करून वेबसाइट्स अधिक कार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जाईल.
    • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग (ML) आणि क्लाउड तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल.

      सामाजिक समावेश (Social Inclusion):

    • सर्वांसाठी समान माहिती उपलब्ध करून सामाजिक समावेश वाढविणे.
    • विकलांग व्यक्तींसाठी विशेष सुविधा उपलब्ध करणे.

     

    Directory

    गटविकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती अंबरनाथ
    bdotscambarnath@gmail.com
    9766859770
    0251-2682304

    नविन  प्रशासकिय  इमारत ३ रा मजला पंचायत समिती अंबरनाथ                                                    

    सेवा

      कृषी सेवा – शेतकऱ्यांना सहाय्य, यांत्रिकीकरण, सिंचन, आणि कृषी संबंधित योजना.

      शिक्षण सेवा – शाळा, महाविद्यालये, शिक्षक प्रशिक्षण, आणि शैक्षणिक सहाय्य.

      स्वास्थ्य सेवा – दवाखाने, आरोग्य मोहिमा, आणि वैद्यकीय मदत.

      समाजकल्याण सेवा – वृद्धांसाठी सहाय्य, अपंग व्यक्तींसाठी योजना, बालकल्याण.

      पाणी पुरवठा सेवा – जलसंपदा व्यवस्थापन, पाणी पुरवठा प्रकल्प.

      बांधकाम सेवा – रस्ते, घरबांधणी, सार्वजनिक बांधकामे.

      महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

      प्रधानमंत्री आवास योजना

      स्वच्छ भारत मिशन

      पंचायती राज योजना

      राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान

      आयुष्मान भारत योजना

      शालेय पोषण आहार योजना

    वेबसाईट यु आर एल –  –https://www.panchayatcharter.nic.in

    योजनेचे फायदे

    महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) – फायदे:

    1. रोजगार निर्मिती
    2. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारणा
    3. कुटुंबांना आर्थिक मदत

    ग्रामपंचायत विभागफायदे:

    1. स्थानिक विकास
    2. सार्वजनिक सेवांचा पुरवठा
    3. ग्रामविकास प्रकल्पांची अंमलबजावणी

    कृषि विभागफायदे:

    1. कृषी उत्पादन वाढविणे
    2. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि साधने उपलब्ध करणे
    3. कृषि योजनांचा लाभ

    पशुसंवर्धन विभागफायदे:

    1. दूध उत्पादन सुधारणा
    2. पशुपालनासाठी प्रशिक्षण आणि सहाय्य
    3. ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत

    आरोग्य विभागफायदे:

    1. सार्वजनिक आरोग्य सुविधा
    2. लसीकरण आणि आरोग्य तपासणी
    3. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध

    समाजकल्याण विभागफायदे:

    1. वंचित घटकांसाठी सामाजिक सुरक्षा
    2. वृद्धांसाठी पेंशन योजना
    3. महिलांसाठी आर्थिक सहाय्य

    इंदिरा आवास योजनाफायदे:

    1. गरीब कुटुंबांना घर पुरवठा
    2. पायाभूत सुविधा सुधारणा
    3. कुटुंबांचा आर्थिक विकास

    स्वच्छ भारत मिशनफायदे:

    1. स्वच्छता वाढवणे
    2. सार्वजनिक शौचालयांचा वापर
    3. आरोग्य सुधारणा

    लघुपाट बंधारे विभागफायदे:

    1. जलसंपदा व्यवस्थापन
    2. पाणी साठवण क्षमता वाढविणे
    3. सिंचन सुविधा

    पाणी पुरवठा विभागफायदे:

    1. स्वच्छ पाणी पुरवठा
    2. जलसंचय प्रणाली
    3. ग्रामीण भागातील पाणी समस्यांचे समाधान

    बांधकाम विभागफायदे:

    1. सार्वजनिक इमारतींची बांधणी
    2. रस्ते, पुलांचे निर्माण
    3. शालेय आणि आरोग्य केंद्रांची इमारत

    शालेय पोषण आहारफायदे:

    1. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार
    2. शालेय उपस्थिती वाढवणे
    3. शिक्षणास प्रोत्साहन

    नागरिकांची सनद सन-२०२४

    नागरिकांची सनद
    कार्यालयाचे नांव :- सामान्य प्रशासन विभाग- सन-२०२४
    पंचायत समिती अंबरनाथ
    विवरण पत्र क्र.१
    अ.क्र. कार्यालयाचे नांव जनतेस देण्यांत येणा-या (सेवा) (स्तर नमुद करावा) त्यासाठी कोणकोणत्याही कागदपत्राची आवश्यकता आहे. सेवा देणारे अधिकारी (सेवानिहाय प्राधिकारी यांचे नांव नमुद करावे सेवा पुरविण्यास लागणारा कालावधी (निर्धारित असल्यास विहित /सर्वसाधारण अपिल असल्यास अपिलीय अधिकारी आणि अपिल करण्याचा विहित कालावधी सेवा पुरविल्या न गेल्यास तक्रार (असल्यास ) ती कोणाकडे करावयाची पदनाम व पत्ता
    1 2 3 4 5 6 7 8
    1 सामान्य प्रशासन विभाग पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व कर्मचारी यांचे आस्थापना व प्रशासकीय कामकाज तसेच पंचायत समिती सभा व अनुषंगीक सभा बाबत माहिती तयार करणे. आस्थापना विषयक तसेच प्रशासकीय  विषयक कामकाजाचे दस्तऐवज सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ विहीत कालावधीत सात  दिवसात विहीत कालावधीत सात  दिवसात गट विकास अधिकारी      पंचायत समिती अंबरनाथ
    2 लेखा विभाग लेखा विषयक देयके पारित करणे व त्यानुसार धनादेश काढणे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता 1968 नुसार विहित नमुन्यात देयके सादर करणे व लेखा शिर्ष नमुद करणे तसेच देयकात तरतुद, झालेला खर्च, शिल्लक तरतुद दर्शविणे व देयकासोबत खर्चाचे आदेश जोडणे सहाय्यक लेखा अधिकारी पंचायत समिती अंबरनाथ विहीत कालावधीत सात  दिवसात विहीत कालावधीत सात  दिवसात गट विकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती अंबरनाथ
    3 शिक्षण विभाग शिक्षण विभाग योजना   विस्तार अधिकारी शिक्षण विहीत कालावधीत सात  दिवसात 30 दिवस श्री. आर.डी जतकर गटशिक्षणाधिकारी पं. सं.अंबरनाथ
    आस्थापनाविषयक आस्थापना विषयक कागदपत्रे कनिष्ठ प्रशासन अधिकारी विहीत कालावधीत सात  दिवसात 30 दिवस
    4 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान MSRLM स्वयं सहायता गट स्थापना, प्रशिक्षण, नोदणी ,आर्थिक सहाय्य मार्गदर्शन व उपजीविका मार्गदर्शन राज्य अभियान कक्षाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तालुका अभियान व्यवस्थापक www.bmmuambarnath@gmail.com स्वयं सहायता गट जीवन चक्रा प्रमाणे नियमित प्रक्रिया नियमित विभाग प्रमुख श्रीम.स्वाती तुपसौदरे -९८२२००८७८८ जिल्हा अभियान व्यवस्थापक हसन पडवी 8928140920 www.thane@umed.in
    5 एकात्मिक बाल विकास सेवा  योजना प्रकल्प अंबरनाथ 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास सर्व मुलांना अंगणवाडी सेवा पुरवली जाते पोषण आहार, लसीकरण संदर्भ सेवा मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका नियमित विहीत कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी   पंचायत समिती अंबरनाथ cdpoambarnath@gmail.com
    दोन चाकी सायकल इ. 5 ते 12 पर्यत 2 कि.मी. अंतरावर चालत जाणा-या सर्व मुलीसाठी मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका दर वर्षाला योजना राबविली जाते.
    घरघंटी 50 हजारच्या आत उत्पन्न, दारिद्रय रेषेखाली, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत यांना प्राधान्य मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका दर वर्षाला योजना राबविली जाते.
    घरकुल 51 हजारच्या आत उत्पन्न, दारिद्रय रेषेखालील, विधवा, परितक्त्या घटस्फोटीत यांना प्राधान्य मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका दर वर्षाला योजना राबविली जाते.
    एमएससी आय टी किशोरवयीन मुली मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका दर वर्षाला योजना राबविली जाते.
    टंकलेखन किशोरवयीन मुली मुख्यसेविका / अंगणवाडी सेविका दर वर्षाला योजना राबविली जाते.
    6 महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण  रोजगार हमी योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व सार्वजनिक स्वरुपाचे काम ग्रामपंचायतीचा प्रस्ताव संबंधित लाभार्थ्याचे काम मागणी अर्ज 7/12, 8 अ, नरेगा जॉबकार्ड, आधार कार्ड, A/C No शासन निर्णयांत नमुद केलेली आवश्यक कागदपत्र विस्तार अधिकारी (पंचायत) शासकीय नियमानुसार सर्वसाधारण आर्थिक वर्षात विहित कालावधीत गट विकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती अंबरनाथ
    7 ग्रामपंचायत विभाग ग्रामपंचायत विभागातील सर्व ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे आस्थापना , प्रशासकीय कामकाज तसेच पंचायत समिती अंतर्गत 28 ग्रामपंचायती असुन ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ देणे. ग्रामपंचायत स्तरावरील तक्रारींचे निराकरण करणे. आस्थापना विषयक तसेच प्रशासकीय विषयक कामकाजाचे दस्तऐवज,          शासन निकषाप्रमाणे आवश्यक दस्तऐवज विस्तार अधिकारी (पंचायत) विहीत कालावधीत सात  दिवसात 30 दिवसात गट विकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती अंबरनाथ
    8 कृषि विभाग 1.अनु जाती/ जमाती योजना                        2.सिंचन विहीर पंपसंच 3. ठिबक तुषार सिंचन संच पाईप व जुनी विहिर दुरूस्ती 7/12 8 अ दारिद्रयरेषेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला आधारकार्ड बॅंक पासबुक झेरॉकस अर्ज ऑनलाईन करणे आवश्यक आहे. श्रीम प्रज्ञा गवई कृषि अधिकारी जिल्हा स्तरावर योजना मंजूर निधी जिल्हास्तरावर होत असल्याने तालुकास्तरावर कालावधी निश्चित करता येत नाही. 30 दिवसात कृषि विकास अधिकारी जि.प ठाणे
    कृषि विभाग वैयक्तिक लाभाच्या योजना बायोगॅस थेट हस्तांतर पध्द्तीने अर्ज अनुदान मागणी अर्ज 7/12 उतारा पासबुक झेरॉक्स आधारकार्ड मागणी अर्ज शासकिय नियमानुसार सर्वसाधारण आर्थिक वर्ष 30 दिवसात कृषि विकास अधिकारी जि.प ठाणे
    9 पशुसंवर्धन विभाग वैयक्तिक लाभाच्या योजना व अनु जाती/ जमाती योजना 7/12 8 अ दारिद्रयरेषेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला आधारकार्ड बॅंक पासबुक झेरॉकस .   पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक शासकिय नियमानुसार सर्वसाधारण आर्थिक वर्ष 30 दिवसात पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती अंबरनाथ
    10 आरोग्य विभाग विलंबाने जन्म/मृत्यु नोंदणी आदेश (घटनेपासून 1 वर्षाचे आतील)   कनिष्ठ सहाय्यक 15 दिवस (ग्रविअ/ग्रासे यांचेकडील सर्व रिपोर्ट नंतर) तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर) जिल्हा आरोग्य अधिकारी  जि.प ठाणे
    जननी सुरक्षा योजना (लाभ रु.700/- संस्थेतील प्रसुती व रु 500/- घरी प्रसुती)   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका प्रसुतीनंतर 07 दिवसांचे आत संबंधित मातेस तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    मातृत्व अनुदान योजना (केवळ आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता) (लाभाचे स्वरुप रु.400/- रोखीने व 400/- मोफत औषधे)   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका प्रसुतीनंतर 07 दिवसांचे आत संबंधित मातेस तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    कुटुंब कल्याण श्स्त्रक्रिया (स्त्री शस्त्रक्रिया व पुरुष नसबंदी)   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी कुटुंब कल्याण शिबीराचे दिवशी तात्काळ संबंधित लाभार्थीस तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    जननी सुरक्षा योजना (मोप्फत औषधोपचार आहार व संदर्भ सेवा)   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मातेकरीता प्रसुतीनंतर 42 दिवसांपर्यत व बालकांकरीता जन्मापासून 1 वर्षापर्यत तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    संदर्भ सेवा (मोफत वाहन सेवा)   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा उपकेंद्राच्या आरोग्य सेविका किंवा अंगणवाडी कार्यकर्ती आवश्यकतेनुसार अत्यावश्यक रुग्णांकरीता तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    मोफत आहार योजना   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आरोग्य संस्थेतील प्रसुती मातांना व आंतररुग्णांना तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    लसीकरण   संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र/उपकेंद्राच्या आरोग्य सेविका प्रत्येक आरोग्य संस्थेच्या किंवा गावनिहाय नियोजित लसीकरण सत्रानुसार तालुका आरोग्य अधिकारी (30 दिवसानंतर)
    ११ समाजकल्याण विभाग २०%  मागासवर्गीय योजना व 5% दिव्यांग योजना 7/12 8 अ दारिद्रयरेषेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला आधारकार्ड बॅंक पासबुक झेरॉकस  व रेशन कार्ड अर्ज करणे आवश्यक आहे. व दव्यांग असल्याच दाखला कनिष्ठ सहाय्यक/विस्तार अधिकारी (पंचायत) दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत गट विकास अधिकारी      पंचायत समिती अंबरनाथ
    १२ इंदिरा आवास योजना घरकुल योजना 7/12 8 अ दारिद्रयरेषेचा दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला , जातीचा दाखला आधारकार्ड बॅंक पासबुक झेरॉकस  व रेशन कार्ड अर्ज करणे आवश्यक आहे. व दव्यांग असल्याच दाखला विस्तार अधिकारी (सा दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत उप विभागीय जलसंधारण अधिकारी,
    १३ स्वच्छ भारत मिशन वैयक्तिक शौचालय ग्रामपंचायतीचा ठराव, लाभार्थीची याद्यी , आधाकार्ड व पासबुक झेरॉक्स गट विकास अधिकारी      पंचायत समिती अंबरनाथ दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत गट विकास अधिकारी      पंचायत समिती अंबरनाथ
    सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायतीचा ठराव,जागा असल्याचा दाखला हमीपत्र जागेचा फोटो
    घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन गावकृती आराखडा प्रपत्र अ,प्रपत्र -ब प्रपत्र -९ प्रपत्र -१२ जोगेचा दाखला  ग्राप पंचायतचा ठराव  लोकसंख्येचा दाखला
    १४ लघुपाट बंधारे विभाग को.प.बंधारे, पक्के बंधारे, पाझर तलाव, गांवतलाव नवीन व दुरुस्ती इत्यादी. मागणी पत्र, ग्रामपंचायतीचा ठराव, जागा उपलब्ध असल्याबाबत कागदपत्रे उदा.7/12 उतारा, गांवनकाशा ईत्यादी. उप विभागीय जलसंधारण अधिकारी, दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत उप विभागीय जलसंधारण अधिकारी,
    १५ पाणी पुरवठा विभाग हातपंप, विदयुतपंप योजना  प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन योजना अर्ज करणे आवश्यक आहे. उप विभागीय  अभियंता    पाणी पुरठा दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत उप विभागीय  अभियंता पाणी पुरवठा विभाग
    १६ बांधकाम ३०५४ मार्ग व पुल योजना /बिगर आदिवाशी /३०५४ मार्ग व पुल योजना५४४०५५ / तिर्थक्षेत्र विकास कामे /रस्ते व पुल दुरुस्ती गट ब  अंगणवाडी इमारती बांधकामे  खासदार स्थानिक विकास कार्यक्रम  /जिल्हा परिषद अर्थ संकल्प /जन सुविधा / नागरी सुविधा/ १५ वा वित्त आयोग /बंधित अबंधित मागणी पत्र, ग्रामपंचायतीचा ठराव, जागा उपलब्ध असल्याबाबत कागदपत्रे उदा.7/12 उतारा, गांवनकाशा ईत्यादी. उप विभागीय  अभियंता    बांधकाम  विभाग दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत उप विभागीय अभिंयता     बांधकाम विभाग
    १७ शालेय पोषण आहार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना मध्यान्ह भोजन वाटप करण्यात येते अधिक्षक (सा.रा.से.वर्ग-२)प्रधानमंत्री पोषण शक्ती दर वर्षाला योजना राबविली जाते. विहीत कालावधीत अधिक्षक (सा.रा.से.वर्ग-२)प्रधानमंत्री पोषण शक्ती