कल्याण
कल्याण तालुका सर्वसाधारण माहिती
कल्याण तालुक्याचे क्षेत्रफळ एकूण 267.59 चौ.कि.मी. आहे. तालुक्यात एकूण 46 ग्रामपंचायती असून 84 गावे आहेत (त्यापैकी 1 गाव ओसाड आहे).
सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1,24,467 असून एकूण कुटुंब संख्या 26,818 आहे.
औद्योगिकदृष्ट्या विकसित असलेला हा तालुका शहराच्या जवळ असल्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे.
कल्याण येथील दुर्गाडी किल्ला व टिटवाळा गणपती मंदिर हे प्रमुख पर्यटन स्थळे आहेत.
तालुक्यातील मुख्य पीक भात असून उल्हास, काळू व भातसा नद्या वाहतात.
सिंचन सुविधेमुळे भाजीपाला, आंबा, नारळ व फुले यासारखी नगदी पिके घेतली जातात.
परिचय
सामान्य प्रशासन विभाग
- गटविकास अधिकारी हे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख असतात.
- सभापती व उपसभापती हे निवडून आलेले पदाधिकारी असतात.
- सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विविध विभाग कार्यरत आहेत.
आरोग्य विभाग
- तालुका आरोग्य अधिकारी विभाग प्रमुख असतात.
- प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे नियंत्रण व समन्वय करतात.
कृषी विभाग
- सहाय्यक गटविकास अधिकारी हे प्रशासकीय प्रमुख असतात.
- कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी कार्यरत आहेत.
शिक्षण विभाग
- गटशिक्षणाधिकारी विभाग प्रमुख आहेत.
- ग्रामीण भागात मोफत व दर्जेदार शिक्षण पुरविले जाते.
महिला व बालविकास विभाग
- बालविकास प्रकल्प अधिकारी विभाग प्रमुख आहेत.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यामार्फत सेवा दिल्या जातात.
—
व्हिजन आणि मिशन
- पायाभूत सुविधांचा विकास व देखभाल
- ग्रामीण भागात सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी
- आरोग्य, शिक्षण व कृषी क्षेत्रात सुधारणा
- महिला व बालकल्याण विकास
—
उद्दिष्टे
- ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास
- स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम निर्मिती
- दारिद्र्य निर्मूलन
- सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचविणे
- पंचायती राज व्यवस्था बळकट करणे
—
प्रशासकीय सेटअप
सामान्य प्रशासन विभाग
- गटविकास अधिकारी – 1
- सहाय्यक प्रशासन अधिकारी – 1
- कनिष्ठ प्रशासन अधिकारी – 2
- वरिष्ठ सहाय्यक – 3
- कनिष्ठ सहाय्यक – 9
- शिपाई – 5
आरोग्य विभाग
- तालुका आरोग्य अधिकारी
- आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षक, कर्मचारी
—
पुरस्कार आणि प्रशंसा
- राज्यस्तरीय सर्वोत्तम नवोउपक्रम पुरस्कार (2024-25)
- स्वच्छ गाव सुंदर गाव पुरस्कार
- संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार
- कोविड काळातील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मान