लघुपाटबंधारे विभाग
परिचय
जिल्हा जलसंधारण अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
व्हिजन आणि मिशन
लघुपाटबंधारे विभाग हा ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 14विभागांपैकी एक विभाग आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी हे विभागाचे प्रमुख असतात.
जिल्हा जलसंधारण विभागामार्फत 0 ते 100 हेक्टर्स सिंचन क्षमतेच्या ल. पा. योजना, पाझर तलाव, को.प.बंधारे, सिमेंट नाला बंधारे,गावतलाव बांधण्यात येतात. बिगर आदिवासी क्षेत्राचे जिल्हा नियोजन विभागामार्फत व आदिवासी क्षेत्राचे नियोजन आदिवासी प्रकल्प विभागा मार्फत करुन कामे प्रस्तावीत करण्यात येतात.
उद्दिष्टे कार्ये मजकूर
गाव तलाव बांधणे, दुरूस्ती करणे व सुशोभिकरण करणे
गावाच्या जवळ नाल्यावर सर्वसाधारणपणे 3.00 मी खोदकाम करून 3.00 मी. उंचीचा मातीचा बांध बांधुन निर्माण केलेला जलसाठा म्हणजे गावतलाव. याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
२.सिमेंटकॉक्रिटबंधारेबांधणे/ दुरूस्तीकरणे
लहाननदी/नाल्यावर संधनाकातील बांधकामाव्दारे बांधाचे बांधकाम करून मान्सुनोत्तर पाणी आडवुन केलेला जल साठा म्हणजे बंधा-याचा उपयोग पाझरातुन विहीरींचे पुनर्भरणहोणे, शेतीचे सिंचनासाठी व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे हा आहे.
योजनेचे निकष –
1) पायासाठी उत्तम प्रकाराचा कठीण खडक कमी खोलीवर उपलब्ध असणे आवश्यक
2) नाल्याचे दोन्ही तिर पुरेशे उंच असावेत.
3) संधानकासाठी उतम दर्जाची खडी व वाळु उपलब्ध असणे आवश्यक आहे.
4) संधानकासाठी मिक्सर व व्हायबरेटरचा वापर करणे आवश्यक आहे.
5) जमिनीवरील बंधा-याच्या उंची पेक्षा पायाची खोली जास्त नसावी.
6) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप – पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे, शेतीचे सिंचनासाठी व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
३.उपसासिंचन योजना
आदिवासी भाग सर्वसाधरण पणे डोंगराळ स्वरुपाचा व धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात येत असल्याने आदिवासी शेतकयांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणेसाठी शासनाकडुन 100% खर्चाने उपसा सिंचन योजना राबविण्यात येतात.
योजनेचे निकष –
1) योग्य जागा व मागणी आवश्यक आहे.
2) लाभक्षेत्र किमान 25 हेक्टर असावे.
3) एकुण आदिवासी लाभार्थी किमान 90% असावेत.
4) लाभार्थ्यानी सहकारी संस्था स्थापन करुनती पंजीबध्द करणे आवश्यक आहे.
5) पाणी परवानगी आवश्यक आहे.
6) शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या आर्थिक मापदंडात योजना बसणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप – आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे.
प्रशासकिय सेटअप-
- जिल्हाजलसंधारणअधिकारी, लघुपाटबंधारेविभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
- उपविभागीयजलसंधारणअधिकारी, जि. प. ल. पा. उपविभाग, मुरबाड
- उपविभागीयजलसंधारणअधिकारी, जि. प. ल. पा. उपविभाग, भिवंडी
योजना
| अ. नं. | योजनेचे नाव | योजनेचा तपशील |
|---|---|---|
| 1 | राज्य सरोवर संवर्धन योजना | गाव तलाव, सरोवर व जलाशयांचे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना सन 2001 पासून सुरू केली. राज्यातील सर्व तलावांचा समावेश करणे शक्य नसल्यामुळे राज्य स्तरावर सन 2006-07 पासून ही योजना सुरू करण्यात आली.सक्रिय सहभागासाठी उपाययोजना : 1. तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण. 2. तलाव काठाचे मजबुतीकरण (Stone Pitching). 3. तलाव क्षेत्र कुंपण व संरक्षण उपाययोजना. 4. सार्वजनिक सुविधा – शौचालय, कचरापेटी इत्यादी. 5. तलाव परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन. 6. सुशोभीकरण – वृक्षलागवड, सौर पथदिवे, पेडल बोटींग. 7. जनजागृती. 8. तांत्रिक तज्ञांची उपलब्धता. 9. सांडपाणी पुनर्वापरास प्रोत्साहन. |
| 2 | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार | या योजनेअंतर्गत कामांचे Geo-Tagging व माहिती संकलन Avani App द्वारे केले जाते.
प्रमुख बाबी : |
| 3 | जलयुक्त शिवार अभियान | सन 2012-13 मध्ये दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला. जलसंधारणाद्वारे पाणी अडविणे व भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली.अभियानाचे उद्दिष्ट : 1. पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावात अडविणे. 2. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे. 3. सिंचन क्षेत्र वाढविणे. 4. ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करणे. 5. भूजल अधिनियम अंमलबजावणी. 6. विकेंद्रित पाणी साठे निर्माण करणे. 7. नवीन पाणी साठवण क्षमता निर्माण करणे. 8. अस्तित्वातील जलस्रोतांची क्षमता वाढविणे. 9. जलस्रोतांमधील गाळ काढणे. 10. वृक्षलागवड प्रोत्साहन. 11. पाणी ताळेबंदाबाबत जनजागृती. 12. शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर. 13. पाणी अडविणे व जिरविणे बाबत लोकसहभाग वाढविणे.संलग्न कार्यालये : प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे संचालनालय / आयुक्तालय : आयुक्त, मृद व जलसंधारण विभाग, संभाजीनगर |
राज्य सरकार
| अ. नं. | योजनेचे नाव | योजनेचे उद्दिष्ट / तपशील |
|---|---|---|
| 1 | गाव तलाव बांधणे, दुरुस्ती करणे व सुशोभीकरण करणे | पाझरातून विहिरींचे पुनर्भरण होणे व पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे. |
| 2 | सिमेंट कॉक्रिट बंधारे बांधणे / दुरुस्ती करणे | पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढविणे, पाझरातून विहिरींचे पुनर्भरण करणे व सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे. |
| 3 | उपसा सिंचन योजना | आदिवासी शेतकऱ्यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळवून देणे व शेतीसाठी संरक्षित पाण्याची सोय करणे. |
| 4 | राज्य सरोवर संवर्धन योजना | तलावाच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपाययोजना करणे, तलाव क्षेत्रास कुंपण किंवा संरक्षण उपाययोजना करणे (Chain Link Fencing), तसेच तलाव परिसराचे सुशोभीकरण जसे वनीकरण, वृक्षलागवड, सौर पथदिवे, पेडल बोटींग इत्यादी. |
| 5 | गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार | जलसाठे व गावनिहाय शेतकरी व भूधारणा माहिती, नेण्यात आलेल्या गाळाचे प्रमाण, ट्रॅक्टर ट्रॉलीची संख्या, उत्खनन यंत्रसामुग्रीच्या कामाचे तास तसेच काढलेल्या एकूण गाळाचे प्रमाण याची नोंद ठेवणे. |
| 6 | जलयुक्त शिवार अभियान | जलसंधारणाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्रातील कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, के.टी. वेअर दुरुस्ती, जलस्रोतांतील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे राबविणे. |
विभाग प्रमुख
नाव – प्रकाश सासे
पदनाम- जिल्हा जलसंधारण अधिकारी
ईमेल पत्ता – mizpthane[at]gmail[dot]com
पत्ता -कार्यालयाचा पत्ता- स्केअर फिट होम्स, प्लॉट क्र 106,107 एस.जी.बर्वे रोड, रोड नं.22 टोयाटो शोरूम च्याबाजूलावागळे इस्टेट, एम.आय.डी.सी. ठाणे (प)
- Kosle Percolation Tank, Taluka
- टेंभरे येथील के.टी. बंधारा, ता.शहापूर
- उपसा सिंचन योजना (स्रोत विहीर) साखरपाडा, नादगाव, ता.शहापूर
- पाये सी.एन.बी. बंधारा, ता.भिवंडी
- मोहिली गाव तलाव दुरुस्ती, ता.भिवंडी




