बंद

    पशुसंवर्धन विभाग

    परिचय – पशुसंवर्धन विभाग

    व्हिजन आणि मिशन –

    महाराष्ट्र राज्यातील काही मोजक्या औद्योगीक दृष्टया प्रगत जिल्हयापैकी ठाणे हा एक कोकण विभागातील उत्तरेकडचा जिल्हा असून, जनगणना २०११ नुसार लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे ज्लिहयाचा राज्यात तिसरा क्रमांक आहे.जिल्हयाचे क्षेत्रुळ ४२१४ चौ.की.मी. असून,ते राज्याच्या १.३७ % आहे पुर्वेकडे सहयाद्री पर्वताच्या रांगा तर पश्चिमेस अरबी समुद्र उत्तरेस गुजरात राज्याचा घनदाट अरण्याचा भाग आणि दक्षिेणेला जगप्रसिध्द व भारताची आर्थिक राजधानी समजले जाणारे मुंबई शहर अशा जिल्हयाच्या चतु:सीमा आहेत.

    जिल्हयातील ठाणे ,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ व भिवंडी या तालूक्याचे क्षेत्र औद्योगीक दृष्टया विकसीत असून, मुंबई शहराच्या अधुनिक संस्कृतीच्या प्रभावाखाली आहे.महाराष्ट्र राज्याच्या ७२० किमी पैकी २७ किमी लांबीचा समुद्र किनारा जिल्हयाला लाभलेला आहे.भुजल मासेमारीसाठी ७६४२हेक्टर क्षेत्र अनुकूल आहे.सागरी मासेमारी बरोबरच भुजल मासेमारी केली जाते.मत्स्य विक्रीसाठी मुंबईसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून,आखाती देशातूनही मत्स्य उत्पादनाला चांगली मागणी आहे.ठाणे जिल्हा हा शहरी व ग्रामीण अशा दोन भागात विभागलेला असून, मुंबई सारख्या जागतीक व मोठया बाजारपेठेच्या आगदी लागूनच असल्यामुळे पशुसंवर्धनास विशिष्ट महत्व प्राप्त आहे.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर-

    ठाणे जिल्ह्यातील 20 वी पशुगणना नुसार तालुका निहाय पशुधन संख्या

    अ.क्र. तालुका गायवर्ग म्हैसवर्ग शेळी मेंढी कोंबड्या
    1 ठाणे 505 1447 673 58 11738
    2 कल्याण 3521 9183 4787 140 43464
    3 अंबरनाथ 7740 8468 4339 16 61998
    4 मुरबाड 17445 17522 11005 340 196707
    5 शहापूर 40851 30678 21958 137 371592
    6 भिवंडी 9637 27676 18256 1224 392686
    एकूण 80532 95415 61391 1943 1078185

    ठाणे जिल्ह्यातील जिल्हा/तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालये, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1/2 व फिरते पशुवैद्यकीय दवाखाने यांचा तपशील

    अ.क्र. तालुका जिल्हा/तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालये पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 / फिरते दवाखाने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2
    1 ठाणे 0
    • मुंब्रा
    • कोपरखैरणे
    • राई मुर्धा
    2 कल्याण तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालय, कल्याण
    • मांडा
    • कोळे
    • निंबवली
    • रायता
    • खडवली
    3 भिवंडी जिल्हा पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालय, शेलार (भिवंडी)
    • दाभाड
    • पडघा
    • झिडके
    • पिळंजे
    • शिरगांव
    • चाणे
    • तळवली
    • लोणाड
    • पिंपळघर
    • राहनाळ
    • चिंबीपाडा
    • मानकोली
    • वडूनवघर
    • दुगाड
    • अकलोली
    • एकसाल
    4 मुरबाड 0
    • मुरबाड
    • धसई
    • टोकावडे
    • तुळई
    • म्हसा
    • शिवळे
    • कोलठण
    • किशोर
    • न्याहाडी
    • शिरोसी
    • मोरोशीवाडी
    • खुटल
    • उमरोली
    • सरळगांव
    5 शहापूर तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालय, शहापूर
    • खर्डी
    • अघई
    • साकडबांव
    • किन्हवली
    • पिवळी
    • फिरते पवैद शहापूर
    • डोळखांब
    • शेरे
    • कसारा
    • लेनाड
    • वाशाळा
    • सोगाव
    • खरीड
    • वासिंद
    • बिरवाडी
    • खुटघर
    • धसई
    • शेनवा
    • वेहळोली
    • शेंद्रून
    • पांढरीचापाडा
    • गेगांव
    6 अंबरनाथ तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालय, बदलापूर
    • सागाव
    • मांगरुळ
    • वांगणी
    • करवले
    • मुळगाव
    एकूण 4 23 42

    जिल्हा/तालुका पशुवैद्यकीय सर्वर्चिकीत्सालये – 4

    प.वै.द.श्रेणी 1- 22

    फिरते पवैदश्रेणी 1- 1

    प.वै.द.श्रेणी 2 – 42

    पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या योजना

    1. आर्थिक महत्वाच्या रोगावर नियंत्रण अंतर्गत लाळयाखुरकत रोगनियंत्रण लसीकरण
    2. कंट्रोल प्रोग्राम ऑन पीपीआर लसीकरण
    3. घटसर्प / एकटांग्या / लासोटा / रानीखेत रोगनियंत्रण लसीकरण
    4. राष्ट्रीय पशुधन विकास योजना सन 2024-25

    राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Mission) – सन 2024-25

    शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत पशुपालक, शेतकरी समूह गट, महिला बचत गट,
    उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांच्यासाठी 50% अनुदानावर
    विविध योजनांसाठी Online पद्धतीने अर्ज करण्याबाबत सूचित करण्यात येत आहे.

    सन 2024-25 मध्ये केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत खालील तीन उप-अभियान
    राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन
    आणि वैरण विकास क्षेत्राचा विकास करून रोजगार निर्मिती करणे व उद्योजकता वाढविणे हा आहे.
    तसेच पशुधनाच्या वंशावळीमध्ये सुधारणा करणे, वैरण व चारा बियाणे साखळी मजबूत करणे,
    पशुपालकांना दर्जेदार विस्तार सेवा उपलब्ध करून देणे आणि पशुधन क्षेत्रात संशोधनाला
    प्रोत्साहन देणे हा आहे.

    उप-अभियान

    1. पशुधन व कुक्कुट वंश सुधारणा उप-अभियान
    2. पशुखाद्य व वैरण विकास उप-अभियान
    3. नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उप-अभियान

    या उप-अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण संशोधन व विकास, विस्तार उपक्रम आणि पशुधन विमा
    यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थसहाय्य करणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
    आणि दारिद्र्य रेषेखालील पशुपालकांना 05 कॅटल युनिट (शेळी, मेंढी,
    वराह व ससे वगळून) साठी केंद्र व राज्य शासन अर्थसहाय्य देण्यात येईल.

    योजनेविषयी अधिक माहितीसाठी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
    किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख अथवा पशुधन विकास अधिकारी (विस्तार),
    पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

    अर्ज करण्यापूर्वी योजनेविषयी संपूर्ण माहिती करून घेऊन प्रकल्प अहवाल व आवश्यक
    दस्तऐवज तयार ठेवावेत.

    अधिक माहितीसाठी संकेतस्थळ:

    https://ah.maharashtra.gov.in

     

    जिल्हा वार्षिक योजना – पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

    १. जिल्हा परिषदेकडील योजना

    अ.क्र. योजनेचे नाव तरतूद (लक्ष रुपये)
    1 पशुवैद्यकीय संस्थांना औषध पुरवठा करणे 43.00
    2 पशुवैद्यकीय दवाखाना / प्रथमोपचार केंद्र बांधकाम 50.00
    3 वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम 20.00
    4 एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम 11.00

     

    २. विशेष घटक योजना (अनुसूचित जाती करिता)

    अ.क्र. योजनेचे नाव तरतूद (लक्ष रुपये)
    1 अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळ जनावरांचे गट वाटप 25.00
    2 अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना शेळ्यांचे गट वाटप 10.00
    3 अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांच्या जनावरांना जंतनाशक पुरवठा 0.50
    4 अनुसूचित जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण 5.00

     

    ३. आदिवासी क्षेत्र उपयोजना

    अ.क्र. योजनेचे नाव तरतूद (लक्ष रुपये)
    1 पशुवैद्यकीय संस्थांना जीवरक्षक औषधांचा पुरवठा 10.00
    2 दुभत्या जनावरांचा गट वाटप 15.00
    3 अनुसूचित जाती / जमाती कुटुंबांना शेळ्या / मेंढ्यांचे गट वाटप 10.00
    4 पशुवैद्यकीय दवाखाना / प्रथमोपचार केंद्र बांधकाम 20.00

    प्रशासकिय सेटअप-

    जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,/ सह्यक गटविकास अधिकारी, /पशुधन विकास अधिकारी

    पुरस्कार आणि प्रशंसा-

    ठाणे जिल्हा परिषद

    दुग्ध व्यवसाय मधील आदर्श पशुपालक पुरस्कार सन 2023-24

    श्री.हरिचंद्र नाना राऊत रा.चासोळे ता.मुरबाड जि.ठाणे

    संलग्न कार्यालये– सहआयुक्त कार्यालय , मुलुंड /मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहा.आयुक्त,मुंबई

    संचालनालय / आयुक्तालय– पशुसंवर्धन ,म.शा.राज्य औध -पुणे -६७

    राज्य सरकार

    पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना

    योजना

    1. पशुवैद्यकीय दवाखाना / पशुप्रथमोपचार केंद्राचे बांधकाम
    2. पशुवैद्यकीय संस्थांना जीवरक्षक औषधांचा पुरवठा
    3. वैरण विकास व पशुखाद्य कार्यक्रम
    4. एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम
    5. अनु जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना जनावरांचे गटवाटप
    6. अनु जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना शेळ्यांचे गटवाटप
    7. अनु जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांच्या जनावरांना जंतनाशक वाटप
    8. अनु जाती / नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण
    9. पशुवैद्यकीय संस्थांना जीवरक्षक औषधांचा पुरवठा
    10. पशुवैद्यकीय दवाखाना / पशुप्रथमोपचार केंद्राचे बांधकाम
    11. दुभत्या जनावरांचा गट वाटप
    12. अनुसूचित जाती / जमाती कुटुंबांना शेळ्या / मेंढ्यांचे गट वाटप

    योजनेचे उद्दिष्ट

    • पशुधनाचे संवर्धन : कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांना पशुपालनासाठी उत्तम जातींचे पशुधन उपलब्ध करून देणे.
    • पशु आरोग्य : पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेणे व रोगांपासून संरक्षणासाठी उपाययोजना करणे.
    • दूध उत्पादनात वाढ : उच्च गुणवत्तेचे दूध उत्पादन वाढविणे.
    • पशुपालनातून आर्थिक लाभ : शेतकऱ्यांना पशुपालनाच्या माध्यमातून अधिक आर्थिक लाभ मिळवून देणे.
    • शेती व पशुपालन एकत्रीकरण : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी शेती आणि पशुपालन यांचे संतुलित एकत्रीकरण करणे.

     

     केंद्र सरकार –

    सदर उपअभियाना अंतर्गत नाविन्यपूर्ण संशोधन व विकास, विस्तार उपक्रम, पशुधन विमा, यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे, अनुसूचित जाती, अनुसूचित  जमाती व दारिद्र रेषेखालील पशुपालकांना ०५ कॅटल युनिट ( शेळी – मेंढी, वराह व ससे वगळून ) साठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे.  सदर  योजने विषयीची सखोल माहिती करून घेणे साठी   पशुसंवर्धन विभागाच्या  www.ah.maharshtra.gov.in   या अधिकृत संकेतस्थळा  भेट द्यावी किंवा  नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख,  पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती  यांचेशी संपर्क साधावा .योजेने साठी अर्ज भरताना योजने विषयी पूर्ण माहिती करून घेऊन, प्रकल्प अहवाल व अनुषंगिक सर्व दस्तऐवज जवळ ठेवावेत अर्ज करण्यासाठी htpps:// www.udymimitra.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी.

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्वे

    जिल्हयातील पशुपालकांना सोयी सुविधा पुरविणे.

    पशुआरोग्य सेवा देणे.रोग नियंत्रण करणे.पशुसंवर्धन विभागांतर्गत येणा-या सर्व योजनांची माहिती जिल्हयातील  पशुपालकांना देणे. सदर योजनांचा लाभ घेणेस प्रवृत्त करणे व त्यांचा आर्थिक दर्जा वाढविणे.संकरित गो-पैदास कार्यक्रम राबविणे शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुप व्यवसाय उपलब्ध करुन देणे त्यांचे आर्थिक जिवनमान उंचावणे व प्रगती होणे

    पशुसंवर्धन विभाग – योजना व आर्थिक तरतूद

    अ.क्र. योजनेचे नाव मूळ नियतव्यय वाढीव अंतिम तरतूद
    1 पशुवैद्यकीय संस्थांची इमारत दुरूस्ती 60.00 0.00 60.00
    2 ७५% अनुदानाने चिकन मटन स्टॉल धारकांना सुविधा पुरविणे 0.01 4.99 5.00
    3 तांत्रिक सेवा शुल्कामधून प.वै. संस्थांना दुरूस्ती, अत्यावश्यक औषध, लेखन सामग्री, वीज/पाणी, दूरध्वनी, संगणक पुरविणे 15.00 0.00 15.00
    4 पशुवैद्यकीय दवाखान्यांना पेटंट औषधे व लसीचा पुरवठा करणे 25.00 0.00 25.00
    5 प्रसिद्धी व प्रचार कार्यक्रम अंतर्गत प्रसिद्धी साहित्य पुरवठा व तालुकास्तरावर पशुपालकांचे प्रशिक्षण 8.00 0.00 8.00
    6 ६०% अनुदानावर तबेले धारकांना सुविधा पुरविणे 3.00 0.00 3.00
    7 जिल्ह्यातील उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार 2.00 0.00 2.00
    8 ७५% अनुदानावर अपंगांसाठी दुग्ध व्यवसायासाठी संकरीत गाय वाटप 0.01 0.00 0.01
    9 पशुपालकांना १००% अनुदानावर क्षार मिश्रण व खोडा पुरविणे 20.00 0.00 20.00
    10 पशुवैद्यकीय दवाखान्यांचे बळकटीकरण व वाहन इंधन खर्च 70.00 0.00 70.00
    11 जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन 0.01 9.99 10.00
    12 सादील खर्च 7.90 5.00 12.90
    13 पशुवैद्यकीय व्यवसायासाठी बचत गटांना अर्थसहाय्य 0.01 0.00 0.01
    14 पारडी अनुदान योजना 3.00 1.00 4.00
    15 हळवा रोग सदृश्य बाधीत भागात मृत जनावरांची विल्हेवाट लावणे 0.05 0.00 0.05
    16 गाव तेथे खोडा 0.01 0.00 0.01
    17 ५०% अनुदानावर शेळी गट वाटप (५+१) 15.00 1.00 16.00
    18 आपत्कालीन परिस्थितीत लस, औषध खरेदी व इतर खर्च 1.00 0.00 1.00
    19 ५०% अनुदानावर संकरीत गाय व म्हैस वाटप 70.00 0.00 70.00
    एकूण 300.00 21.98 321.98

    कार्यासननिहाय सेवा तपशील

    अ. क्र. कार्यासनाचे नाव विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहित मुदत सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुद्दा
    1 माहिती अधिकार कार्यासन माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणे श्रीम. श्वेता संख्ये
    सहा. जन माहिती अधिकारी तथा
    सहा. प्रशासन अधिकारी (प्रतिनियुक्तीवर कोकण भवन)
    30 दिवस अपिलीय प्राधिकारी तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
    जिल्हा परिषद ठाणे
    2 समिती कामकाज पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभेचे सर्व कामकाज पाहणे व अंमलबजावणी करणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    3 सर्वसाधारण सभा स्थायी समिती व जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा विषयक सर्व कामकाज पाहणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    4 तक्रार व लोकशाही दिन लोक आयुक्त प्रकरणे, जनता दरबार, लोकशाही दिन, पी.आर.सी., आदिवासी कमिटी कामकाजावर नियंत्रण ठेवणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    5 प्रशासन शाखा प्रशासन, नोंदणी शाखा, आस्थापनाविषयक बाबींवर नियंत्रण ठेवणे व अंमलबजावणी करणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    6 ISO कामकाज ISO अंतर्गत कामकाज पाहणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    7 यशवंत पंचायत राज अभियान यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कामकाज पाहणे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    8 प्रशासन (कनिष्ठ प्रशासन अधिकारी) पशुसंवर्धन अधिकारी सभेचे आयोजन व इतिवृत्त तयार करणे कनिष्ठ प्रशासन अधिकारी विहित मुदतीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    9 सभा तयारी पशुसंवर्धन विभागातील सर्व सभांची तयारी व माहिती संकलन कनिष्ठ प्रशासन अधिकारी नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    10 लेखा शाखा लेखाविषयक सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी व विहित मुदतीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    11 लेखा तपासणी पंचायत राज कमिटी, महालेखाकार व स्थानिक निधी लेखा परिच्छेद पूर्तता करणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    12 अंदाजपत्रक अंदाजपत्रके, सुधारीत अंदाजपत्रके व खर्च अहवालावर नियंत्रण ठेवणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    13 खर्च नोंद जिल्हा परिषद व अभिकरण योजनांच्या खर्चाची नोंदवही अद्ययावत ठेवणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    14 प्रवास भत्ता कर्मचाऱ्यांचे प्रवास भत्ते देयके तपासणे व मंजुरीसाठी सादर करणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    15 आर्थिक रजिस्टर सर्व आर्थिक खर्चाचे रजिस्टर अद्ययावत ठेवणे व अहवाल सादर करणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    विहित मुदतीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    16 लेखा परीक्षण महालेखाकार, स्थानिक निधी लेखा व पंचायत राज समिती लेखा परीक्षण मुद्यांची पूर्तता करणे श्रीम. सुषमा कंटे
    कनिष्ठ सहाय्यक लेखा
    वेळोवेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

     

    आस्थापना शाखा – सेवा तपशील

    अ. क्र. कार्यासनाचे नाव विभागाकडून / कार्यालयाकडून पुरविली जाणारी सेवा संबंधित अधिकारी / कर्मचारी यांचे नाव व हुद्दा सेवा पुरविण्याची विहित मुदत सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुद्दा
    1 आस्थापना पशुसंवर्धन विभागातील आस्थापना शाखेची सर्व कामे (वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी व कर्मचारी यांची वैयक्तिक नस्ती, सेवा पुस्तके अद्यावत करणे, वेतन वाढ, रजिस्टर, भ.नि.नि., गटविमा प्रकरणे, वैद्यकीय देयके, प्रवासभत्ता) श्रीम. अपर्णा हरपळे – वरिष्ठ सहाय्यक
    श्रीम. असलका गोडांणे – कनिष्ठ सहाय्यक
    नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    2 जामीन कदबा रजिस्टर / नस्ती, भ.नि.नि. अग्रीम, वर्ग-3 व वर्ग-4 चे पगार नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    3 वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल व नोंदवही अद्यावत ठेवणे वार्षिक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    4 रोस्टर रजिस्टर तपासून अद्यावत करणे वार्षिक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    5 कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तयार करणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    6 आस्थापना विषयक मासिक, त्रैमासिक, सेवानिवृत्ती, कुटुंब निवृत्ती वेतन, अनाधिकृत गैरहजेरी, निलंबन व विभागीय चौकशी प्रकरणांचे अहवाल व रजिस्टर नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    7 ज्येष्ठता सूची व सेवेत कायम करणेसंबंधी प्रमाणपत्र प्रस्ताव वार्षिक जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    8 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती पुरविणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    9 जनता दरबार, लोकशाही दिन, PRC, अनु.जमाती / अनु.जाती कमिटी प्रश्नावली व SO नस्ती अद्यावत ठेवणे नियमित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
    10 मंजूर पदानुसार सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविणे तसेच बदल्या व पदोन्नती प्रस्ताव तयार करणे नियमित कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे

    विभागप्रमुख

    नाव – श्री. वल्लभ जोशी
    पदनाम-उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायईमेल
    पत्ता – dahothane[at]gmail[dot]com
    पत्ता  -२०६, कार्यालयाचा पत्ता : स्क्वेअर फिट होम्स, पहिला माळा प्लॉट नं१०६/१०७,एस.जी.बर्वे रोड, जी.एस.टी.भवन समोर, वागळे इस्टेट

    प्रकाशने

    यशोगाथा

    नमस्कार ! मी सौ.ज्योती संदीप अधिकारी, रा.सोनटक्के, ता.भिवंडी या गावची रहिवाशी असून लग्ऩ झाल्यानंतर पतीचे शिक्षण कमी असल्यामुळे कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी आम्ही दुग्धव्यवसाय करण्याचे ठरविले. सुरूवातीला आम्ही देशी/गावठी  म्हैशी खरेदी केल्या.  स्थानिक म्हैशी असल्याकारणाने सुरूवातीचा खर्च कमी होतो. त्यानंतर गोठयामध्ये म्हैशींची संख्या वाढत गेली.

    पशुवैदयकीय अधिकारी लसीकरणासाठी घरी आल्यांनतर त्यांनी कृत्रिम रेतन करूण घेण्यास सांगितले तसेच जिल्हा परिषद योजनांची माहिती सांगितली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी सन 2023-24 मध्ये 1 दुधाळ म्हैस वाटप योजने मधुन अर्ज केला व तो मंजूर ही  झाला. योजनेचा लाभ मिळाल्यामुळे  आमच्या व्यवसायाला आर्थिक हातभार लागला..

    नागरिकांची सनद सन २०२५-२६