बंद

    बांधकाम विभाग

    विभागाबद्ल माहिती :-

    बांधकाम विभाग हा जिल्हा परिषदेच्या विभागांपैकी एक  विभाग आहे.  कार्यकारी अभियंता हे या विभागाचे प्रमुख असतात. ग्रामीण भागातील रस्ते व इमारतीचे बांधकामे व देखभाल दुरुस्तींचे कामे बांधकाम विभागाकडून केली जातात.

    परिचय :-

    • बांधकाम विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्ते व इमारतींची बांधकामे तसेच देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात येतात. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या इतर विभागांकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त करून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीतून नवीन इमारतींचे बांधकाम तसेच अस्तित्वातील इमारतींच्या दुरुस्तीची कामे केली जातात. या कामकाजासाठी प्रत्येक तालुक्यात एक बांधकाम उपविभाग कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता हे बांधकाम विभागाचे प्रमुख असतात. त्यांच्या अधिपत्याखाली प्रत्येक तालुक्यात एक उपविभागीय अभियंता कार्यरत असतो. या अधिकाऱ्यांची नेमणूक शासनाच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येते. तालुका स्तरावरील उपविभागीय कार्यालय हे कनिष्ठतम कार्यालय असून, जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या बांधकामाबाबतची सर्व प्राथमिक माहिती या स्तरावर उपलब्ध होते.जिल्हा परिषदेच्या इतर विभागांकडून, उदा. पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग, ग्रामपंचायत विभाग, कृषि विभाग तसेच महिला व बालकल्याण विभाग, यांच्याकडे उपलब्ध होणाऱ्या निधीतून संबंधित विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेल्या नवीन इमारती, स्मशानभूमी, अंगणवाडी केंद्रे तसेच अस्तित्वातील इमारतींच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने करण्यात येतात. काम पूर्ण झाल्यानंतर ही कामे संबंधित विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतात.जिल्हा परिषदेतील इमारती व बांधकाम विषयक नियंत्रण, तांत्रिक सल्ला तसेच कामांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग यांची असते.

    व्हिजन आणि मिशन –

    जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ग्रामीण रस्ते व इमारतींच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडे तयार करणे तसेच गुणवत्तापूर्ण कामांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

    अनियोजित (Non-Plan) रस्त्यांबाबत वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने विचारात घेऊन, जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या अधीन राहून, ग्रामीण रस्ते व जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या दुरुस्ती तसेच रस्ते सुधारणा यांचा आराखडा तयार करण्यात येतो. तरतूद लेखाशिर्षनिहाय उपलब्ध निधीनुसार, आराखड्यातील कामांना जिल्हा परिषदेच्या विषय समितीची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.

    उद्दीष्टे कार्ये मजकूर –

    अ) लोकप्रतिनिधींनी सुचविलेली कामे, वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या तक्रारी/निवेदने, पुरहानी तसेच इतर आपत्कालीन परिस्थिती आणि शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशांनुसार जिल्हा परिषद स्तरावर रस्त्यांचे सर्वेक्षण करून, प्राधान्यक्रमानुसार आवश्यक रस्ते कामांची यादी तयार करण्यात येते व त्यानुसार PCI रजिस्टर तयार करण्यात येते.

    ब) शासनाकडून प्राप्त विविध योजनांतर्गत निधीतून कामे हाती घेण्यासाठी, निधीच्या उपलब्धतेनुसार व संबंधित योजनेच्या निकषांनुसार, PCI रजिस्टरमधील प्राधान्यक्रमानुसार आवश्यक कामांचा योजनानिहाय आराखडा तयार करण्यात येतो.

    क) तयार करण्यात आलेल्या आराखड्यास संबंधित विभागाची मान्यता घेऊन, प्रशासकीय मान्यतेसाठी अंदाजपत्रके सादर करण्यात येतात.

    प्रशासकीय सेटअप –

    कार्यकारी अभियंता

    उपकार्यकारी अभियंता

    शाखा/कनिष्ठ अभियंता

    स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

    आरेखक

    संलग्न कार्यालये

    1. बांधकाम विभाग मुख्यालय ठाणे
    2. बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर – अंबरनाथ
    3. बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर – भिवंडी
    4. बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर – कल्याण
    5. बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर- मुरबाड
    6. बांधकाम उपविभाग पंचायत समिती स्तर   – शहापूर

    विभाग प्रमुख

    कार्यकारी अभियंता-श्री.पद्माकर लहाने

    ई-मेल पत्ता- workswestzpthane[at]gmail[dot]com

     

    नागरिकांचा कॉर्नर

    अ.क्र. विषय माहिती
    1 मक्तेदार नोंदणी खुला वर्ग, मजूर कामगार संस्था तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांनुसार,
    शासनाने विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे मक्तेदार नोंदणी करण्यात येते.
    2 पाईप लाईन परवानगी विविध खाजगी कंपन्यांकडून जिल्हा परिषदेच्या रस्त्यालगत पाईप लाईन (गॅस, पाणी इत्यादी) टाकण्यासाठी
    प्राप्त होणाऱ्या अर्जांनुसार आवश्यक तपासणी व अटींची पूर्तता केल्यानंतर जिल्हा परिषदेकडून परवानगी
    देण्यात येते.
    3 काम वाटप प्रक्रिया रु. 10.00 लक्षांपर्यंतच्या अंदाजपत्रकीय रकमेच्या कामांची यादी ऑनलाइन
    ekamwatapthanezp.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. प्राप्त होणाऱ्या ऑनलाइन अर्जांनुसार
    ऑनलाइन लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या ठेकेदारास काम वाटप समितीच्या शिफारशीनुसार कामे वाटप
    करण्यात येतात.
    4 फॉर्म ऑनलाईन सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर कामगार संस्था नोंदणी तसेच ऑनलाईन कामवाटप साठी
    प्राप्त अर्ज ekamwatapthane.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

     

    योजना / उपक्रम

    अ.क्र. योजना / कार्यक्रम माहिती
    1 यात्रास्थळ विकास कार्यक्रम ‘क’ वर्गीय यात्रास्थळांच्या विकासासाठी जोड रस्ते, स्वच्छतागृह, दुकान गाळे,
    जमीन सपाटीकरण, सभागृह, कमान इ. कामे करण्यात येतात.
    2 15 वा वित्त आयोग (राज्यस्तर) इतर जिल्हा मार्ग किमान 3 कि.मी. व ग्रामीण मार्ग किमान 2 कि.मी. लांबीमध्ये
    मजबूतीकरण व डांबरीकरणाची कामे करण्यात येतात.
    3 ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा कार्यक्रम रस्ते सुधारणा, रस्ते काँक्रीटीकरण, समाजमंदिर, स्मशानशेड,
    इमारतीस कुंपण इ. कामे करण्यात येतात.
    4 रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग (3054) PCI गुणनुक्रमानुसार उपलब्ध निधीच्या प्रमाणात रस्ते बांधणी,
    सुधारणा व खडीकरणाची कामे करण्यात येतात.
    5 रस्ते व पुल जिल्हा व इतर मार्ग (5054) उपलब्ध निधीनुसार रस्ते बांधणी, रस्ते सुधारणा, खडीकरण
    तसेच पुल व मोऱ्यांची कामे करण्यात येतात.
    6 रस्ते विशेष दुरुस्ती (गट-ब / गट-क) रस्ते मजबूतीकरण, डांबरीकरण नुतनीकरण,
    लहान मोऱ्या व पुलांची दुरुस्ती करण्यात येते.
    7 रस्ते सर्वसाधारण दुरुस्ती रस्त्यावरील खड्डे भरणे, पॅरापेट दुरुस्ती,
    भराव पुनर्स्थापना इ. कामे करण्यात येतात.
    8 डोंगरी विकास कार्यक्रम रस्ते, समाजमंदिर, शाळागृहे, वॉलकंपाऊंड,
    मोऱ्या व पुल बांधणीची कामे करण्यात येतात.
    9 स्थानिक विकास (खासदार निधी) खासदार निधीतून रस्ते, समाजमंदिर, शाळागृहे,
    संरक्षक भिंत व पुल बांधकामे करण्यात येतात.
    10 स्थानिक विकास (आमदार निधी) आमदार निधीतून विविध विकासकामे करण्यात येतात.
    11 आरोग्य केंद्र / उपकेंद्र बांधकाम आरोग्य विभागाच्या आराखड्यानुसार निविदा प्रक्रियेद्वारे
    बांधकामे करण्यात येतात.
    12 पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम पशुसंवर्धन विभागाकडून प्राप्त आराखड्यानुसार
    बांधकामे करण्यात येतात.
    13 अंगणवाडी केंद्र बांधकाम महिला व बालकल्याण विभागाच्या आराखड्यानुसार
    अंगणवाडी इमारती बांधण्यात येतात.
    14 जि.प. रस्ते बांधणी जिल्हा परिषद स्वनिधीमधून रस्ते बांधणीची कामे करण्यात येतात.
    15 जि.प. रस्ते, पुल व मोऱ्या दुरुस्ती जिल्हा परिषद अखत्यारीतील रस्ते व पुलांची दुरुस्ती करण्यात येते.
    16 जि.प. इमारती दुरुस्ती मुख्यालय व तालुका स्तरावरील जिल्हा परिषद इमारतींची दुरुस्ती करण्यात येते.
    17 प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना कामाच्या प्रगतीनुसार 60% RA Bill व उर्वरित 40% संयुक्त पाहणी अहवालानुसार
    अदा करण्यात येते.

     

    RTI माहिती

    पद अधिकारी
    जन माहिती अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी
    अपिलीय अधिकारी उपकार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग

     

    नागरिकांची सनद बांधकाम विभाग सन 2024-25