भिवंडी
विभागाबद्दल माहिती
पंचायत समिती भिवंडी अंतर्गत एकूण १५ विभाग कार्यरत आहेत.
- १६ पशुवैद्यकीय दवाखाने
- ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २ उपकेंद्रे (भिवंडी व आनगांव)
- आनगांव ICDS अंतर्गत २३० अंगणवाड्या
- भिवंडी ICDS अंतर्गत २११ अंगणवाड्या
- ३०८ प्राथमिक शाळा
- १२१ ग्रामपंचायती
—
परिचय
- पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख गट विकास अधिकारी असतात.
- त्यांना सहाय्यक गट विकास अधिकारी सहाय्य करतात.
- सभापती व उपसभापती हे पंचायत समितीचे निवडून आलेले पदाधिकारी असतात.
—
व्हिजन आणि मिशन
गाव पातळीवरील पायाभूत सुविधा विकसित करणे आणि शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे.
—
उद्दिष्टे व कार्ये
गाव पातळीवरील विकास साधणे व सर्व योजना प्रभावीपणे अंमलात आणणे.
—
प्रशासकीय सेटअप
- गट विकास अधिकारी (निवड श्रेणी)
- सहाय्यक गट विकास अधिकारी
- सहाय्यक प्रशासन अधिकारी / कनिष्ठ प्रशासन अधिकारी
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी / पंचायत)
- वरिष्ठ सहाय्यक / कनिष्ठ सहाय्यक
- ग्रामपंचायत अधिकारी / कर्मचारी
- शिपाई
—
पुरस्कार आणि प्रशंसा
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत समिती, अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना शासन स्तरावर विविध पुरस्कार प्रदान केले जातात.
यामध्ये यशवंत पंचायत राज पुरस्काराचा समावेश आहे.
—
सेवा
- कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी, वेतनवाढ व गोपनीय अहवाल
- जन्म, मृत्यू, विवाह नोंद प्रमाणपत्रे
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र, निराधार दाखला इ.
- रस्ते, आरोग्य व पुनर्वसन सेवा
कमिशन: १५ वा वित्त आयोग
—
संपर्क तपशील
- नाव: श्री गोविंद लता रघुनाथ खामकर
- पद: गट विकास अधिकारी (निवड श्रेणी)
- ईमेल: bdobhiwandi[at]gmail[dot]com
- पत्ता: पंचायत समिती भिवंडी, तहसिल कार्यालयाजवळ, जि. ठाणे
- फोन: ०२५२२ २२९२१२
—
प्रमुख सेवा
- दारिद्र्य रेषेचा दाखला
- लोकसंख्या दाखला
- सक्षमतेचा दाखला
—
योजना / उपक्रम
राज्य सरकार योजना
| योजना | स्वरूप | निकष |
|---|---|---|
| मोदी आवास योजना | घरकुल मंजुरी | ग्रामसभा ठराव, जातीचा दाखला, आधार, उत्पन्न प्रमाणपत्र |
| आदिम आवास योजना | घरकुल मंजुरी | कातकरी प्रवर्ग, आवश्यक कागदपत्रे |
| रमाई आवास योजना | घरकुल मंजुरी | अनुसूचित जाती प्रमाणपत्र आवश्यक |
| शबरी आवास योजना | घरकुल मंजुरी | अनुसूचित जमाती प्रमाणपत्र आवश्यक |
—
केंद्र सरकार योजना
- प्रधानमंत्री आवास योजना
- महात्मा गांधी रोजगार हमी योजना
- १५ वा वित्त आयोग
—
संयुक्त उपक्रम
- घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन
- सार्वजनिक शौचालय
—
धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे
- रस्ते व बांधकाम दुरुस्ती आणि परीक्षण
- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गट निर्मिती व आर्थिक सहाय्य
—
योजना / कार्यक्रम
रमाई आवास योजना
- कालावधी: १ वर्ष
- क्षेत्र: भिवंडी तालुका
मोदी आवास योजना
- कालावधी: १ वर्ष
- क्षेत्र: भिवंडी तालुका
दिव्यांग योजना
- दिव्यांग व्यक्तींना ३ चाकी वाहन उपलब्ध