बंद

    शहापूर

    विभागाबद्दल माहिती

    ठाणे जिल्हयातील शहापूर तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून शहापूर तालुक्याची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 313151 एवढी आहे. शहापूर तालुका हा डोंगरदऱ्या व खोऱ्यांनी नटलेला आहे. तालुक्याच्या  पश्चिमेला माहुली किल्ला हे प्रेक्षणिय ठिकाण आहे. पूर्वेला सहयाद्री पर्वत असून या पर्वतराजाच्या कुशीत तालुक्याला भुषणावह ठरणारा अजापर्वत आहे. तेथे वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. या तालुक्यात तानसा, भातसा, वैतरणा ही जलाशये असून संपूर्ण मुंबईला या जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येतो. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा तालुका असल्याने येथिल लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती व मोलमजुरी करणे आहे. बहुसंख्य लोक, ठाकुर, कातकरी व कुणबी समाजाचे आहेत.

    परिचय

    महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील नियम 56 नुसार प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असेल आणि या अधिनियमान्वये किंवा अन्यथा तिच्यामध्ये निहित केलेली असतील अशी सर्व कार्ये ही पंचायत समितीची कार्ये असतील.

    प्रत्येक पंचायत समितीमध्ये कलम 58 आणि त्या बाबतीतील नियमात अंतर्भुत तरतुदीनुसार प्रत्येक निर्वाचक गणामधुन प्रत्येकी एक याप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल.

    व्हिजन आणि मिशन

    1.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्वसाधारण आदेशांना अधीन राहून पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन किंवा वर्ग चारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना  किंवा कर्मचाऱ्यांना अनुपस्थिती रजा मंजूर करेल.

    2.कोणत्याही अधिकाऱ्याकडून किंवा कर्मचाऱ्याकडून कोणतीही माहिती विवरण, विवरणपत्र हिशेब, अहवाल किंवा स्पष्टीकरण मागविता येईल.

    3.पंचायत समितीच्या बैठकीच्या कामकाजाशी संबंधीत असलेली सर्व कागदपत्रे व दस्तऐवज अभिरक्षेत ठेवणे.

    4.पंचायत समितीच्या प्रदेय असणाऱ्या अनुदानाच्या किंवा अनुदानांच्या रक्कमांतून पैसे काढील व संवितरीत करील.

    5.गटअनुदानातून हाती घ्यावयाच्या कामांच्या व विकास प्रयोजनेच्या संबंधात, राज्य शासनाकडून विर्निदिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे मालमत्ता संपादन करण्यास किंवातिची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्याच्या अधिकारांचा वापर करील.

    उद्दिष्टे कार्ये मजकूर

    कार्ये

      1. पंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.
      2. गटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
      3. समितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे
      4. जिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे
      5. विकास योजनांवर नियंत्रण ठेवणे..
      6. पंचायत समितीच्या सभा बोलावील त्या सभांचे अध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.
      7. पंचायत समितीचे अभिलेख पाहू शकेल.
      8. अंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीचे ठराव आणि निर्णय कार्यान्वत करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अभिलेख यांच्या बाबतीत गटात काम कणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या करतीचे पर्यवेक्षण करील व त्यांवर नियंत्रण ठेवील.
      9. गट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यात संबंधात राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.
      10. पंचायत समितीची मालमत्ता तपासण्याचा अधिकार.
      11. पंचायत समिती वा जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या विकास प्रकल्पाची पाहणी करणे.
      12. पंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-याकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.
      13. गटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेत किंवा जिल्हा परिषदेने अशा पंचायत समितीने अथवा तिच्या निर्देशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.

    पुरस्कार आणि प्रशंसा

    पुरस्काराचे शीर्षक – यशवंत पंचायत राज अभियान सन 2022-2023

    पुरस्काराचे वर्ष – 2022 – 2023

    पुरस्काराचे नाव – राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषद व पंचायत समिती यांना विभाग व राज्यस्तरावर पुरस्कार प्रदान करणे.

    पुरस्काराची तारीख – 12 जून, 2023

    Team Member – गटविकास अधिकारी व सर्व पंचायत समिती अधिकारी/कर्मचारी

    प्रमाणपत्र –

    पुरस्काराचे शीर्षक – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2023-2024

    पुरस्काराचे वर्ष – 2023-2024.

    पुरस्काराचे नाव – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2023-2024

    पुरस्काराची तारीख –

    Team Member – गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शहापूर व संपुर्ण शिक्षण विभाग

    पुरस्काराचे शीर्षक – जिल्हा परिषद अधिकारी/कर्मचारी पुरस्कार

    पुरस्काराचे वर्ष – 2023-2024.

    पुरस्काराचे नाव – श्री.अजय वामन भोंडीवले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी

    श्रीम.सुरेखा पाटील, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) श्री.विकास मेतकर, वरिष्ठ सहाय्यक श्री.अरुण विशे, कनिष्ठ सहाय्यक, श्री.नरेंद्र विदे, वाहनचालक यांना गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कार प्राप्त.

    सलग्न कार्यालये

    पंचायत समिती शहापूर अंतर्गत विभाग –ग्रामपंचायत, समाजकल्याण, लेखा, बांधकाम, पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, कृषी, नरेगा, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान, पेसा, स्वच्छ भारत मिशन

    आयुक्तालये

    मा.विभागीय आयुक्त, कोकण विभाग,कोकण भवन

    संपर्क तपशील

    नाव – श्रीम.नम्रता मीना चंद्रकांत जगताप

    पदनाम – गटविकास अधिकारी (उ.श्रे) पंचायत समिती शहापूर

    ई मेल पत्ता- bdoshahapur@gmail.com

    पत्ता- जुना आग्रा रोड, शीवतीर्थाजवळ, शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे

    योजना/ उपक्रम

    राज्य सरकार

    अ.क्र योजनेचे नाव योजनेचे स्वरुप योजनेचे निकष
    1 मागासवर्गीय लाभार्थीना डि. जे. पुरविणे सामुहिक 1.लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अज.अजा विजा भज)

    2.लाभार्थी स्थानिक असावा

    2. मागासवर्गीय वस्ती मध्ये समाज मंदिरामध्ये भांडी पुरविणे सामुहिक 1.वस्ती अनु सुचित जाती /जमाती व भटक्या जमाती असावी

    2.समाज मंदिर सुस्थितीत असावे.

    3. मागासवर्गीय लाभार्थीना रोजगारासाठी वादयवृंद पुरविणे सामुहिक 1.लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अज.अजा विजा भज)

    2.लाभार्थी स्थानिक असावा

    4 मागासवर्गीय वस्ती मध्ये समाज मंदिरामध्ये संतरजी पुरविणे सामुहिक 1.वस्ती अनु सुचित जाती /जमाती व भटक्या जमाती असावी

    2.समाज मंदिर सुस्थितीत असावे.

    5 अहिल्यादेवी सिंचन विहीर/ शेततळे वैयक्तीक

     

    लाभार्थीचे नावे जमीन,  जॉबकार्ड आवश्यक, लाभार्थीच्या 7/१२,८ अ आणि ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा, लाभार्थी सदर गाव चा रहिवाशी असल्यास रहिवासी स्वयं घोषणा पत्र, लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स,सदर चे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा /labour बजेट मद्ये समाविष्ट असलेले ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार पत्र घेणे. ग्रामसभा ठराव बँक खाते.
    6 बांधबंधिस्ती/ जलतारा वैयक्तीक

     

    लाभार्थीचे नावे जमीन,  जॉबकार्ड आवश्यक, लाभार्थीच्या 7/ १२,८ अ आणि ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा, लाभार्थी सदर गाव चा रहिवाशी असल्यास रहिवासी स्वयं घोषणा पत्र, लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स,सदर चे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा /labour बजेट मद्ये समाविष्ट असलेले ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार पत्र घेणे. ग्रामसभा ठराव बँक खाते.
    7 नाडेप व वर्मी कंपोष्ट वैयक्तीक लाभार्थीचे नावे जमीन,  जॉबकार्ड आवश्यक, लाभार्थीच्या 7/१२,८ अ आणि ग्रामपंचायत नमुना 8 चा उतारा, लाभार्थी सदर गाव चा रहिवाशी असल्यास रहिवासी स्वयं घोषणा पत्र, लाभार्थी आधार कार्ड झेरॉक्स,सदर चे काम ग्रामपंचायत वार्षिक कृती आराखडा /labour बजेट मद्ये समाविष्ट असलेले ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार पत्र घेणे. ग्रामसभा ठराव बँक खाते.
    8 रेन वॉटर हार्वेस्टींग सार्वजनिक ग्रामपंचायत पत्र व  शाळा  दाखला
    9 रस्ते सार्वजनिक ग्रामपंचायत पत्र  दानपत्र जागेबाबत तपशिल
    10 शाळा संरक्षण भिंत सार्वजनिक ग्रामपंचायत पत्र    शाळा  दाखला
    11 गाळ काढणे सार्वजनिक ग्रामपंचायमत पत्र व तीन वर्ष गाळ न काढलयाचे ग्राप पत्र
    12 वृक्ष लागवड सार्वजनिक ग्रामपंचायत पत्र व जागेचा तपशिल
    13 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

     

    1.नविन विहिर
    2. जुनी विहिर
    3.इनवेल बोअरींग
    4.पंप संच
    5.वीज जोडणी आकार
    6.शेततळयाचे प्लास्टीक अस्तरीकरण
    7.सुक्ष्म्‍ सिंचन संच
    अनुदान नविन विहिर साठी र.रु.४.00 लाख
    १) लाभार्थी अनुसूचित जमाती /अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.२) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक ३)ज्या शेतकऱ्यांना नवीन विहिर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांना किमान ०.४० हेक्टर शेतजमीन आवश्यक ४) सामूहिक शेत जमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर घटकाचा लाभ घेण्यास पात्र      असेल.५)नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्याकरिता किमान ०.२० हेक्टर शेतजमीन आवश्यक ६)या योजनेअंतर्गत कमाल शेत जमिनीची अट ६ हेक्टर आहे. ७)शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक७)लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ८)लाभार्थ्याची बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.९) शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १,५०,००० लाख पेक्षा जास्त नसावे.१०) लाभार्थी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
    14 बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (TSP) 1.नविन विहिर

    2. जुनी विहिर

    3.इनवेल बोअरींग

    4.पंप संच

    5.वीज जोडणी आकार

    6.शेततळयाचे प्लास्टीक अस्तरीकरण

    7.सुक्ष्म्‍ सिंचन संच

    अनुदान नविन विहिर साठी र.रु.४.०० लाख

    १) लाभार्थी अनुसूचित जमाती /अनुसूचित जाती / नवबौध्द शेतकरी असला पाहिजे.२) शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकार्‍याने दिलेले जात प्रमाणपत्र आवश्यक ३)ज्या शेतकऱ्यांना नवीन विहिर या घटकाचा लाभ घ्यावयाचा आहे त्यांना किमान ०.४० हेक्टर शेतजमीन आवश्यक ४) सामूहिक शेत जमीन किमान ०.४० हेक्टर धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर घटकाचा लाभ घेण्यास पात्र      असेल.५)नवीन विहिरी व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घेण्याकरिता किमान ०.२० हेक्टर शेतजमीन आवश्यक ६)या योजनेअंतर्गत कमाल शेत जमिनीची अट ६ हेक्टर आहे. ७)शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक७)लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ८)लाभार्थ्याची बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.९) शेतकऱ्याचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न १,५०,००० लाख पेक्षा जास्त नसावे.१०) लाभार्थी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
    15 स्वच्छ भारत मिशन ग्रा वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहनपर अनुदान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर, भूमिहिन, अल्पभूधारक, दिव्यांग, महिला कुटूंबप्रमुख
    16 स्वच्छ भारत मिशन ग्रा सार्वजनिक शौचालय बाजारपेठ यात्रास्थळ बसथांबा अनुसूचित जमाती, या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधकाम केले जाते.
    17 स्वच्छ भारत मिशन ग्रा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ओला कचरा टाकण्यासाठी गावात नाडेप बांधण्यात आले आहेत. सुका कचरा टाकण्यासाठी प्लास्टीक संकलन जाळी शेड उभारण्यात आले आहे. सांडपाणी व्यवस्थापन साठी लिचपीट बांधण्यात आले आहे.
    18 राष्ट्रीय कुटुंब

    कल्याण

    कार्यक्रम

    राज्य लोकसंख्या धोरणाअंतर्गत उद्दिष्टे

    साध्य करणेसाठी शहापूर तालुक्यात

    वाढत्या लोकसंख्येवरील नियंत्रणासाठी

    राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात

    येतो. या कार्यक्रमांतर्गत कुटुंब कल्याण

    नसबंदी शस्त्रक्रिया (स्त्री/पुरुष नसबंदी,

    टाका/बिनटाका शस्त्रक्रिया), तांबी,

    निरोध व गर्भनिरोधक गोळ्या वाटप या

    दर्शकांवर विशेष भर देणेत येतो.

    या योजनेचा लाभ घेण्यासाठी

    ईच्छूक असणारे लाभार्थी संपर्क

    वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक

    आरोग्य केंद्र —सर्व

    19 नियमीत

    लसीकरण

    कार्यक्रम

    नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गंत बाळ

    जन्मलेपासून लसीव्दारे टाळता येणा-या

    आजारांचे (उदा. क्षयरोग, डीपीटी,

    पोलिओ, टीटी, गोवर, इ.) मोफत

    लसीकरण केले जाते.

    0 ते 10 वर्षापर्यतचे बालके

    संपर्क वैद्यकीय अधिकारी,

    प्राथमिक आरोग्य केंद्र —सर्व

    20 जननी सुरक्षा

    योजना

    जिल्हयातील दारिद्रय रेषेखालील स्त्रियांना

    पहिल्या २ बाळंतपणासाठी सदर

    योजनेतून अनुदान दिले जाते. सदर स्त्रिला

    प्रसुतीनंतर दवाखान्यात प्रसती झाल्यास ७

    दिवसात रक्कम रु.७००/- व घरी प्रसुती

    झाल्यास रक्कम रु.५००/- अनुदान वितरीत

    करणेबाबत शासनाच्या मार्गदर्शन

    सूचनाप्रमाणे आरोग्य सहाय्यक (म) ना

    सूचित करण्यात आले आहे.

    गरोदरपणातील जोखमीमुळे सिजेरियन

    शस्त्रक्रिया झाल्यास लाभार्थींस रु.१५००/-

    एवढे सहाय्यक अनुदान ती स्त्री ज्या

    दवाखान्यात प्रसूत झाली असेल त्या

    बिलाच्या पूर्ततेसाठी अनुदान वितरीत

    करण्यात येते. वरील सर्व सेवा लाभार्थीना

    मिळणेसाठी प्रत्येक उफद्रांचे आरोग्य

    सेविकेकडे रु.१५००/- अग्रिम ठेवण्यात

    आले आहे. जननी सुरक्षा योजनेंसाठी

    लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान

    बाळंतपणाच्या वेळी किवा बाळंतपणानंतर

    जास्तीत जास्त ७ दिवसांच्या आत अदा

    करावे अशा सूचना आहेत.

    गरोदर माता

    संपर्क वैद्यकीय अधिकारी,

    प्राथमिक आरोग्य केंद्र —सर्व

    21 मानव विकास कार्यक्रम प्राथमिक आरोग्‍य केद्रांमध्‍ये प्रत्‍येक

    महिन्‍यात किमान २ शिबीरे आयोजित

    करण्‍यात येतात. शिबीरे

    आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित

    ग्रामपंचायतींच्‍या आरोग्‍य कर्मचारी

    यांचेमार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्‍यांना

    देण्‍यात येते. शिबीराच्‍या ठिकाणी

    4.मानव विकास कार्यक्रम

    स्‍त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञ

    यांचेकडून लाभार्थ्‍यांची वैदयकीय

    तपासणी व उपचार केले जातात, एक

    वेळचा अल्‍पोपहार लाभार्थ्‍यांना देण्‍यात

    येतो. गरोदर मातांचा व ६ महिन्‍यांपर्यंत

    स्‍तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो.

    तसेच जोखमीच्‍या मातांना उपचार व

    संदर्भीत केले जाते व पाठपुरावा करण्‍यात

    येतो.

    प्राथमिक आरोग्‍य केंद्राच्‍या ठिकाणी

    लाभार्थ्‍यांना ने-आण करण्‍याकरिता

    केंद्राच्‍या वाहनाचा वापर करता येतो. जेथे

    वाहन उपलब्‍ध नसेल त्‍या ठिकाणी

    वाहने भाडयाने घेणे, स्‍त्रीरोगतज्ञ व

    बालरोगतज्ञ यांना मानधन देणे,

    शिबिरामध्‍ये लाभार्थ्‍यांना एक वेळ

    अल्‍पोपहार देणे, औषधे व प्रयोगशाळा

    साहित्‍य आणि मंडप व्‍यवस्‍था याकरीता

    अनुदान देण्‍यात येते. अ.जा./अ.ज./

    दारिद्रय रेषेखालील गरोदर मातांना बुडित

    मजुरीपोटी रु. ८००/- गरोदरपणाच्‍या

    नवव्‍या महिन्‍यात देण्‍यात येते.

    गरोदर माता

    संपर्क वैद्यकीय अधिकारी,

    प्राथमिक आरोग्य केंद्र —सर्व

     

    केंद्र सरकार

    अ.क्र योजनेचे नाव योजनेचे स्वरुप योजनेचे निकष
    1 नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत कार्यक्रम

     

    नविन बायोगॅस संयंत्र बांधणे १) बायोगॅस संयंत्र लाभार्थ्यांकडे किमान 4 जनावरे असणे आवश्यक आहे. 2) लाभार्थी अनुसूचित जमातीचा असल्यास जातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.
    2 प्रधानमंञी

    मातृवंदना

    योजना

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी

    2017 रोजी ही योजना सुरू केली.

    प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना

    (PMMVY) अंतर्गत गरोदर महिला आणि

    स्तनदा मातांना 5000 रुपयांची आर्थिक

    मदत दिली जाते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना

    योजना (PMMVY) ही केंद्र सरकारची

    योजना आहे. जी महिला आणि बाल

    विकास मंत्रालय व समाज कल्याण

    विभागामार्फत राबवली जाते.

    पहिला हप्ता : अंगणवाडी केंद्रात किंवा

    आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी

    करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत

    दिली जाते. दुसरा हप्ता : गर्भधारणेच्या

    सहा महिन्यांनंतर, 2000 रुपयांचा दुसरा

    हप्ता दिला जातो. तिसरा हप्ता : 2000 चा

    तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी

    आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो.

    या योजनेसाठी लागणारी पात्रता

    अर्जदार भारताचा कायमचा

    रहिवासी असणे आवश्यक आहे. या

    योजनेचा लाभ लाभार्थ्याला

    एकदाच मिळू शकतो. गर्भपात /

    मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी

    त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र

    असेल. राज्य सरकार किंवा केंद्र

    सरकारमध्ये नियमितपणे काम

    करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र

    नसणार. प्रधानमंत्री मातृत्व वंदना

    योजना (PMMVY) अंतर्गत

    गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज

    करू शकतात. या योजनेत गरोदर

    व स्तनदा अंगणवाडी सेविका

    महिला अर्ज करू शकतात.

    लाभार्थीचे आधार कार्ड तुमच्या बँक

    खात्याशी लिंक केलेले असावे.

    लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा

    आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य

    असेल.

    संपर्क वैद्यकीय अधिकारी,

    प्राथमिक आरोग्य केंद्र —सर्व

    बजेट माहिती

    budget marathi pdf

    नागरिकांची सनद

     नागरीकांची सनद