आपले सरकार सेवा केंद्र.
- भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एक सुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ईपीआरआय/ईपंचायत हा मिशन मोड प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे.
- महाराष्ट्रातील सर्व पंचायत राज संस्थांचे जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत (संगणकीकरण करुन त्यांचा कारभार ऑनलाईन करण्याचा महत्वकांक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) ई-ग्राम सॉफ्ट हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
- प्रकल्प अंमलबजावणी करीता CSC-SPV या कंपनीची नेमणुक करणेत आलेली आहे.
- महाराष्ट्रात हा प्रकल्प आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्यात येत आहे.
आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची उद्दिष्टये
- सर्व पंचायत राज संस्थांचा कारभार ऑनलाईन करणे .
- सर्व पंचायत राज संस्थांचा कोष (Database) तयार करणे.
- ई- पंचायत सुटमधील ११ आज्ञावली मध्ये माहिती भरणे.
- ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत G2G व G2C सुविधा पोहचविणे.
- या प्रकल्पाच्या समन्वायाने नागरिकांना ग्रामीण भागात देण्यात येणा-या सर्व सुविधांचा दर्जा उंचविणे ..
ई–ग्राम सॉफ्ट:
ग्रामपंचायतीचा संपुर्ण कामकाज सुरळित व अखंडीत पणे चालु ठेवण्याकरिता ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरते.
या कार्यप्रणालीच्या वापरामुळे ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व्यवहार अचुक व वेळचेवेळी पुर्ण होतात.
ग्रामपंचायतीमधील सर्व प्रकारच्या नोंदी व इतर दैनंदिन कामकाज हे संगणकीकृत (Digitizes) होऊन त्यामध्ये व्यवस्थीतपणा जोपसला जातो. संगणकीकृत झालेली माहिती ही एकसंघाराहून ती शोधण्यास सोपी व अत्यल्प वेळेत उपलब्ध होते.
वेळोवेळी झालेले बदल व दुरुसत्या यांची नोंद व माहिती सविस्तर संकलीत असते. Online and offline Version is Available
आपले सरकार सेवा केंद्रातून देण्यात येणा–या प्रमाणपत्रे सुविधा सेवा दर (२०/-रुपये)
अ.क्र. | सेवा (Services) | अ.क्र. | सेवा (Services) |
१ | नमुना ८ असेसमेंट दाखला | ५ | विवाह दाखला |
२ | दारिद्या रेषेखालील दाखला | ६ | थक बाकी नसल्याचा दाखला |
३ | जन्म दाखला | ७ | निराधार योजना करिता वयाचा दाखला |
४ | मृत्यू दाखला |
लाभार्थी:
.
फायदे:
.
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे