सामान्य प्रशासन विभाग
परिचय
सामान्य प्रशासन विभागांतर्गत आस्थापना विषयक कामकाज, कर्मचारींच्या सेवा विषयक बाबी, अनुकंपा विषयक, जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे कामकाज, मा. अध्यक्ष जिल्हा परिषद ,ठाणे यांच्या अधिनस्त स्थायी समिती सभा, वार्षिक प्रशासन अहवाल, खातेप्रमुख व पंचायत समितीस्तरावरील सर्व कार्यालय प्रमुख यांच्या बैठका, कर्मचारी प्रशिक्षण, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खात्याकडुन प्राप्त होणा-या संचिकांवर अभिप्राय व योग्य त्या प्रशासकिय कार्यवाही बाबतचे विवेचन, जनतेकडुन प्राप्त होणा-या तक्रारींबाबत संबंधित विभागाकडे पठविणे
दृष्टी आणि ध्येय
सामान्य प्रशान विभागाच्या आस्थापना विभागामार्फत वर्ग-1, वर्ग-2,वर्ग-3 व वर्ग-4 च्या अधिकारी व कर्मचारी यांचे संपुर्ण आस्थापना विषयक कामकाज, सेवा विषयकबाबी, वेतन व भत्ते याबाबत अनुदान उपलब्ध करुन देणे, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, कर्मचा-यांच्या बदल्या, वाहनचालक व वाहनांबाबत प्रशासकिय व अग्रिम मंजुरी, अनुकंपा मधिल प्राप्त उमेदवारांची नियुक्ती तथा प्रकरणांवर अंतिम कार्यवाही करणे, जाहिरात देउन पदभरती करणे, वर्ग-1 ते वर्ग-4 अधिकारी व कर्मचारी यांची वैद्यकिय देयके मंजुरी इ. त्याचप्रमाणे ातेप्रमुखांकडुन प्राप्त होणा-या संचिकांवर अभिप्राय व योग्य ती प्रशासकिय कार्यवाही व मार्गदर्शनपर अभिप्राय देणे, इ.बाबत सनियंत्रण करण्यात येते तसेच कर्मचारींना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात येते.
प्रशासन विभाग मार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचा एकत्रित वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे त्यास संबंधित समितीची मंजुरी घेणे, जिल्हा परिषद सर्व साधारण सभेची मंजुरी घेउन मा.शासन ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना सादर करणे, कमंचारी यांच्याकडुन प्राप्त होणा-या अपिालांवर निर्णय घेणे, पंचायत राज समितीचे संपुर्ण कामकाज पहाणे, पंचायत राज समिती, स्थानिक निधी लेखा यांचे कडील परिच्छेदांचे अनुपालन करणे, जिल्हा परिषदेच्या वार्षिक दैनंदिणी तयार करणे इ.कामकाज करण्यात येते.
उद्दिष्टे कार्ये मजकूर
सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत जिल्हा स्तरावरील सर्व खातेप्रमुख व पंचायत समितीस्तरावरील सर्व कार्यालये यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या बैठकांचे आयोजन करणे, तसेच प्रशासकियबाबी सर्व कार्यालयांना अवगत करणे, मा.मंत्री महोदय,मा.सचिव,मा.विभागीय आयुक्त यांच्या बैठकांबाबतची माहिती संकलीत करणे, आचारसंहिता कालावधित काय कार्यवाही करावी याबाबत संपुर्ण माहिती उपलब्ध करुन देणे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियान, राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता अभियान, विभागस्तरारील बैठकांची माहिती संकलित करणे इ.बाबीचे सनियंत्रण करण्यात येते.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीचे कामकाज पाहणे व सदर सभांच्या इतिवृत्तावर योग्य ती कार्यवाही करणे, इतिवृत्त मंजुरी नंतर जनतेस पहण्यास उपलब्ध करुन देणे,जिल्हा परिषदेच्या समिती सभांच्या कामकाजाबाबत प्रशासकिय नियंत्रण ठेवणे, लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचे मा.जिल्हाधिकारी, ठाणे यांच्याकडुन संकलन करुन त्याबाबत खातेप्रमुखांनी केलेल्या कार्यवाहीस प्रसिद्धी देणे. जिल्हा परिषदेच्या विरुद्ध जनतेने अथवा अन्य प्राधिकरणांनी दाखल कलेल्या केसेस बाबत जिल्हा परिषदेच्या वतीने मा.न्यायालयात जिल्हा परिषदेची बाजु मांडणे कामी वकिलांची नियुक्ती बाबतचे कामकाज करण्यात येते.
प्रशासकीय सेटअप
पुरस्कार आणि प्रशंसा
1) आय.एस.ओ.
ठाणे जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील आय.एस.ओ. नामांकन मिळवणारी पहिली जिल्हा परिषद आहे.
2) यशवंत पंचायत राज अभियान
सन 2010-11 व सन 2011-12 या वर्षातील सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त. तसेच सन 2011-12 या वर्षात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती भिवंडीस राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तसेच सन 2022-23 या वर्षात उतकृष्ठ कामगिरी केल्याने पंचायत समिती शहापूर राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त.
3) पंचायत सबलिकरण व उत्तरदायित्व योजना (PEAIS)-
सन 2011-2012 या वर्षांत सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याने राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक प्राप्त.
सेवा
पंचायत समिती कल्याण, शहापुर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ.
कमिशन
विभागीय आयुक्त कोकण विभाग कोकण भवन, नवी मुंबई
विभागप्रमुख
श्री. अविनाश अंकुश फडतरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, साप्रवि जिल्हा परिषद ठाणे
अंदाजपत्रक २०२४-२५
भरती
1. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 आरोग्य सेवक पुरूष सवंर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी
2. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 आरोग्य सेवक महिला सवंर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी
3. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सवंर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी
4. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 कंत्राटी ग्रामसेवक पेसा,बिगर पेसा संवर्गाची अंतिमनिवडयादीवप्रतिक्षाधीनयादी
5. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन यादी
6.जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी
7. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 कनिष्ठ सहाय्यक संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी
8. जिल्हा परिषद ठाणे गट क सरळसेवा पदभरती 2023 आरोग्य पर्यवेक्षक संवर्गाची अंतिम निवड यादी व प्रतिक्षाधीन उमेदवार यादी
9. जिल्हा परिषद ठाणे गट-क सरळसेवा भरती जाहिरात 2023
आस्थापना विषयक बाबींचा लाभ देण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
परिविक्षाधिन कालावधीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
1. प्रपत्र अ,ब,क,ड
2. कार्यालय प्रमख शिफारस
3.नियुक्ती आदेशाची प्रत
4.सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
5.वैद्यकिय दाखला
6.चारित्र पडताळणी बाबत दाखला
7.जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र
8.संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
9.मराठी व हिंदी भाषा सुट आदेश
10.हमीपत्र
11.मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र
12.मूळ सेवा पुस्तकातील हजर नोंद घेतलेल्या पानाची झेरॉक्स प्रत
13.मत्ता व दायित्व याबाबतचे प्रमाणपत्र
14.विनावेतन रजेबाबतचा दाखला
15.नियुक्ती आदेशातील सर्व अटींची पुर्तता केल्याचा कार्यालय प्रमुखांचा दाखला
स्थायित्व प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :
1.मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र
2.मराठी व हिंदी भाषा सुट आदेश
3.जात वैधता प्रमाणपत्र
4.चारित्र पडताळणी बाबत दाखला
5.उपस्थिती प्रमाणपत्र
6.संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
7.सेवा प्रवेशोत्तर परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
8.परिविक्षाधीन कालावधी उठविल्याबाबतचा आदेश सत्यप्रत
9.वैद्यकिय प्रमाणपत्र
10.सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानाची सत्यप्रत
11.खाते कारवाई सुरु/प्रस्तावित नसलेबाबतचा दाखला
12.कामकाजाबाबतचे प्रमाणपत्र
13मूळ नेमणूक आदेशाची सत्यप्रत
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आवश्यक कागदपत्रे :-
१.मूळ नेमणूक आदेश
२.पदोन्नती/कालबध्द पदोन्नती मिळाली असल्यास त्याबाबतचा आदेश
३.जात वैधता प्रमाणपत्र
४.मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र
५.संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
६.सेवा प्रवेशोत्तर परिक्षा उत्तीर्ण /सूट आदेश
७.खाते कारवाई सुरु/प्रस्तावित नसलेबाबतचा दाखला
८.सन 20— – 20— मत्ता व दायित्व प्रमाणपत्र सादर केलेबाबतचे प्रमाणपत्र
९.मराठी व हिंदी भाषा सुट आदेश
१०.स्थायित्व प्रमाणपत्र
११.यापूर्वी नियमित पदोन्नती नाकारली नसल्याबाबतचा दखला.
पदोन्नतीसाठी आवश्यक कागदपत्रे :-
मूळ नेमणूक आदेश
सेवा पुस्तकाचे पहिले पानाची प्रत
मूळ पदावर, पदोन्नतीचे पदावर हजर झालेबाबतची सेवा पुस्तकातील नोंदीची प्रत
कार्यकारी पदोन्नती आदेश
जात वैधता प्रमाणपत्र
मराठी व इंग्रजी टंकलेखन प्रमाणपत्र
संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र/सूट आदेश
सेवा प्रवेश परिक्षा उत्तीर्ण/सूट आदेश
मराठी व हिंदी भाषा सुट आदेश
स्थायित्व पमाणपत्र
यापूर्वी नियमित पदोन्नती नाकारली नसल्याबाबतचा दाखला (संबंधित कर्मचारी व कार्यालय प्रमुख दोघांची स्वाक्षरी असलेला)
खाते कारवाई सुरु अथवा प्रस्तावित नसलेबाबतचा दाखला
मत्ता व दायित्व विविरणपत्रे (माहे मार्च ——) सादर केलेले प्रमाणपत्र