महिला व बाल विकास विभाग
परिचय – महिला व बाल विकास विभाग
व्हिजन आणि मिशन
महिला व बाल विकास विभाग हा ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण १४ विभांगांपैकी एक विभाग आहे जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) हे या विभागाचे विभाग प्रमुख असतात. विभागमार्फत विविध राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजना राबविल्या जातात.
उद्दिष्टे कार्ये मजकूर–
- शासकीय योजनांची अंमलबजावणी – राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत व जिल्हा स्वनिधीतून महिला व बाल कल्याण विषयक विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे.
- जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांचे नियंत्रण सनियंत्रण करणे .
- जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सभेचे कामकाज पाहणे,
- विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची आस्थापना विषयक कामकाज पाहणे
प्रशासकिय सेट अप-
जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास),बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
सेवा
अंगणवाडी सेवा | |||
अ.क्र | सेवा | लाभार्थी प्रकार | सेवा कोणामार्फत दिल्या जातात |
1 | पुरक पोषण आहार (Supplementary Nutrition) | 6 वर्षाखालील मुले | अंगणवाडी सेविका/मदतनीस |
2 | लसीकरण (Immunization) | 6 वर्षाखालील मुले, गर्भवती व स्तनदा माता | एएनएम/एम ओ |
3 | आरोग्य तपासणी (Health Check-up) | 6 वर्षाखालील मुले, गर्भवती व स्तनदा माता | एएनएम/एम ओ / अंगणवाडी सेविका |
4 | संदर्भ सेवा (Referral Services ) | 6 वर्षाखालील मुले, गर्भवती व स्तनदा माता | एएनएम/एम ओ / अंगणवाडी सेविका |
5 | पुर्व शालेय शिक्षण (Pre-School Education ) | 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालके (मुले व मुली) | अंगणवाडी सेविका |
6 | आरोग्य व पोषण शिक्षण (Nutrition & Health Education) | महिला (15-45 वयोगटातील) | एएनएम/एम ओ / अंगणवाडी सेविका |
योजना/उपक्रम
राज्य सरकार –
अ) भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना :–
- अनुसूचित क्षेत्रातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना आठवडयातील 6 दिवस एक वेळ चौरस आहार देण्यात येतो. (दर प्रति लाभार्थी 35 रूपये)
- 7 महिने 6 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना आठवडयातून 4 दिवस अंडी /केळी देण्यात येतात. (दर प्रति
लाभार्थी 6 रूपये)
-
- ठाणे जिल्हयात सदर योजनेचा लाभ नोंदणी केलेल्या 100% लाभार्थ्याना दिला जातो आहे.
- जिल्हात जवळपास 50 हजार लाभार्थ्यांना सदरचा लाभ दिला जात आहे.
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद ठाणे योजना सन 2024-25
अ.क्र. | बाब | तपशिल |
1 | योजनेचेनाव | इयत्ता 7 वी ते इयत्ता 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण |
2 | योजनेचे स्वरूप | 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2025 पर्यत कालावधीमध्ये संगणक प्रशिक्षण (MSCIT) उत्तीर्ण झालेल्या मुलींना संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार संगणक प्रशिक्षणाचे शुल्क 10 टक्केलाभार्थी हिस्सा वजा करुन किंवा यथावकाश शासनाने बदल केलेली रक्कम / खरेदी समिती सभामध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंकखात्यात तालुका स्तरावरुन वितरित करण्यात येईल. |
3 | योजनेचे उद्दिष्ट | आदिवासी व ग्रामीण भागातील 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण देवुन ज्ञान व कौशल्य प्राप्त करून घेण्यास सहाय काध्से त्यांचेमध्ये आविश्वास निर्माण करून मुलींना संगणक साक्षर करण्यासाठी हातभार लावणे. |
4 | योजनेचे लाभार्थी | इयत्ता 7 वी ते 12वी पास मुलीं |
5 | लाभाचेस्वरूप | (MSCIT) उत्तीर्ण झालेल्या मुलींना संगणक प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर नियमानुसार संगणक प्रशिक्षणाचे शुल्क 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन किंवा यथावकाश शासनाने बदल केलेली रक्कम / खरेदी समिती सभामध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचेबॅंकखात्यात देणे. |
6 | पात्रतेचे निकष | 7 वी ते 12वी पास मुलीं दि. 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 2025 पर्यत कालावधी मध्ये संगणक प्रशिक्षण (MSCIT) उत्तीर्ण |
7 | आवश्यककागदपत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, संगणक प्रशिक्षण (MSCIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधारकार्ड, बॅक खातेपुस्तिकेची स्वप्रमाणी / सत्यप्रत, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र / शाळा कॉलेज बोनाफाईड,लाभार्थ्यांची प्रत्यक्ष फी भरल्याची पावती दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, |
8 | कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे स्केर फिट होम्स प्लॉट नं. 106/107 1 ला माळा एस जी बर्वे रोड, जीएसटी भवन समोर वागळे इस्टेट, एमआयडीसी 22 नंबर सर्कल, ठाणे प, पिन कोड – 400 604 |
9 | योजने च्या अटी व शर्ती | इयत्ता 7 वीते 12वी पास मुलीं 1 जानेवारी 2023 ते 31 मार्च 25 पर्यत कालावधीमध्ये संगणक प्रशिक्षण (MSCIT) उत्तीर्ण |
10 | अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविका मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बाल कल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे |
अ.क्र. | बाब | तपशिल |
1 | योजनेचे नाव | विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलां – मुलींचा सत्कार करणे. |
2 | योजनेचे स्वरूप | राज्य स्तरावर क्रिडा, कला, शिक्षण सन 2024-25 या आर्थिक वर्षात विशेष प्राविण्य मिळालेल्या मुला – मुलींचा सत्कार करणे योजनेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलींना आर्थिक मदत करणेत येईल. |
3 | योजनेचे उद्दिष्ट | राज्यस्तरावर क्रिडा, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुला – मुलींचा सत्कार करणे व विशेष प्राविण्य मिळालेल्या मुलां – मुलींना आर्थिक मदत क रणे. व त्यांना इ. 10 वी व 12 वी नंतरच्या उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक मदत करणे. |
4 | योजनेचे लाभार्थी | ज्या मुला – मुलींनी क्रीडा कला शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर राष्ट़ीय व आंतराष्टीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे अशाच मुला मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. |
5 | लाभाचे स्वरूप | विशेष प्राविण्य मिळालेल्या मलां – मुलींना रक्कम रु. 20000/- लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. |
6 | पात्रते चे निकष | राज्यस्तरावर राष्ट़ीय व आंतराष्टीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे अशाच मुला मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. |
7 | आवश्यक कागद पत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, कला क्रिडा स्पर्धामध्ये राष्टीय / आंतरराष्ट़ीय / राज्यस्तरावर प्राविण्य मिळविलेल्या प्रमाणपत्राची स्वप्रमाणित प्रत / सत्यप्रत, आधारकार्ड, दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, बॅक खाते पासबुकाची प्रत, स्पर्धा प्रायोजक / क्रिडासंघटना शासन मान्य असल्याबाबत संबंधितांचे प्रमाणपत्राची सत्यप्रत. |
8 | कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे स्केर फिट होम्स प्लॉट नं. 106/107 1 ला माळा एस जी बर्वे रोड, जीएसटी भवन समोर वागळे इस्टेट, एमआयडीसी 22 नंबर सर्कल, ठाणे प, पिन कोड – 400 604 |
9 | योजने च्या अटी व शर्ती | ज्या मुला – मुलींनी क्रीडा कला शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरावर राष्ट़ीय व आंतराष्टीय पातळीवर प्राविण्य मिळविलेले आहे अशाच मुला मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. |
10 | अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविका मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बाल कल्याण समिती मान्यते साठी सादर करणे |
अ.क्र. | बाब | तपशिल |
1 | योजनेचे नाव | शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल पुरविणे. |
2 | योजनेचेस्वरूप | ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींना त्यांचे राहत्या गावापासुन शाळेत ये – जा करण्यासाठी सायकल सुविधा उपलब्ध करून देणे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना दोन चाकी सायकल योजनेचा लाभ दिला जाईल. |
3 | योजनेचे उद्दिष्ट | ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींना त्यांचे राहत्या गावापासुन शाळेत ये – जा करण्यासाठी सायकल सुविधा उपलब्ध करून देणे व ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे |
4 | योजनेचे लाभार्थी | इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वीमध्ये शिकणा-या मुली. |
5 | लाभाचे स्वरूप | शाळेत जाणा-या मुलींना दोन चाकी सायकल घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभा मध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंकखात्यात देणे. |
6 | पात्रते चे निकष | 1. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थींनींच्या त्यांचे राहत्या घरापासुन ते शाळेपर्यत चे अंतर कमीत कमी 2 कि.मी.असणा-या मुलींना प्राधान्याने लाभ देण्यात येईल.
2. क्र.1 प्रमाणे लाभार्थी संपल्यानंतर 1 कि.मी. पेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थीनींना लाभ देण्यात येईल. 3. लाभ देताना अपंग व दारिद्र रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थिनीचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. |
7 | आवश्यक कागद पत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, आधारकार्ड, बॅक खाते पासबुकाची प्रत, दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, वयाचा दाखला जन्मदाखला सत्यप्रत / शाळा कॉलेज बोनाफाईड प्रमाणपत्र. |
8 | कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे स्केर फिट होम्स प्लॉट नं. 106/107 1 ला माळा एस जी बर्वे रोड, जीएसटी भवन समोर वागळे इस्टेट, एमआयडीसी 22 नंबर सर्कल, ठाणे प, पिन कोड – 400 604 |
9 | योजने च्या अटी व शर्ती | 1.इ.5वीते 12 वी मध्ये शिकणा-यामुलींना लाभ 2. घरापासुन ते शाळेपर्यत चे अंतर कमीत कमी 2 कि.मी |
10 | अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविकामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेमार्फत जिल्हास्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बाल कल्याण समिती मान्यतेसाठी सादर करणे |
अ.क्र. | बाब | तपशिल |
1 | योजनेचे नाव | महिलांना साहित्य पुरविणे. |
2 | योजनेचे स्वरूप | महिलांना साहित्य पुरविणे अंतर्गत पिठाची गिरणी, शिलाई
मशीन, पिको फॉल मशीन, इत्यादी साहित्य पुरविणे . |
3 | योजनेचेउद्दिष्ट | ग्रामीण भागातील दारिद्र रेषेखालील महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिन , पिठाची गिरणी, “घरघंटी” पिको फॉल मशिन इ. व तत्सम प्रकारचे साहित्य उपलब्ध करून देणे. |
4 | योजनेचे लाभार्थी | महिला लाभार्थी निवड करताना विधवा, अपंग , निराधार, परितक्त्या दारिद्र रेषेखालील महिलांना प्राधान्य |
5 | लाभाचे स्वरूप | पिठाची गिरणी, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, इ. साहित्य घेणेसाठी 10 टक्के लाभार्थी हिस्सा वजा करुन खरेदी समिती सभामध्ये मंजुर रक्कम संबधित लाभार्थीचे बॅंकखात्यात देणे |
6 | पात्रतेचे निकष | अपंग, विधवा, दारिद्र रेषेखालील लाभार्थी न सापडल्यास र. रू. 120000/- पर्यत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य |
7 | आवश्यक कागदपत्रे | परिपुर्ण भरर्लेला अर्ज, लाईट बिल, आधारकार्ड, बॅक खाते पासबुकाची प्रत.स्थानिक रहिवाशी असल्याचा पुरावा (उदा.रेशन कार्ड), दारिद्रय रेषेचा नंबर व दाखला किंवा तहसिलदारचा उत्पनाचा दाखला, अर्जदार महिला विवाहित नावात बदल असल्यास विवाह नोंदणी दाखला / गॅझेटची सत्यप्रत इ. |
8 | कार्यान्वित यंत्रणा व संपूर्ण पत्ता | महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे स्केर फिट होम्स प्लॉट नं. 106/107 1 ला माळा एस जी बर्वे रोड, जीएसटी भवन समोर वागळे इस्टेट, एमआयडीसी 22 नंबर सर्कल, ठाणे प, पिन कोड – 400 604 |
9 | योजने च्या अटी व शर्ती | अपंग, विधवा, दारिद्र रेषेखालील लाभार्थी न सापडल्यास र. रू. 120000/- पर्यत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य |
10 | अर्ज करण्याची पद्धती | अंगणवाडी सेविका मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे परिपूर्ण भरलेला अर्ज सादर करणे, बालविकास प्रकल्पा अधिकारी यांचे मार्फत जिल्हा स्तरावर एकत्रित सर्व अर्ज महिला व बाल कल्याण समिती मान्यते साठी सादर करणे |
केंद्र सरकार
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
अंगणवाडी केंद्र नियंत्रण व सनियंत्रण करणे.
पुरस्कार
पुरस्काराचे शिर्षक – आदर्श पर्यवेक्षिका/अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस/आशा सेविका पुरस्कार
पुरस्काराचे वर्ष -2024-25
पुरस्काराचे नाव – आदर्श पर्यवेक्षिका/अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस/आशा सेविका पुरस्कार
पुरस्काराची तारीख – 8 मार्च 2025
विभागप्रमुख
नाव – श्री. संजय छबीलाल बागुल
पदनाम- जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास
ईमेल पत्ता–cwdzp169.thane@gmail.com
पत्ता – स्क्वेअर फिट होम्स, 2 रा मजला प्लॉट नं.106/107 एस.जी.बर्वे रोड, जी.एस.टी भवन समोर,
वागळे इस्टेट ,22 नं. सर्कल, ठाणे (पश्चिम)-400 604
वार्षिका प्रशासन अहवाल 2023 2024 म.बा.क