आरोग्य विभाग
विभागाबद्दल माहिती
आरोग्य विभाग हा जिल्हा परिषदे मध्ये असणाऱ्या एकूण 14 विभागां पैकी एक महत्वाचा विभाग आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी हेया विभागाचे प्रमुख असतात. ठाणे जिल्हा परिषद अंतर्गत एकुण 33 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 209 उपकेंद्रे, 4 वैद्यकीय भरारी पथके, 5 प्राथमिक आरोग्य पथके, 2 जि.प.दवाखाने, 1 आयुर्वेदिक दवाखाना आरोग्य सेवा देत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र :-
प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा व तातडीच्यावैद्यकीयसेवांचीउपलब्धता, बाहयरुग्ण कक्ष, 6 खाटांचे आंतररुग्ण कक्ष, शस्त्रक्रिया सेवा, (कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया) प्रयोगशाळा सेवा, विविध राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सेवा देणे व उपकेंद्राकडून संदर्भित केलेल्या रुग्णांवर उपचार या आरोग्य सेवा दिल्या जातात. बिगर आदिवासी क्षेत्रासाठी प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये 13 व आदिवासी क्षेत्रासाठीप्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 14 अधिकारी/कर्मचारी कार्यरत असतात. यामधील स्वच्छता व वाहन सेवा कंत्राटी पध्दतीने देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. सर्व राज्यांमध्ये प्रा. आ. केंद्राची रचना ही समान आहे. ही सर्व प्रा.आ.केंद्र जिल्हा परिषदेच्या नियंञणाखाली येतात.
उपकेंद्र :-
उपकेंद्रामार्फत प्रथमोपचार, प्रसुतीपूर्व मातांची तपासणी व किरकोळ आजारावर औषधोपचार, कुटुंब कल्याण, माता बाल संगोपन विषयक सल्ला व सेवा या बरोबरच क्षयरोग, कुष्ठरोग व हिवतापाच्या रुग्णांना उपचार व संदर्भ सेवा, आरोग्य शिक्षण इत्यादी सेवा पुरविण्यात येतात. प्रत्येक उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक(पुरुष) व (स्त्री) तसेच एक अंशकालीन स्त्री परिचर अशा 3 पदांस शासनाने मान्यता दिली आहे.
प्राथमिक आरोग्य पथक :-
ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासुन वंचित व अर्धवंचित ग्रामस्थांना त्यांच्या गावांमध्ये आरोग्य सेवेची सुविधा पुरविणे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत निदानात्मक उपचार पुरविण्याची तरतुद आहे. अत्यावश्यक प्राथमिक आरोग्य सेवांसह निदानात्मक सुविधा पुरविणे. बालमृत्यु, मातामृत्यु दरात घट करुन आर्युमान वृध्दी करणे हाही या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आर्युवेदिक दवाखाने :-
ठाणे जिल्हयामध्ये आयुष विभागाअंतर्गत 1 आयुर्वेदिक दवाखाना कार्यरत असन सदर दवाखान्यांमार्फत ग्रामीण भागामध्ये आयुर्वेंदिक उपचार केले जातात. आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता व परिचर कार्यरत असतात.
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हयात खालील आरोग्य संस्था कार्यरत आहेत.
शासनाचे निकषानुसार साधारणत: बिगर आदिवासी भागात 30 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत प्रत्येक 5 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आदिवासी भागाकरिता 20 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य व 3 हजार लोकसंख्येस एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. ठाणे जिल्हयात शहापूर हा तालुका संपुर्ण आदिवासी आहे. भिवंडी व मुरबाड हे अंशत: आदिवासी तालुके आहेत. व कल्याण व अंबरनाथ हे शहरी तालुके आहेत.
परिचय
| विभाग प्रमुखाचे नाव | डॉ. गंगाधर परगे |
| पदनाम | जिल्हा आरोग्य अधिकारी |
| दुरध्वनीक्रमांक | 022-20812885 |
| ईमेलआयडी– | thanedhozp[at]gmail[dot]com |
व्हिजन आणि मिशन –
- ग्रामीणभागातीलप्रत्येक व्यक्तींला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरुन वैद्यकीय सेवा पुरविणे व आरोग्य विषयक योजनाचा लाभ मिळवुन देणे.
- सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये भौतिक सुविधांच्या दर्जा उंचावणे, प्रशिक्षणाद्वारे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांचे तांत्रिक ज्ञान व रुग्णसेवेप्रतिनिष्ठ उंचावणे, नियमावलीनुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे तत्काळ संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे पर्यावरण पूरक नैसर्गिक ऊर्जास्त्रोताचा वापर करणे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुपांतरण करणे.
उद्दीष्टे कार्येमजकूर –
- प्रा.आ. केंद्रांनी आरोग्य संवर्धनाचे काम करावे तसेच आरोग्य सेवेचा विस्तार ग्रामीण भागात व्हावा ही प्रा.आ. केंद्राकडुन अपेक्षा आहे.
- आरोग्य शिक्षण हा या कार्यक्रमाचा आवश्यक (मुलभूत) भाग आहे. आरोग्य संवर्धनाचे काम करित असताना लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती निर्माण करणे, व त्यांचे पूर्ण सहकार्य मिळविणे आणि त्यांचा सहभाग प्राप्त करणे.
- मातामृत्यु प्रमाण कमी करणे, 2. अर्भक मृत्यु प्रमाण कमी करणे, 3. आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारणे, 4. असंसर्गजन्य आजाराचे प्रमाणे व त्यामुळे होणाऱ्या गुतागुती रोखणे हे आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचे प्रमुख उद्दीष्ठ आहे.
प्रशासकीय सेटअप –
या सर्व आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी खालीलप्रमाणे अधिकारी व कर्मचारी पदे मंजूर आहेत.
- जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 01
- अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 01
- सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी (वर्ग 1) 01
- जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी (वर्ग 1) 01
- प्रशासकिय अधिकारी (वर्ग 2) 01
- सांख्यिकी अधिकारी (वर्ग 2) 01
- जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी (वर्ग 2) 01
- सांख्यिकी पर्यवेक्षक 01
- सांख्यिकी अन्वेषक 01
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 01
- प्रोजेक्टनिस्ट 01
- आर्टिस्ट कम फोटोग्राफर 01
- सार्वजनिक आरोग्य परिचारीका 02
- शितपेटी तंत्रज्ञ 01
- तालुका आरोग्य अधिकारी 05
- वैद्यकिय अधिकारी (गट अ) 57
- वैद्यकिय अधिकारी (गट ब) 25
- आरोग्य पर्यवेक्षक (पुरूष)सरळसेवा 05
- आरोग्य पर्यवेक्षक पदोन्नती 16
- आरोग्य सहाय्यक (पुरूष) पदोन्नती 50
- आरोग्य सहाय्यक (स्त्री) पदोन्नती 38
- आरोग्य सेवक (पुरूष) सरळसेवा 122
- आरोग्य सेवक (पुरूष) पदोन्नती 12
- आरोग्य सेवक (स्त्री) सरळसेवा 346
- औषध निर्माण अधिकारीसरळसेवा 41
- प्रयोगशाळा तंत्रज्ञसरळसेवा 18
पुरस्कारआणि प्रशंसा –
- पुरस्काराचे शीर्षक*- कायाकल्प पुरस्कार ( NQAS Award )
- पुरस्काराचे वर्ष*- 2024-25
- पुरस्काराचे नाव*- प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा व वर्जेश्वरी यांना केंद्रस्तरीय
(National Level ) कायाकल्प पुरस्कार प्राप्त झाला.
- पुरस्काराची तारीख- 2024-25
ORGANISATION-
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय ठाणे
डॉ. गंगाधर परगे
अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा माताबाल संगपन अधिकारी प्रशासकिय अधिकारी
डॉ. दिनेश सुतार डॉ. स्वाती पाटील डॉ. स्वाती पाटील
जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी अंबरनाथ
डॉ. संतोषी शिंदे डॉ. अर्चना मोहिते
जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी भिवंडी
डॉ. दिनेश सुतार डॉ. नलिनी ठोंबरे
जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी शहापूर
डॉ. मनीष रेगे डॉ. भाग्यश्री सोनपिंपल
जिल्हा आयुष अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी कल्याण
डॉ. बालाजी गावडे डॉ. आशा मुंजाळ
जिल्हा प्रशिक्षण पथक तालुका आरोग्य अधिकारी मुरबाड
डॉ. अंजली चौधरी डॉ. श्रीधर बनसोडे
संलग्नकार्यालये –
- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा मुख्यालय ठाणे
- जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय
- जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय
- जिल्हा कुष्ठरोग अधिकारी कार्यालय
- जिल्हा प्रशिक्षण पथक
- तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती स्तर
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- उपकेंद्र
- प्राथमिक आरोग्य पथक
- जिल्हा परिषद दवाखाना
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती स्तर
संचालनालय/आयुक्तालय –
- आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य कार्यालय मुंबई
- संचालक, आरोग्य सेवा, रा.कु.क.मा.बा.सं.व शा.आ, राज्य कार्यालय मुंबई व पुणे
मंडळे/उपक्रम –
- उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, मंडळ कार्यालय ठाणे
कोण कोण आहे (संपर्कतपशील)
| 1 | नाव | डॉ. गंगाधर परगे |
| पदनाम | जिल्हा आरोग्य अधिकारी | |
| ई-मेल पत्ता | thanedhozp[at]gmail[dot]com | |
| पत्ता | वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.मुख्यालय ठाणे | |
| फोन क्रमांक | 022-20812885 | |
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL | ||
| 2 | नाव | डॉ. दिनेश सुतार |
| पदनाम | अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी | |
| ई-मेल पत्ता | thanedhozp[at]gmail[dot]com | |
| पत्ता | वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.मुख्यालय ठाणे | |
| फोन क्रमांक | ||
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL | ||
| 3 | नाव | डॉ. स्वाती पाटील |
| पदनाम | जिल्हा माताबाल संगपन अधिकारी | |
| ई-मेल पत्ता | thanedhozp[at]gmail[dot]com | |
| पत्ता | वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.मुख्यालय ठाणे | |
| फोन क्रमांक | ||
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL | ||
| 4 | नाव | डॉ. स्वाती पाटील |
| पदनाम | प्रशासकिय अधिकारी | |
| ई-मेल पत्ता | thanedhozp[at]gmail[dot]com | |
| पत्ता | वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.मुख्यालय ठाणे | |
| फोन क्रमांक | ||
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL | ||
| 5 | नाव | डॉ. बालाजी गावडे |
| पदनाम | जिल्हा आयुष अधिकारी | |
| ई-मेल पत्ता | thanedhozp[at]gmail[dot]com | |
| पत्ता | वागळे इस्टेट, सर्कल क्रमांक-22, ठाणे (प) जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जि.प.मुख्यालय ठाणे | |
| फोन क्रमांक | ||
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL |
निर्देशिका –
| 1 | नाव | श्रीमती. कादंबरी बळकवडे. |
| पदनाम | आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, रा.आ.अ | |
| ई-मेल पत्ता | mdnrhm०९[at]gmail[dot]com | |
| पत्ता | मुंबई | |
| फोन क्रमांक | ०२२-२२७१७५१८ | |
| फॅक्स क्रमांक | ||
| क्रियाकलाप | ||
| प्रोफाइल URL |
सेवा –
- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण कार्यक्रम
- सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय आयोडिन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम
- राष्ट्रीय कर्करोग मधुमेह व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम
- साथरोग नियंत्रण कार्यक्रम
- कॉलरा नियंत्रण कार्यक्रम
- एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प
- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
- प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम
- माता व शिशुरेखापथन (ट्रॅकिंग) कार्यक्रम
- जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
- जननी सुरक्षा योजना
- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
- नियमीत लसिकरण कार्यक्रम
- बालकांमध्ये अचानक उद्भवलेला लुळेपणा बाल पक्षाघात
- पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रजनन व लैंगिक आरोग्य योजना
- गर्भधारणा पुर्व व प्रसवपुर्व निदान तंत्र लिंग निवडीस प्रतिबंद कायदा 1994
- वैद्यकिय गर्भपात कायदा
- राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम
- नागरी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम
- सहायक अनुदान योजना
- राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
- नवसंजीवनी योजना
- मानव विकास कार्यक्रम
- राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम
- राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम
फॉर्म –
आरोग्य विषयक विविध सेवा, कार्यक्रम व योजनाचे फॉर्म जिल्हयातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत उपलब्ध करुन दिले जातात.
योजना/ उपक्रम
केंद्र सरकार
| 1.योजनेचे नाव
जननी सुरक्षा योजना (Janani Suraksha Yojana) कालावधीप्रारंभ दि. 12 एप्रिल 2005 कालावधीसमाप्त- क्षेत्र जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्र लाभार्थी 1. दारीद्रय रेषेखालील लाभार्थी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातीलगरोदर माता तिचे वय कितीही असले तरीही लाभ देय राहिल. 2. पात्र महिलेस कितीही अपत्य असेल तरीही तिला JSY माता समजुन शासकिय आरोग्य संस्थेत अथवा मानांकित आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास त्या मातेसपुर्वीप्रमाणेच लाभ देणे. फायदे 1. घरी प्रसुती झाल्यास लाभार्थीस रक्कम रु.500/- 2. ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यास रक्कम रु 700/- 3. शहरी क्षेत्रातील लाभार्थ्यांस रक्कम रु.600/- 4. सिझोरीयन शस्त्रक्रियेकरीता तज्ञास रक्कम रु.1500/- अर्जकसाकरावा जिल्हयातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत अर्ज भरण्यात येतो. |
|
| 2.योजनेचेनाव
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना कालावधीप्रारंभ जानेवारी 2017 कालावधीसमाप्त- क्षेत्र जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्र लाभार्थी Ø पहिल्या खेपेच्या सर्व गरोदर व स्तनदा माता Ø दुसऱ्या खेपेस मुलगी अपत्य असलेल्या सर्व स्तनदा माता फायदे · पहिल्या अपत्याकरीता दोन टप्प्यात रक्कम रु.5000/-; · पहिला टप्पा रु.3000/- : मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडुन मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुती पुर्व तपासणी करुन घेणे आवश्यक आहे · दुसरा टप्पा रु.2000/-:जन्मनोंदणी प्रमाणपत्र व बालकासबीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिकलसीकरणचक्रपुर्ण) करणेआवश्यकआहे. · दुसरी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात रक्कम रु.6000/- · दुसरीअपत्यमुलगीअसल्यासतिच्याजन्मानंतरप्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावरच नोंदणी करता येते. · दुसऱ्यागरोदरपणातएकापेक्षाजास्त (जुळे/तिळे/चार) अपत्यझालीअसतीलवत्यामध्येएककिंवाअधिकमुलीअसतील, तरत्यास्तनदामातेलायोजनेच्यानियमांनुसारदुसऱ्यामुलीसाठीचालाभमिळेल. अर्जकसाकरावा · जिल्हयातील आरोग्य संस्थेतील आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत ऑललाईन अर्ज भरण्यात येतो. · नोंदणीकरीता सरकारच्या वेबसाईटवरुन https://pmmvy.wcd.gov.in/ या पोर्टलमधिल Citizen Login द्वारे किंवा Android मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे. |
राज्य सरकार
मानव विकास कार्यक्रम
कालावधीप्रारंभ
दि. 29 जुन 2006
कालावधीसमाप्त-
क्षेत्र
जिल्ह्यातील शहापुर व मुरबाड तालुका
लाभार्थी
अनु.जाती, अनु.जमाती व दारिद्र रेषेखालील गरोदर व स्तनदामाता
फायदे
- प्रसुती पुर्व रक्कम रु.2000/-
- प्रसुती पश्चात रक्कम रु.2000/-
अर्ज कसा करावा
जिल्हयातील शहापुर व मुरबाड तालुक्यामधिल आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गट प्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत अर्ज भरण्यात येतो.
धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे
बजेट माहिती
बजेट माहिती –
| 8 सार्वजनिक आरोग्य जि.प.योजना सन 2024-25 सुधारीत व 2025-26 मुळ अर्थसंकल्प | ||||
| अ. नं. | लेखाशिर्ष | योजनेचे नांव | सन 2024-25 जि.प. सुधारित अंदाजपत्रकीय तरतुद | सन 2025-26 जि.प.मुळ अंदाजपत्रकीय तरतुद |
| 1 | 2210-0101 | लिनन व गाद्या व फर्निचर साहित्य खरेदी करणे | 1000000 | 1000 |
| 2 | 2210-0102 | द्रवरुप क्लोरीनचा पुरवठा करणे | 300000 | 300000 |
| 3 | 2210-0104 | मुख्यालयातील जि.प.दवाखान्यासाठी औषध व सामुग्री पुरवठा तसेच औषध भांडार देखभाल दुरुस्ती प्रसाधन सामग्री व हमाली खर्च इत्यादी. | 200000 | 200000 |
| 4 | 2210-0105 | साथीचे आजार/सर्पदंश/विंदुदंश/श्वानदंश लस व औषध साहित्य खरेदी | 7500000 | 11500000 |
| 5 | 2210-0106 | आरोग्य विषयक कार्यक्रमाबाबत प्रसिध्दी/छपाई साहित्य व सामुग्री पुरवठा संगणक खरेदी इत्यादी ( केसपेपर,रजिष्टर व अन्य साहित्य इत्यादी) | 2500000 | 2500000 |
| 6 | 2210-0107 | यात्रा/ आपत्कालिन घटनेत सोयी सुविधा पुरविणे | 500000 | 500000 |
| 7 | 2210-0108 | सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे | 11000000 | 25000000 |
| 8 | 2210-0109 | गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी | 3000000 | 2500000 |
| 9 | 2210-0110 | गरोदर मातांची प्रयोगशाळा चाचणी तपासणी | 1500000 | 1500000 |
| 10 | 2210-0112 | कर्करोग, हृदयरोग किडणी अशा दुर्धर आजारी रुग्णांना अर्थिक मदत करणे. | 500000 | 500000 |
| 11 | 2210-0113 | आरोग्य संस्थांना आयुर्वेदिक औषधांचा पुरवठा करणे. | 1300000 | 0 |
| 12 | 2210-0116 | आरोग्य विभागाच्या आत्यवश्यक निकडीच्या बांबाची खर्च | 6000000 | 6000000 |
| 13 | 2210-0117 | शव वाहिनी/बहुउददेशीय वाहन ( लस वाहिका/ आप्तकालीन वाहन) अनुषंगिक खर्च ( वाहन चालक सेवा घेणे, दुरुस्ती व देखभाल तसेच किरकोळ खर्च | 500000 | 0 |
| 14 | 2210-0118 | नाविन्य पुर्ण योजना-प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नविन ऑनग्रीड सोलर प्रणाली बसविणे /देखभाल दुरुस्ती | 500000 | 0 |
| 15 | 2210-0119 | प्रा. आ. केंद्राकरिता व मुख्यालयारिता सुरक्षा रक्षक सेवा घेणे | 2000000 | 0 |
| 16 | 2210-0120 | प्रा. आ.केंद्राकरिता स्वच्छता सुविधा पुरविणे करिता आवश्यक ती उपाययोजना | 3300000 | 3300000 |
| 17 | 2210-0121 | मुख्यालयातील अधिकारी व कर्मचा-याकरिता संगणक खरेदी, इंटरनेट सुविधा, संगणक देखभाल दुरुस्ती, ई गव्हर्नन्स,ई ऑफीस इत्यादी. | 2000000 | 500000 |
| 18 | 2210-0122 | महाआरोग्य शिबीर आयोजित करणे. | 3000000 | 3000000 |
| 19 | 2210-0123 | ग्रामिण भागातील आरोग्य संस्थांना औषधे/साहित्य सामुग्री पुरविणेसाठी माल वाहतुक वाहन भाडे करीता व त्या अनुषंगिक खर्च | 200000 | 50000 |
| 20 | 2210-0124 | आपत्कालिन परिस्थितीत ग्रामिण भागात तातडीची सुविधा देणेसाठी बास्केट स्ट्रेचर खरेदी करणे. | 200000 | 0 |
| 21 | 2210-0125 | आरोग्य विभागातील गुणंवत वैदयकीय आधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचा गुणगौरव करणे | 500000 | 200000 |
| 22 | 2210-0126 | सॅम मॅम च्या बालकांना सी.टी.सी., एन. आर. सी. मध्ये संदर्भ सेवा देणे | 500000 | 200000 |
| 23 | 2210-0127 | शवविच्छेदन करणा-या खाजगी स्वीपर सेवा व्यवस्था घेणे | 500000 | 500000 |
| 24 | 2210-0128 | प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील सी.टी.सी. कार्यान्वीत करणे | 2000000 | 200000 |
| 25 | 2210-0129 | तालुका आरोग्य आधिकारी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील पर्यवेक्षणाकरिता वाहतुक सेवा व्यवस्था | 500000 | 0 |
| एकुण | 51000000 | 58451000 | ||
नागरिकांची सनद 2025-26
| नागरिकांची सनद | (आरोग्य विभाग) | |||
| सेवांचा तपशिल | सेवा पुरविणारे अधिकारी नाव, व हुद्दा | सेवा देण्याची विहीत मुदत | सेवा न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिका-याचे नाव व हुद्दा | |
| 1 | 1. गरोदर मातांची नोंदणी/तपासणी व उपचार | वैद्यकिय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी परिचारीका/प्रसाविका | वेळापत्रकानुसार दिलेल्या भेटीनंतर 1) आगमनानंतर 2) विविक्षित दिवशी 3) शिबीरांच्या दिवशी | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 2. सर्व प्रकारचे लसीकरण | ||||
| 3. लोहयुक्त गोळया व जीवनसत्वांचे वाटप | ||||
| 4. बाळंतपणाच्या सुविधा व प्रसुतीपश्चात सेवा, | ||||
| 5. निरोध, गर्भनिरोधक गोळयांचे वाटप व तांबी बसविण्याची सुविधा, आवश्यकतेनुसार गर्भपाताचा सल्ला | ||||
| 6. आरोग्य सेवा सत्राचे आयोजन | ||||
| 7. हिवताप, अतिसार , (क्षार संजीवनी) न्युमोनिया व | ||||
| 1. मोतीबिंदूच्या रूग्णांची नोंदणी | ||||
| 2. लैंगिक आजावरील माहिती व उपचार , | ||||
| 3. कुष्ठरोग व क्षयरोग यांचा शोध, उपचार व आरोग्य शिक्षण | ||||
| 1. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अमलबजावणी | ||||
| किरकोळ आजारावरील उपचार | ||||
| 1. गंभीर रूग्णांसाठी संदर्भ सेवा, | ||||
| 2. छोटया शस्त्रक्रिया | ||||
| 3. श्वानदंश/सर्पदंश लस/उपचार, | ||||
| 1. अपघात/न्याय-वैद्यक प्रकरणे/रक्त/लघवी, थुंकी-तपासणी | ||||
| 1. प्राथमिक प्रयोगशाळा तपासणी | ||||
| 2. बालकांना बीसीजी/पोलिओ/ट्रिपल-पोलिओ, गोवर लस | ||||
| टोचणी व अ जीवनसत्वाची मात्रा, | ||||
| 1. गरोदर स्त्रियांना धर्नुवात प्रतिबंधक लस टोचणी व | ||||
| रक्तक्षय विरोधक गोळयांचे वाटप | ||||
| 1. कुटुंब नियोजनाच्या पध्दतीची माहिती तसेच इतर स्त्रियांना साधन वाटप (निरोध), तोंडाने घ्यावयाच्या गर्भनिरोधक गोळया वाटणेव तांबी बसवणे. | ||||
| 2. तापाच्या रूग्णांवर गृहभेट उपचार, हिवतपाचे रूग्ण शोध व गृहित उपचार, “अ” जीवनसत्वांची मात्रा देण, | ||||
| 3. मोतीबिंदू शस्त्रक्रिया,एडस रोगाविषयी माहिती, सल्ला व आरोग्य शिक्षण. | ||||
| जननी सुरक्षा योजना | ||||
| 2 | कुटुंब कल्याण योजना | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | प्रकरणेनिहाय दरमहा | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 3 | गर्भवती मातांना बुडीत मजुरी देणे | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | प्रकरणेनिहाय दरमहा | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 4 | मातृत्व अनुदान (आदिवासी मातांसाठी) | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | लाभार्थीनिहाय | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 5 | गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी,प्रा.आ.केंद्र | प्रकरणेनिहाय | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 6 | गरोदर मातांची प्रयोगशाळा तपासणी | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | प्रकरणेनिहाय | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 7 | माता व बालकांना संदर्भ सेवा देणे (JSSK) | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | प्रकरणेनिहाय/ तात्काळ वाहन उपलब्धतेनुसार | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
| 8 | प्रधानमंत्री मातृ वंदना योजना | संबंधित कार्यक्षेत्रातील वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र | लाभार्थीनिहाय | जिल्हा आरोग्य अधिकारी, |
कार्यक्रम –
क्षयरोग निदानासाठी ए आय सक्षम X-ray मशिन


संकल्पना–
- गावस्तरावर AI Based Portable X-ray मशिन व्दारे तपासणी
- नागरीकांचा प्रवास, वेळ व खर्च वाचणार असुन गावपातळीवर निदान व उपचार
उद्दिष्टे–
- क्षयरोग मुक्त गाव करणे
- दुर्गम भागात तत्पर सेवा देणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे
कार्यपध्दती–
- वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , बाह्यरुग्ण ( OPD ) तपासणी व camp मधुन तसेच गृहभेटी मधुन संशयित रुग्णांचा शोध घेता येतॊ.
- यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांना खात्रीशिर निदान करण्यासाठी Portable X-ray AI मशिनचा गावस्तरावर उपयोग करुन तपासणी करण्यात येते.
निरीक्षण / परिणाम
| मार्च 2025 ते जुन 2025 या कालावधिचा अहवाल | |
| सर्वेक्षण करण्यात आलेली लोकसंख्या | 54114 |
| संशयित रुग्णांची X-ray व Sputum तपासणी | 501 |
| संशयित मधुन Positive क्षयरुग्ण | 27 |
| Abnormal X-ray | 50 |
- Health and Wellness Center,Vajreshwari
- Primary Health Center Shenve
- Health and Wellness Center Dhasai
- Patient Ward
- Medicine Compactor




