जननी सुरक्षा योजना
जननी सुरक्षा योजना
क्षेत्र- जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी कार्यक्षेत्र
लाभार्थी:
1. दारीद्रय रेषेखालील लाभार्थी, अनुसूचित जाती व अनुसूचित 2. पात्र महिलेस कितीही अपत्य असेल तरीही तिला JSY माता समजुन शासकिय आरोग्य संस्थेत अथवा मानांकित आरोग्य संस्थेत प्रसुती झाल्यास त्या मातेसपुर्वीप्रमाणेच लाभ देणे. जमातीच्या कुटूंबातीलगरोदर माता तिचे वय कितीही असले तरीही लाभ देय राहिल. 2.
फायदे:
1. घरी प्रसुती झाल्यास लाभार्थीस रक्कम रु.500/- 2. ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यास रक्कम रु 700/- 3.शहरी क्षेत्रातील लाभार्थ्यांस रक्कम रु.600/- 4. सिझोरीयन शस्त्रक्रियेकरीता तज्ञास रक्कम रु.1500/-
अर्ज कसा करावा
जिल्हयातील प्रत्येक आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत अर्ज भरण्यात येतो.