प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
लाभार्थी:
1.पहिल्या खेपेच्या सर्व गरोदर व स्तनदा माता 2.दुसऱ्या खेपेस मुलगी अपत्य असलेल्या सर्व स्तनदा माता
फायदे:
• पहिल्या अपत्याकरीता दोन टप्प्यात रक्कम रु.5000/-; • पहिला टप्पा रु.3000/- : मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासुन 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडुन मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुती पुर्व तपासणी करुन घेणे आवश्यक आहे • दुसरा टप्पा रु.2000/-:जन्मनोंदणी प्रमाणपत्र व बालकासबीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस-बी च्या मात्रा अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिकलसीकरणचक्रपुर्ण) करणेआवश्यकआहे. • दुसरी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात रक्कम रु.6000/- • दुसरी अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यावरच नोंदणी करता येते. • दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्य झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर त्या स्तनदा मातेला योजनेच्या नियमांनुसार दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ मिळेल.
अर्ज कसा करावा
• जिल्हयातील आरोग्य संस्थेतील आरोग्य सेवक/सेविका, गटप्रवर्तक व आशा स्वंयसेविका यांच्या मार्फत ऑललाईन अर्ज भरण्यात येतो.
नोंदणीकरीता सरकारच्या वेबसाईटवरुन https://pmmvy.wcd.gov.in/ या पोर्टलमधिल Citizen Login द्वारे किंवा Android मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे.