बंद

    आपले सरकार सेवा केंद्र.

    • तारीख : 23/04/2025 -
    • क्षेत्र: .
    • भारत निर्माण कार्यक्रमातील नॅशनल गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत सर्व पंचायत राज संस्थाचे संगणकीकरण करुन त्यांच्या कारभारात एक सुत्रता व पारदर्शकता आणण्यासाठी ईपीआरआय/ईपंचायत हा मिशन मोड प्रकल्प हाती घेणेत आलेला आहे.
    • महाराष्ट्रातील सर्व पंचायत राज संस्थांचे जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत (संगणकीकरण करुन त्यांचा कारभार ऑनलाईन करण्याचा महत्वकांक्षी संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) ई-ग्राम सॉफ्ट हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
    • प्रकल्प अंमलबजावणी करीता CSC-SPV या कंपनीची नेमणुक करणेत आलेली आहे.
    • महाराष्ट्रात हा प्रकल्प आपले सरकार सेवा केंद्र या नावाने राबविण्यात येत आहे.

    आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पाची उद्दिष्टये

    • सर्व पंचायत राज संस्थांचा कारभार ऑनलाईन करणे .
    • सर्व पंचायत राज संस्थांचा कोष (Database) तयार करणे.
    • ई- पंचायत सुटमधील ११ आज्ञावली मध्ये माहिती भरणे.
    • ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत G2G व G2C सुविधा पोहचविणे.
    • या प्रकल्पाच्या समन्वायाने नागरिकांना ग्रामीण भागात देण्यात येणा-या सर्व सुविधांचा दर्जा उंचविणे ..

    ग्राम सॉफ्ट:

    ग्रामपंचायतीचा संपुर्ण कामकाज सुरळित व अखंडीत पणे चालु ठेवण्याकरिता ही कार्यप्रणाली उपयुक्त ठरते.

    या कार्यप्रणालीच्या वापरामुळे ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व्यवहार अचुक व वेळचेवेळी पुर्ण होतात.

    ग्रामपंचायतीमधील सर्व प्रकारच्या नोंदी व इतर दैनंदिन कामकाज हे संगणकीकृत (Digitizes) होऊन त्यामध्ये व्यवस्थीतपणा जोपसला जातो. संगणकीकृत झालेली माहिती ही एकसंघाराहून ती शोधण्यास सोपी व अत्यल्प वेळेत उपलब्ध होते.

    वेळोवेळी झालेले बदल व दुरुसत्या यांची नोंद व माहिती सविस्तर संकलीत असते. Online and offline Version is Available

    आपले सरकार सेवा केंद्रातून  देण्यात येणाया प्रमाणपत्रे सुविधा सेवा दर (२०/-रुपये)

    अ.क्र. सेवा (Services) अ.क्र. सेवा (Services)
    नमुना ८ असेसमेंट दाखला विवाह दाखला
    दारिद्या रेषेखालील दाखला थक बाकी नसल्याचा दाखला
    जन्म दाखला निराधार योजना करिता वयाचा दाखला
    मृत्यू दाखला    

    लाभार्थी:

    .

    फायदे:

    .

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे