बंद

    कृषि विभाग

    विभागाबद्दल माहिती –

    कृषी विभाग हा जिल्हा परिषदेचा महत्वाचा विभाग असून कृषी विकास अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतात. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कृषी विभागातर्फे करण्यात येते.

    महाराष्ट्रामधील कोकण प्रांतात ठाणे जिल्हा आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे कृषि विषयक उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बी-बियाणे, खते, औजारे इ. बाबी शेतकऱ्यांना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे तसेच या बाबींची शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे या दृष्टिने जिल्हा परिषद, जिल्हाचे कृषि विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे मार्फत मार्गदर्शन करण्यात येते. शासनामार्फत तसेच जि.प.च्या उपकरातुन कृषि विषयक योजना राबविण्यात येतात.

    परिचय  –    कृषि विकास अधिकारी यांचे अधिनस्त जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य)  हे विभागाचे आहरण संवितरण अधिकारी असून कर्मचारी आस्थापनाविषयक कामकाजाचे नियंत्रण व पर्यवेक्षणदेखील यांचेमार्फत केले जाते. तसेच जिल्हा परिषद सेस निधीतून कृषि विषयक योजनांची व जिल्हा कृषि अधिकारी (विघयो) यांचेमार्फत विशेष घटक योजनेंअंतर्गत योजनांची अंमलबजावणी तालुकास्तरावरील कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी यांचे सहाय्याने  केली जाते.

    व्हिजन आणि मिशन शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचाविणे तसेच कृषि क्षेत्राचा विस्तार करणे. जिल्यातील    शेतकऱ्यांना आवश्यक विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून प्रभावीपणे राबविणे.

     

    उद्दिष्टे कार्ये मजकूर

    1. जिल्हयातील शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीस हातभार लावून त्यांचे राहणीमान उंचावणे.
    2. शेतकऱ्यांना यांना आवश्यक कृषि निविष्ठा पुरवठा व गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे.
    3. शेतकरी बांधवांना शेती व शेती पूरक क्षेत्रातून उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे.
    4. शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचिवणे.
    5. आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून त्यांचे आर्थिक उन्नतीस हातभार लावून राहणीमान उंचाविणे.

    6.शेतकऱ्यांची उत्पादन व उत्पादकता वाढविणे.

    1. शेती क्षेत्रातील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी यांत्रिकी करणाचा वापर वाढविणे.
    2. जिल्यातील शेतकऱ्यांना आवश्यक विविध कृषि विषयक योजना जिल्हा परिषद स्वउत्पन्नातून प्रभावीपणे     राबविणे.

     

    प्रशासकिय सेटअप

    Krushu vibhag admin setup

    संलग्न कार्यालये-
    मा.विभागीय कृषि सहसंचालक, कोकण विभा्ग ठाणे.

    मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, ठाणे

    संचालनालय / आयुक्तालय – कृषि आयुक्तालय, पुणे

     

    राज्य पुरस्कृत योजना

    • योजनेचे नाव बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत

        • कालावधी प्रारंभ – 2024-25
        • कालावधी समाप्त – 2025-26
        • क्षेत्र –किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर
        • लाभार्थी – 31
        • फायदे –  सिंचनाची कायमस्वरुपी सुविधा
        • अर्ज कसा करावा.-सदर योजनेसाठी महा- डीबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/ login या संकेत स्थळावर शेतक-याने अर्ज करावा.

       

      योजनेचे नाव- बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना क्षेत्रांतर्गत

    • कालावधी प्रारंभ – 2024-25
    • कालावधी समाप्त– 2025-26
    • क्षेत्र-किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर
    • लाभार्थी 8
    • फायदे -सिंचनाची कायमस्वरुपी सुविधा
    • अर्ज कसा करावा  – सदर योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/ login या संकेत स्थळावर शेतक-याने अर्ज करावा.
    • योजनेचे नाव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

    • कालावधी प्रारंभ-2024-25
    • कालावधी समाप्त 2025-26
    • क्षेत्र  किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर
    • लाभार्थी    3
    • फायदे  सिंचनाची कायमस्वरुपी सुविधा
    • अर्ज कसा करावा   -सदर योजनेसाठी महा-डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in farmer/login/ login या संकेत स्थळावर शेतक-याने अर्ज करावा.
    • ४.योजना/कार्यक्रम – जिल्हा परिषद सेस योजना सन 2024-25

       

      योजनांची माहिती
      अ.क्र. योजनेचे नांव कालावधी क्षेत्र लाभार्थी संख्या फायदे अर्ज कसा करावा
      1 शेतकऱ्यांना/बचतगटांना/ग्रामसंघाना विविध सिंचन साहित्याचा पुरवठा करणे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 914 पाण्याचा अपव्यय टाळणे, जमिनीचा पोत राखणे, डिझेल/विद्युत/सौर पंपसंच तसेच HDPE, PVC पाईप उपलब्ध तालुकास्तरावर 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकपासबुक, जात प्रमाणपत्र जोडून अर्ज सादर करावा
      2 शेतकरी / शेतमजूर / बचतगट यांना पिक संरक्षण औजारे पुरवठा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 868 किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      3 सुधारीत कृषी औजारांचा पुरवठा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 409 मजुरी खर्च कमी, कामे जलद व गुणवत्तापूर्ण तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      4 सौर उर्जेवर आधारित साहित्याचा पुरवठा 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 48 विजेच्या अनुपलब्धतेवर उपाय, अपारंपरिक उर्जा वापर प्रोत्साहन तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      5 कृषी क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञान वापर प्रोत्साहन 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 1398 मल्चिंगमुळे ओलावा टिकतो, बाष्पीभवन कमी तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      6 काटेरी तार / विद्युत कुंपणासाठी अर्थसहाय्य 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 761 पिकांचे जनावरांपासून संरक्षण तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      7 फुलशेती, औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 44 नगदी उत्पन्न वाढ, रोजगार निर्मिती, स्थलांतर कमी तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      8 पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजना – भाजीपाला विक्री साहित्य व ई-कार्ट 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 56 ग्राहक आकर्षण, इंधन बचत, आत्मनिर्भरता तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज
      9 मधुमक्षिका पालन व्यवसाय प्रोत्साहन 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 82 परागीभवनामुळे उत्पादन वाढ, पूरक उत्पन्न तालुकास्तरावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज

       

       

      योजनेचे नाव :- बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत /क्षेत्राबाहेरील)

      योजनेचे स्वरूप

      • नवीन सिंचन विहीर – रु. 4,00,000/-
      • जुनी विहीर दुरुस्ती – रु. 1,00,000/-
      • शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण – रु. 2,00,000/-
      • इनवेल बोअरिंग – रु. 40,000/-
      • वीज जोडणी आकार – रु. 20,000/-
      • पंप संच (डिझेल / विद्युत) – रु. 40,000/-
      • सोलार पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी) – रु. 50,000/-
      • एचडीपीई / पीव्हीसी पाईप – रु. 50,000/-
      • तुषार सिंचन संच – रु. 47,000/-
      • ठिबक सिंचन संच – रु. 97,000/-
      • यंत्रसामुग्री (बैलचलित / ट्रॅक्टरचलित) – रु. 50,000/-
      • परसबाग – रु. 5,000/-
      • विंधन विहीर – रु. 50,000/-

      योजनेचे निकष

      1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक आहे.
      2. सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
      3. शेतकऱ्याच्या नावे 7/12 उतारा व 8अ दाखला असणे आवश्यक आहे (नगरपालिका क्षेत्राबाहेरील).
      4. लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते असावे व ते आधारकार्डशी संलग्न असावे.
      5. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.
      6. वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1,50,000/- रद्द करण्यात आली आहे.
        लाभार्थ्याकडे किमान 0.40 हेक्टर व कमाल 6 हेक्टर जमीन असावी.
        कमी जमीन असल्यास दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र येऊन करार केल्यास पात्र ठरतील.
        BPL लाभार्थ्यांसाठी 6 हेक्टर मर्यादा लागू नाही.
      7. प्राधान्यक्रम:
        • दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
        • आदिम जमाती लाभार्थी
        • वैयक्तिक वनहक्क पट्टेधारक
      8. एकदा लाभ घेतल्यास पुढील 5 वर्ष लाभ मिळणार नाही.
        नवीन विहीर लाभ घेतल्यास 20 वर्षांनंतर जुनी विहीर दुरुस्ती लाभ मिळेल.
      9. इतर योजनांमधून (SCA, कलम 275(A)) लाभ घेतल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
      10. लाभ घेतल्यानंतर 7/12 उताऱ्यावर नोंद केली जाईल.

      अर्ज प्रक्रिया

      सदर योजनेसाठी
      Mahadbt Portal
      वर अर्ज करावा.
      अधिक माहितीसाठी पंचायत समिती येथील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

       

      योजनेचे नाव :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

       

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
      घटक माहिती
      योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
      योजनेचे स्वरूप नवीन सिंचन विहीर – रु. 4,00,000/-
      जुनी विहीर दुरुस्ती – रु. 1,00,000/-
      शेततळ्यांचे प्लॅस्टिक अस्तरीकरण – रु. 2,00,000/-
      इनवेल बोअरिंग – रु. 40,000/-
      वीज जोडणी – रु. 20,000/-
      पंप संच (डिझेल / विद्युत) – रु. 40,000/-
      सोलार पंप – रु. 50,000/-
      एचडीपीई / पीव्हीसी पाईप – रु. 50,000/-
      तुषार सिंचन संच – रु. 47,000/-
      ठिबक सिंचन संच – रु. 97,000/-
      यंत्रसामुग्री – रु. 50,000/-
      परसबाग – रु. 5,000/-
      योजनेचे निकष
      1. लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक आहे.
      2. सक्षम प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
      3. ७/१२ उतारा व ८अ दाखला आवश्यक आहे.
      4. लाभार्थ्याचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे.
      5. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
      6. लाभार्थ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर जमीन असावी (विशेष अटी लागू).
      7. एकदा लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही.
      8. इतर योजनांचा लाभ घेतल्यास या योजनेसाठी पात्र ठरणार नाही.
      9. लाभ घेतल्यानंतर ७/१२ उताऱ्यावर नोंद केली जाईल.
      अर्ज प्रक्रिया Mahadbt Portal वर अर्ज करावा:

      mahadbt.maharashtra.gov.in

      अधिक माहितीसाठी पंचायत समिती येथील कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

      केंद्र सरकार योजना/कार्यक्रम केंद्र पुरस्कृत  नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम सन 2024-25

      योजनांची माहिती
      अ.क्र. योजनेचे नांव कालावधी क्षेत्र लाभार्थी संख्या फायदे अर्ज कसा करावा
      1 नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंत जिल्हा परिषदेचे कार्यक्षेत्र 14 बायोगॅस हा अपारंपारिक उर्जा स्रोत असून स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापर करता येतो.
      वातावरण प्रदूषण कमी होते व इंधन खर्चात बचत होते.
      लाभार्थ्याने तालुकास्तरावर 7/12 उतारा, आधारकार्ड, बँकपासबुक, जात प्रमाणपत्र
      इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.

      कायदे आणि नियम

      सूचना पत्रकानुसार विषयांची माहिती
      अ.क्र सूचना पत्रकानुसार दिलेले विषय नियम क्रमांक व वर्ष अभिप्राय
      1 कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी महाराष्ट्र जि.प. व जिल्हा सेवा नियम 1958
      महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपील) 1971
      महाराष्ट्र नागरी सेवा नियम (रजा) 1982
      महाराष्ट्र नागरी सेवा नियम (सेवेसच्या सर्वसाधारण शर्ती) 1981
      म.जि.प जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) 1964
      जि.प. विकास कामांचे सनियंत्रण
      महा. जि.प. व पं.सं. अधिनियम 1961 व त्याखालील नियम
      —–
      —–
      —–
      —–
      —–
      —–
      —–
      2 कृषि विषयक सर्व योजनांची अंमलबजावणी खात्याने प्रतिवर्षी निर्गमित केलेले आदेश, परिपत्रके, मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय —–
      RTI संपर्क (PIOS / APOS / AA)
      पद माहिती
      सहाय्यक जन माहिती अधिकारी (APIO) सहाय्यक प्रशासन अधिकारी,
      कृषि विभाग,
      जिल्हा परिषद ठाणे
      जन माहिती अधिकारी (PIO) जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य),
      कृषि विभाग,
      जिल्हा परिषद ठाणे
      प्रथम अपिलिय अधिकारी (AA) कृषि विकास अधिकारी,
      कृषि विभाग,
      जिल्हा परिषद ठाणे

      अंदाजपत्रक 2024-25

      माहितीचा अधिकार

      प्रशासन अहवाल 23-24