ग्रामीण पाणी पुरवठा विभाग
प्रस्तावना :-
ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे संबंधित ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीना तांत्रीक मार्गदर्शन तालुका व जिल्हा पातळीवर होण्याच्या दृष्टीकोनातुन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची निर्मिती जिल्हा स्तरावर झाली आहे. सदर विभागांतंर्गत व जिल्हास्तरावर देखभाल दुरुस्ती कक्ष व यांत्रिकी उपविभाग आहे. तसेच तालुकास्तरावर एकुण तीन उपविभाग आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम मागणी आधारित धोरण असुन केंद्र शासन पुरस्कृत वर्धीत वेग कार्यक्रम स्वजलधराव राज्य शासन पुरस्कृत महाजल तसेच बिगर आदिवासी / आदिवासी अंतर्गत कामाचा समावेश करुन सन 200-2010 पासुन सदर कार्यक्रमांचे रुपांतर राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम असे केले.
ग्रामीण भागाचा पिण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना व विंधन विहीरी या सारख्या उपाययोजना या विभागामार्फत राबविल्या जातात. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयान्वये मागणी आधारित लोकसहभागाचे लोकाभिमुख धोरण स्विकारले व या धोरणानुसार योजनांचीमागणी , आखणी अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थानी करावयाची आहे.सबब सदर कार्यवाही जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीच्या माध्यमातुन करण्यात येते.तसेच ज्या गावातील पाण्याचे उदभव गुणवत्ता बाधीत झालेले आहेत.अशा गावांना शुध्द पाण्याचा पुरवठा या योजनेव्दारे करण्यात येतो.
ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेची कामे ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येतात. यामध्ये विविध लेखाशिर्षा अंतर्गत प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे.
- नळ पाणी पुरवठा योजना करणे
- साधी विहिर योजना
- नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे
- साधी विहिर दुरुस्ती करणे
- नवीन विधन विहिर घेणे
- विद्युत पंप/सौर पंपाव्दारे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे
- विंधन विहिर दुरुस्ती करणे
- टंचाई कार्यक्रम राबविणे
पाणी पुरवठा व विभागामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात येणा-या मार्गदर्शक सुचनांचे अनुषंगाने पाणी पुरवठा संबंधित कामे करणे येतात व ग्रामपंचायतींकडे कार्यान्वयनासाठी व पुढील देखभाल दुरुस्तीसाठी हस्तांतरीत करण्यात येतात.
दृष्टी आणि ध्येय-
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग हा ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण 14 विभागांपैकी एक विभाग आहे. कार्यकारी अभियंता हे विभागाचे प्रमुख असतात. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजना करणे, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे, साधी विहीर दुरुस्ती करणे, नवीन विंधन विहीर घेणे, विद्युत पंप/सौर पंपाद्वारे लघु नळ पाणी पुरवठा योजना करणे, टंचाई कार्यक्रम राबविणे कामे प्रस्तावीत करण्यात येतात.
विभागाची संरचना
संपर्क
कार्यालयीन पत्ता :- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे स.गो. बर्वे मार्ग, जी.एस.टी. भवन समोर, रोड नंबर-22 वागळे इस्टेट ठाणे पश्चिम -400604
ई मेल पत्ता 3– eebnthane@gmail.com
कार्यालयीन कामकाजाची वेळ
कार्यालयीन कामकाजाची वेळ :- सकाळी 9.45 ते 18.15 पर्यत
महिन्यातील पहिला , दुसरा, तिसरा व चौथा शनिवार व प्रत्येक रविवार , शासकिय नियमानुसार इतर सार्वजनिक सुटटया वगळुन
विभागाची कार्यपध्दती
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत प्रकल्प शाखा, देखभाल दुरुस्ती कक्ष, व यांत्रिकी उपविभाग कार्यरत आहे. ग्रामीण भागाची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या मागणी आधारित धोरणांतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत.प्रकल्प शाखा व यांत्रिकी उपविभागाच्या माध्यमातुननळ पाणी पुरवठा योजना, साधी विहिर , विंधण विहिर, लघु नळ पाणी पुरवठा योजना तसेचदेखभाल दुरुसती कक्षांतर्गत नाविन्यपुर्ण उपाययोजना व पाणी पुरवठा येाजना दुरुस्ती यासारख्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येणा-या विभाग निहाय कामांचा तपशील खालीलप्रमाणे.
प्रकल्प शाखा :-
- जल जीवन मिशन कार्यक्रम
सन 2009-2010 पासुन केंद्र शासन पुरस्कृतसुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीणपेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनामध्ये समाविष्ठ पुर्नरचना करणेत आली. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2025 पर्यत हर घर नल से जल (FHTC-F untoinal Household Tap Connection ) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे. सन 2025 पर्यत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरांत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिअर प्रती दिन,गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्यिष्ठ आहे.
- यांत्रिकी विभाग
- नवीन विंधन विहिर घेणे
- विंधन विहिर दुरुस्ती
- विंधन विहिर फल्शिंग
- हातपंप बसविणे व कटटा बांधणे
- दुहेरी पंपावर आधारित लघु नळ पाणी पुरवइा योजना
- सौर ऊर्जेवर आधारीत नळ पाणी पुरवठा योजना
- देखभाल दुरुस्ती कक्ष
- साधी विहिर दुरुस्ती
- अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती
- प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती
- अस्तित्वातील सर्व योजनाची माहिती अद्यावत ठेवणे
गावामधील आवश्यक उपाययोजना उदा. उध्दव निर्मिती ,वाढीव पाईपलाईन नवीन स्वतंत्र योजना, नवीन प्रादेशिक योजना व आधारीत लघु नळ पाणी पुरवठा योजना करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने पुढील 4 वर्षासाठी महसूल गावनिहाय गाव कृती आराखडा सादर करण्यात येत आहे. व सदर कार्यक्रमाची कार्यप्रणाली व निकषाबाबत शासनाच्या प्राथमिक मार्गदर्शक सुचनाचे अनुषंगाने कार्यवाही .
| तालुका | गावांची संख्या | कुटूंब संख्या | दि. 1/4/2025 पर्यत नळ जोडणे संख्या | दि. 6.1.2025 पर्यंत देण्यांत आलेली कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी संख्या | सन 2025-2026 पर्यंत कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी दिलेल्या घरांची संख्या | शिल्लक कार्यान्वीत घरगुती नळ जोडणी संख्या | शिल्लक कार्यान्वीत घरगुती नळ जोडणीची टक्केवारी
दि. 7.1.2025 |
| अंबरनाथ | 63 | 21765 | 19044 | 445 | 19489 | 2276 | 89.54 |
| भिवंडी | 221 | 97271 | 80170 | 1846 | 82016 | 15255 | 84.32 |
| कल्याण | 83 | 29213 | 25736 | 69 | 25805 | 3408 | 88.33 |
| मुरबाड | 203 | 40725 | 25899 | 1282 | 27181 | 13544 | 66.74 |
| शहापुर | 226 | 72301 | 43048 | 553 | 43601 | 28700 | 60.31 |
| एकुण | 796 | 261275 | 193897 | 4195 | 198092 | 63183 | 75.82 |
उद्दिष्टे कार्ये मजकूर-
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हर घर जल योजना करणे.
सन 2009-2010 पासुन केंद्र शासन पुरस्कृतसुरु असलेल्या राष्ट्रीय ग्रामीणपेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनामध्ये समाविष्ठ पुर्नरचना करणेत आली. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाना सन 2025 पर्यत हर घर नल से जल (एफएचटीसी-एफ घरगुती नळ कनेक्शन ) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचे ध्येय आहे. सन 2025 पर्यत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरांत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिअर प्रती दिन,गुणवत्ता पुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्यिष्ठ आहे.
योजनेचे निकष –
-
- गावातील प्रत्येक घराला दररोज 55 ली. प्रती माणसी नळाद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे.
- गावातील प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळांनाव अंगणवाड्यांना शुद्ध पाणी पुरवठा करणे.
- 30 वर्षे संकल्पीत लोकसंख्येला पुरेसा असेल असा उद्भव विकसीत करुन सदर उद्भवावरुन योजना आखने.
यांत्रिकी उपविभाग
यांत्रिकी विभागाच्या कार्यकक्षेमध्ये खालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.
व्यवस्थापकीय कार्य
-
-
- टंचाई तसेच आदिवासी उपयोजना, आमदार व खासदार निधी अंतर्गत नवीन विंधन विहिर घेणे व हातपंप बसविणे.
- अस्तित्वातील विंधन विहिरींची ग्रामपंचायतीबरोबर करार करुन देखभाल व दुरुस्ती करणे.
- विद्युत पंप व सौर पंपावर आधारीत लघु न.पा.पु.योजना करणे.
- हातपंपाची मागणी व वसुलीची माहिती अद्ययावत करणे व प्रत्यक्षात वसूली करणे.
-
तांत्रिक कार्य
-
-
-
- देखभाल दुरुस्ती पथकाचे माध्यमातून करार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींचे अंतर्गत असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती करणे.
- विंधन विहिरींचे फ्लशिंग करणे.
- ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार सर्वेक्षण करुन, छोट्या वाड्यांसाठी विंधन विहिरींवरुन विद्युत पंप व सौर पंपाच्या माध्यमातून लघु न.पा.पु.योजना करणे.
- नवीन विंधन विहिर घेणे
-
-
देखभाल दुरुस्ती कक्ष
4 मार्च 2011 चे शासन निर्णयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा विभागा अंतर्गत देखभाल दुरुस्ती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. देखभाल दुरुस्ती कक्षाच्या कार्यकक्षेमध्येखालीलप्रमाणे कामांचा समावेश होत आहे.
व्यवस्थापकीय कार्य
-
-
-
-
- संपूर्ण जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची माहिती अद्ययावत ठेवणे
- ग्रामपंचायतीनिहाय पाणीपट्टी व देखभाल दुरुस्ती खर्चाचा आढावा घेणे
- विजेचा वापर कमी ठेवणेबाबत ग्रामपंचायतींना मार्गदर्शन करणे
- घरगुती नळपाणी पुरवठा करीता कनेक्शन वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व लाभार्थ्यांना नियमित आणि योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे याकडे लक्ष देणे.
- लाभार्थ्यांच्या तक्रार निवारण करण्यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करणे.
- प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती करणे.
- पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, पुरक योजना करणे.
-
-
-
तांत्रिक कार्य
-
-
-
-
- संबंधित ग्राम पंचायतींना पाणी पुरवठा योजनांच्या व आपत्कालिन परिस्थितीमध्ये तातडीने करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रशिक्षित करणे.
- पाणी पुरवठा योजना बंद पडू नयेत यास्तव प्रतिबंधात्मक उपाय योजना करणेबाबत सूचना करणे.
- लाभार्थ्यांनी पाणी योजनांचा लाभ घेतला नाही तरी देखभाल दुरुस्ती कक्षाने सदर योजना सुरु राहिल याकडे लक्ष देणे
- योजनांच्या उभारणीत आवश्यक मानकानुसार निश्चित केलेया गुणवत्तेचेच साहित्य वापरात आणले जाईल याकडे लक्ष देणे.
-
-
-
आर्थिक कार्य
-
-
-
-
- ग्रामपंचायत निहाय वार्षिक खर्चाची आकडेवारी इ. माहिती तयार करणे
- प्रोत्साहन अनुदानासाठीचे प्रस्ताव वेळच्यावेळी शासनास पाठविले जातील याकडे लक्ष देणे
- योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखभाल दुरुस्ती निधीमधून करणे.
-
-
-
प्रशासकिय सेटअप-
-
-
-
-
- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, ठाणे.
- उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, मुरबाड
- उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, भिवंडी.
- उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, कल्याण.
- उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अंबरनाथ.
- उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, शहापुर.
-
-
-
जलयुक्त शिवार अभियान.
सन २०१२-१३ मध्ये टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोकण विभागातील ५ जिल्हयांत जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये सर्व विभागाच्या समन्वयातून एकत्रितपणे वेगवेगळ्या योजना राबवून पाणी अडविण्यासाठी व भूजल पातळीत वाढ करण्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. या अभियानात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून विभागात अस्तित्वातील जलस्तोत्र बळकटीकरण करणे, विंधन विहिर पाऊस पाणी संकलन व्यवस्था करणे इ. कामे हाती घेण्यात आली.
अभियानाचा उद्देश :
-
-
-
-
- पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाचे शिवारातच अडविणे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे.
- राज्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ करणे शेती साठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे
- राज्यातील सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वता ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजनांचे पुनर्जिवीकरण करुन पाणी पुरवठ्यात वाढ करणे.
- भूजल अधिनियम अंमलबजावणी.
- अस्तित्वातील जलस्रोतांमधील गाळ लोक सहभागातून काढून जलस्रोतांचा पाणी साठा वाढविणे.
-
-
-
योजना—
योजनेचे उद्दीष्ट-
-
-
-
-
-
- आदिवासी शेतक-यांना धरणातील पाण्याच्या सिंचनाचा लाभ मिळणे.
- पाझरातुन विहीरींचे पुनर्भरण होणे व पशुपक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणे. अप्रत्यक्षपणे सिंचन क्षमतेत वाढ होणे.
- जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात जलस्तोत्रातील गाळ काढणे, जलस्तोत्र बळकटीकरण, विहिर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर कामे हाती घेण्यात आली.
-
-
-
-
नागरिकांची सनद अनुसुची
| कार्यासनाचे नांव | विभागाकडुन/ कार्यालयाकडुन पुरविली जाणारी सेवा | संबंधित अधिकारी कर्मचारी नांव | किती कालावधीत सेवा पुरविली जाईल | विहित कालावधीत सेवा न पुरविल्यास कोणाकडे तक्रार करता येईल त्या अधिका-यांचे पदनाम |
| लेखा शाखा – | · उपविभाग व त्यांअंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील योजनांची देयके तपासून अर्थ विभागात पाठविणे व देयके अंतिम मंजूर होईपर्यंत युटीलायझेशन विनियोग दाखले खर्चाचा ताळमेळ घेणे.
· शासकिय योजनांची तरतुद व खर्चाचा ताळमेळ घेणे. · स्थानिक निधी लेखा ,पंचायत राज समिती, महालेखाकार, भार-अधिभार प्रकरणे व आक्षेप निकाली काढणे. · विनियोजन लेखे, उपयोगिता प्रमाणपत्र, खर्चाचा अहवाल सादर करणे. · तरतूदीची मागणी करणे, रोख अनुदान कोषागारातुन अहारीत करणेचा प्रस्ताव व देयक तयार करणे. · सर्व लेखा शिर्षांतर्गत वेतन व भत्ते तसेच टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत अनुदानाचे तालुकास्तरावर वित्तप्रेषण रक्कम वाटप करणे व खर्चाचा ताळमेळ घेणे · शासकिय योजना व टंचाई निधी कार्यक्रमांतर्गत सर्व देयकांवर तरतुद व खर्च नमुद करणे व नोंदवहया अद्ययावत ठेवणे. · शासनास बजेट सादर करणे तसेच जिल्हा परिषद बजेट तयार करणे. लेखा विषयक सर्व कामकाज करणे. · राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचे तसेच सर्व येाजनांचे प्रस्ताव व देयके सादर करणे. · वित्त विभागाकडुन प्राप्त झालेल्या देयकांची नोंद ठेकेदार नोंदवहीत भरणे.,आयकर/वॅट कपातीचे दाखले देणे. · सर्व तालुक्यातील न.पा.पु. योजना व विहीर दुरुस्ती देयके तपासणी करुन सादर करणे व नोंदवहया अद्यावत ठेवणे. प्रोत्साहन अनुदान देयके तपासणे · १५ वा वित्त आयोग · अधिकारी/कर्मचारी वेतनाचे धनादेश बँकेत भरणा करणे · पाणी पुरवठा विभागातील सुरक्षा अनामत देयके तयार करणे · कॅश बुक लिहीणे. व अन्य अनुषंगिक बाबी., सर्व व्हाऊचर च्या नोंदी ठेवणे. विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
1. श्रीम. एस डी. रावराणे प्रभारी सहा.लेखाधिकारी
2. श्रीम. एस डी. रावराणे वरिष्ठ सहा. लेखा
|
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| आस्थापना-1
|
· श्रेणी 1 व 2 ची आस्थापना, निवृत्ती वेतन अंशदान व अन्य अनुषंगिक बाबी हाताळणे.
· दैनंदिनी व संभाव्य फिरती कार्यक्रम मंजुरी देणे. · विभाग व उपविभाग सेवानिवृत्ती / कुटुंब निवृत्ती / स्वेच्छा निवृत्ती वेतन प्रकरणे करणे तसेच कार्यालयांतर्गत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे भ.नि.नि. , गटविमा प्रकरणे व रजा रोखीकरण प्रस्ताव करणे. · निलंबन व विभागीय चौकशी प्रकरणे, अनाधिकृत गैरहजेरी प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे पाठपुरावा करणे व अनुषंगिक बाबी. · नळ पाणी पुरवठा व प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरील रोजंदारी कर्मचारी आस्थापना व अन्य अनुषंगिक बाबी. · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
1.श्री. मनोज शिंदे कनिष्ठ सहाय्यक
|
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे
|
| · श्रेणी 1 व 2 ची वेतन देयके करणे.
· वर्ग 3 जिल्हा तांत्रिक संवर्गाची आस्थापना व अन्य अनुषंगिक बाबी. · सर्व अधिकारी/ कर्मचारी गोपनीय अहवाल अद्यावत ठेवणे. संवर्गनिहाय सेवाजेष्ठता, बिंदुनामावली तयार करणे · सर्व संवर्ग बदली व भरती प्रक्रीया (सरळसेवा/कंत्राटी) · समिती दौरा विषयक माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जामती/महिला हक्क समिती) · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
||||
| आस्थापना-2 | · ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांची संपुर्ण आस्थापना व त्या अनुषंगिक बाबी.
· स्थायी आदेश संचिका अद्यावत ठेवणे व संकलित नोंदवही ठेवणे. · आस्थापना विषयक वार्षिक प्रशासन अहवाल · कर्मचारी वेतन देयके/ अतिकालीक देयके व इतर देयके व अन्य अनुषंगिक बाबी. · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
1.श्रीम. आशा तिजोरे
कनिष्ठ सहा |
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| प्रशासन / ऑडीट-कल्याण भिवंडी | · जलव्यवस्थापन समिती , स्थायी समिती सभा व Z.P मिटींगची माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.
· विभागीय तपासणी मुद्दयांची पुर्तता करणे, कर्मचारी दप्तर तपासणी व खातेप्रमुख पंचायत तपासणी व मुद्यांची पुर्तता करणे. · मासिक प्रगती अहवाल , माहिती अधिकार अहवाल व शासनाने विहीत केलेले अहवाल पाठविणे तसेच PRA & PRB संकलन. · मा. कार्यकारी अभियंता दैनंदिनी व संभाव्य कार्यमंजूरी · लोकशाही दिन व जनता दरबार./आपले सरकार · पंचायत राज समिती व यशवंत पंचायत राज अभियान वार्षिक अहवाल तयार करणे व त्यास मंजुरी घेणे. · अभिलेख याद्या अद्यावत करुन आय.एस.ओ. संदर्भात नियोजनबध्द कार्यवाही करणे. · समिती दौरा विषयक माहिती संकलित करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/विमुक्त जाती भटक्या जामती/महिला हक्क समिती) · वार्षिक प्रशासन अहवाल योजना · कार्यालयीन वाहन दुरुस्ती लॉगबुक/ हिस्ट्रीसीट अद्यावत ठेवणे · ऑडीट शाखा भिवंडी, कल्याण · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे
|
श्रीम. ज्योजी गावित कनिष्ठ सहाय्यक
|
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| निविदा शाखा व ऑडीट शहापूर | · ई-निविदा
· कार्यालयांतर्गत ई-निविदा विषयक सर्व नस्ती पाठपुरावा करणे व अन्य अनुषंगिक बाबी · शहापूर ऑडीट · टंचाई विषयी प्रकल्प शाखेस सहाय्यक · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्री. सुदर्शन महाळुंगे, कनिष्ठ सहाय्यक | 7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे
|
| प्रकल्प शाखा शहापूर | · ZPPMS पोर्टलवर जल जीवन मिशनची माहिती अद्यावत करणे.
· पाणी टंचाई आराखडा विषयी संपूर्ण कामकाज व सनियंत्रण · शहापूर तालूका तांत्रिक कामकाज · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्रीम. दिव्या गणेशगीरी गोसावी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
|
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| ऑडीट ( मुरबाड व अंबरनाथ) | · भांडार शाखा,टी.सी.एल. खरेदी व पुरवठा, संगणक मागणी खरेदी व दुरुस्ती , जडसंग्रह नोंदवही अद्यावत ठेवणे
· लेखन साहित्य खरेदी व वाटप, साठा नोंदवही अद्यावत ठेवणे · नवसंजीवन योजना, · भांडार शाखा/ निविदा शाखा ( Offline Tender) · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्री. वाय.बी.राऊत क. सहा
|
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| प्रकल्प शाखा- कल्याण, अंबरनाथ | · कल्याण , अंबरनाथ तांत्रिक कामकाज
· जलयुक्त शिवार · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्रीम. देविश्री पिंताबंर कोळी,
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| आवक-जावक शाखा | · नोंदणी शाखा ( आवक जावक, अनौ प्रस्ताव, संदर्भ नोंदवहया ठेवणे) इमेलवरील पत्रांची नोंद ठेवणे व वितरण करणे व अन्य अनुषंगिक बाबी.
· स्टम्प नेांदवही अ व ब नोंदीसह अद्यावत ठेवणे. · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे · कार्यालयांतर्गत विद्युत देयके व टेलिफोन देयके तयार करणे. |
श्रीम ज्योती गावित,
कनिष्ठ सहाय्यक
|
1 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| प्रकल्प शाखा मुरबाड | · मुरबाड उप विभाग तांत्रिक कामकाज,
· प्रादेशिक योजना · देखभाल व दुरुस्ती संबधित कामकाज · विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्री. विशाल अधिकारी,
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) |
7 दिवस | कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद ठाणे |
| प्रकल्प शाखा भिवंडी | · भिवंडी तालूका तांत्रिक कामकाज
· विभागप्रमुख तसेच वरिष्ठांनी वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करणे |
श्री. सुरज चौधरी, कं. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य) |
यशोगाथा :-
ठाणे जिल्हयातील ग्रामीण भागात वैयक्तिक नळ जोडणी करणे करिता जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 261271 कुटुंबापैकी 188816 कुटुंबाना वेयक्तिक नळ जोडणी देऊन घरात नळाव्दारे पाणी पुरवठा करणेत आला .
ठाणे जिल्हयात 208 गावांमध्ये 100% कुटुंबांना घरगुती नळ जोडणी देण्यात आले असून 155 गावामध्ये 100% उददीष्टय साध्य केलेले आहे.
