जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
परिचय
केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी करणे, बेघर व कच्चे घर असलेल्या गरजू कुटूंबांना अर्थसहाय्य करणे.
सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षण सन 2011 चे यादीचे आधारे लाभार्थीची निवड करण्यात येते.
सामाजिक आर्थिक व जात सर्व्हेक्षण सन 2011 चे यादीचे आधारे घरकुल लाभार्थीची निवड झाल्यानंतर लाभार्थीच्या राहत्या घराचा [कच्चेघर] Geo Tag, Job Card Mapping, निधी वितरित करण्यासाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्न करुन, पंचायत समितीला लाभार्थीची नावे जिल्हास्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित करते. जिल्हास्तरावरुन मान्यता प्राप्त लाभार्थी यांना तालुकास्तरावरुन थेट लाभ हस्तांतरण [DBT] नुसार लाभार्थीस पहिला हप्ता दिला जातो. लाभार्थीने स्वत:च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्याला स्वत:च्या अपेक्षेनुसार घर बांधता येईल, यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत नाही. या साठी काटेकोर प्रयत्न केले गेले आहेत.
घरबांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा व तालुकास्तरावरून आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला 2 रा, 3 रा, व अंतिम हप्ता भौतिक प्रगतीशी सुसंगत पध्दतीने अदा केला जातो. लाभार्थीस मनरेगाच्या माध्यमातून 90 दिवसांचा रोजगार 297/- रू प्रतीदिन इतकी रक्कम अदा केली जाते. स्वच्छ. भारत मिशन अंतर्गत बेसलाईन च्या यादीमध्ये असलेल्या लाभार्थीस शौचालय बांधणीसाठी स्वतंत्र्यपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ध करुन दिली जाते. योजनेच्या रुपरेषेनुसार बेघरांचे “स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते”.
दृष्टी व ध्येय
बेघर व कच्चे घर असलेल्या गरजू कुटूंबांना अर्थसहाय्य करुन स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे
उदिदष्टे कार्ये मजकूर
- केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करणे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांमध्ये लाभ देणे.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबांची स्वरोजगारासाठी कर्ज प्रकरणे हाताळणे.
लाभार्थींना आपले उत्पन्न वाढविता यावे यासाठी गुंतवणूक किंवा उत्पादक उद्योगधंदे काढण्याच्या दृष्टीनेआदर्श योजना तयार करणे.
प्रशासकिय सेटअप
<
| क्र. नं. | अधिकारी/कर्मचारी यांचे नांव | पदनाम | पत्ता | वर्ग | संपर्क क्र | ई मेल |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | श्रीम. छायादेवी शिसोदे | प्रकल्प संचालक | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 1 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 2 | श्रीम. आरती गगे | सहाय्यक प्रकल्प संचालक | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 2 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 3 | श्री. संजय दामोदर नंदनवार | सहाय्यक लेखा अधिकारी | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 3 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 4 | श्री. हर्षद जगन्नाथ मोरे | कार्यालयीन अधीक्षक | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 3 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 5 | रिक्त पद | शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता | – | – | – | – |
| 6 | श्री. विजय कान्हा थोरात | विस्तार अधिकारी | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 3 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 7 | श्री. नारायण गोटीराम उंबरगोंडे | वरीष्ठ सहाय्यक | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 3 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
| 8 | श्रीम. सोनाली भगवान शेवाळे | कनिष्ठ सहाय्यक | ठाणे महानगरपालिका पार्किंग प्लाझा, 8 वा मजला | 3 | 25369132 25334250 |
Drdathane2013[at]gmail[dot]com |
योजना/उपक्रम
राज्य सरकार
| अ. क्र. | योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
|---|---|---|---|
| 1 | शबरी आदिवासी घरकुल योजना | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते. शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशन मधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे. नरेगा अंतर्गत 90 दिवसांच्या मजुरीकरिता प्रति दिन रु.297/- प्रमाणे रु.26,730/- मजुरी दिली जाते. |
1. लाभार्थी अनुसूचित जमाती संवर्गाचा असावा. 2. लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे. 3. महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. 4. घरकुल बांधकामासाठी स्वतःची अथवा शासनाची जमीन असावी. 5. लाभार्थ्याकडे स्वतःचे किंवा कुटुंबाचे पक्के घर नसावे. 6. विधवा, परित्यक्ता, निराधार व दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य. 7. ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.1.20 लाख पर्यंत असावी. 8. इतर कोणत्याही योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. |
| 2 | आदिम जमातीच्या कुटुंबासाठी घरकुल योजना | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते. शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रु.12,000/- देय आहे. नरेगा अंतर्गत 90 दिवसांच्या मजुरीकरिता प्रतिदिन रु.297/- प्रमाणे रु.26,730/- मजुरी दिली जाते. |
1. लाभार्थी कातकरी, कोलाम, माडीया-गोंड या आदिम जमातीचा असावा. 2. लाभार्थ्याकडे अनुसूचित जमातीचा दाखला असणे आवश्यक आहे. 3. घरकुल बांधकामासाठी स्वतःची अथवा शासनाने दिलेली जागा असावी. 4. लाभार्थ्याकडे पक्के घर नसावे. 5. यापूर्वी कोणत्याही शासन योजनेतून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. |
| 3 | रमाई आवास योजना | घरकुल बांधकामासाठी रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते. शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रु.12,000/- देय आहे. नरेगा अंतर्गत 90 दिवसांच्या मजुरीकरिता प्रतिदिन रु.297/- प्रमाणे रु.26,730/- मजुरी दिली जाते. |
1. लाभार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध संवर्गातील असावा. 2. महाराष्ट्र राज्यात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे. 3. लाभार्थी बेघर असावा किंवा पक्के घर नसावे. 4. कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल (विभक्त असल्यास रेशनकार्ड विचारात घेतले जाईल). 5. यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 6. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखांच्या आत असावे. 7. SECC-2011 मधील पात्र लाभार्थी पात्र राहतील. 8. घर बांधकामासाठी स्वतःची जागा असावी. |
| 4 | मोदी आवास घरकुल योजना | राज्यातील इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी घरकुल योजना. | 1. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निधी उपलब्ध केला जातो. 2. AwaasSoft व PFMS प्रणालीद्वारे DBT अंतर्गत निधी वितरित केला जातो. 3. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी रु.12,000/- अनुदान व मनरेगा अंतर्गत मजुरी देय. 4. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी योजनेतून 500 चौ.फुट जागेसाठी रु.50,000/- पर्यंत अनुदान. |
| 5 | पंडित दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना | ग्रामीण घरकुल योजनेंतर्गत पात्र पण भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य. | 1. ग्रामपंचायत गावठाण हद्दीत किंवा नियोजन प्राधिकरणाने मंजूर केलेली जागा असावी. 2. जिल्हाधिकारी किंवा शासनाकडून उपलब्ध शासकीय जागा वापरता येईल. 3. प्रति लाभार्थी 500 चौ.फुट जागा खरेदीस मान्यता. 4. जागेची किंमत किंवा रु.1,00,000/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य. 5. किंमत जास्त असल्यास उर्वरित रक्कम लाभार्थी भरू शकतो. 6. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य ग्रामीण घरकुल योजनेंतील पात्र लाभार्थ्यांना लागू. 7. लाभार्थी निवड तालुकास्तरीय समितीमार्फत केली जाते. |
केंद्र सरकार
| अ. क्र | योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
|---|---|---|---|
| 1 | प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.2,00,000/- देण्यात येते. तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे. नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजुरीकरिता प्रतिदिन रु.297/- प्रमाणे रु.26,730/- मजुरीच्या स्वरुपात दिली जाते. |
1) लाभार्थी कोलाम, कातकरी व माडीया गोंड या आदिम जमातीमधील असावा. 2) लाभार्थ्यांकडे कुठेही पक्के घर नसावे. 3) लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय सेवेत नसावा. |
संयुक्त उपक्रम (केंद्र आणि राज्य)
| अ. क्र | योजनेचे नांव | योजनेचा तपशिल | निकष |
|---|---|---|---|
| 1 | प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण | घरकुल बांधकामासाठी रक्कम रु.1,20,000/- चार टप्प्यांत देण्यात येते (केंद्र हिस्सा – 60%, राज्य हिस्सा – 40%).तसेच शौचालयाकरिता स्वच्छ भारत मिशनमधील बेसलाईन सर्वेमध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थीला रक्कम रु.12,000/- देय आहे.नरेगा अंतर्गत 90 दिवसाच्या मजुरीकरिता प्रतिदिन रु.297/- प्रमाणे रु.26,730/- मजुरीच्या स्वरुपात दिली जाते. |
सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC-2011) माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या प्राधान्यक्रम यादीनुसार लाभार्थ्यांची निवड करण्यात येते. |
अंदाजपत्रक माहिती
| अ.क्र. | योजनेचे नांव | लेखाशिर्ष | एकूण प्राप्त निधी | झालेला खर्च |
|---|---|---|---|---|
| 1 | जिग्रावियं-प्रशासन- राज्य हिस्सा | 25152601 | 64.23 | 48.41 |
| 2 | विक्री केंद्र प्रदर्शने | 25011993 | 0.00 | 0.00 |