बंद

    समाज कल्याण विभाग

    प्रस्तावना

    जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात.
    मागासवर्गीयांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शिक्षण, आर्थिक सहाय्य व सामाजिक उन्नतीवर विशेष भर दिला जातो.

    या विभागामार्फत खालील प्रमुख योजना राबविण्यात येतात:

    • शैक्षणिक विकास योजना
    • आर्थिक विकास योजना
    • 20% सेस फंडातून वैयक्तिक लाभ योजना
    • जात निर्मूलन विषयक योजना
    • दलित वस्ती सुधार योजना
    • अपंग कल्याण योजना

    या योजना शासकीय अनुदानातून राबविण्यात येतात व लाभार्थ्यांना वैयक्तिक तसेच सामुदायिक स्तरावर मदत केली जाते.

    विभागाची कार्यपद्धती

    समाज कल्याण विभागामार्फत विविध योजना योजनेत्तर, योजनांतर्गत व आदिवासी उपयोजना अंतर्गत राबविण्यात येतात.
    या योजनांद्वारे लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, संस्थांना अनुदान व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

    • मान्यता प्राप्त संस्थांना अनुदान देणे
    • वैयक्तिक लाभ योजना राबविणे
    • सामुदायिक विकास साधणे
    • 20% सेस व 3% अपंग सेस फंडाचा वापर
    • व्यसनमुक्ती प्रचार व जनजागृती

    विभागाचे ध्येय

    प्रशासकीय व विकासात्मक योजनांद्वारे मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावणे व सामाजिक न्याय प्रस्थापित करणे.

    विभागाची संरचना

    मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे विभागाचे प्रमुख असून त्यांच्या अधिपत्याखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यरत असतात.
    विभागातील कामकाज 8 शाखांमध्ये विभागलेले आहे.

    समाज कल्याण विभागाची संरचना

    विषयांचे कार्यासन निहाय वाटप

    अ.क्र. कर्मचारी नाव कार्यासन कार्य
    1 श्री. ज्ञानेश्वर धोडकर 1 वसतीगृह योजना, समाज कल्याण योजना
    2 श्रीम. प्राजक्ता पाटील 2 5% सेस फंड योजना, वृद्धाश्रम योजना
    3 श्रीम. प्राजक्ता पाटील 3 20% सेस फंड योजना
    4 श्री. ज्ञानेश्वर धोडकर 4 वस्ती विकास, व्यसनमुक्ती प्रचार
    5 श्रीम. सविता गोसावी 5 शिष्यवृत्ती योजना
    6 श्रीम. सरिता चौगुले 6 लेखा व वित्तीय बाबी
    7 श्रीम. एस. जे. शिर्के 7 दिव्यांग शाळा व वेतन कामकाज
    8 श्रीम. एस. जे. शिर्के 8 दिव्यांग योजना व मार्गदर्शन
    9 श्री. सी. जी. पाटील 9 आवक-जावक व कार्यालयीन काम

    विभागप्रमुखांची माहिती

    नाव पदनाम कार्यालय संपर्क ई-मेल
    श्रीम. उज्वला सपकाळे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद ठाणे 022-25448677 dswozpthane[at]gmail[dot]com

    नागरिकांची सनद (2025-26)

    क्र. सेवा अधिकारी मुदत तक्रार अधिकारी
    1 RTI अर्जावर कार्यवाही माहिती अधिकारी 30 दिवस जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    2 अपील निर्णय जिल्हा समाज कल्याण अधिकारी 45 दिवस राज्य माहिती आयुक्त
    3 समिती सभा निरीक्षक दरमहा जिल्हा समाज कल्याण अधिकारी
    4 वार्षिक अहवाल सादर करणे कनिष्ठ सहाय्यक दरवर्षी जिल्हा समाज कल्याण अधिकारी

    महत्वाचे दस्तऐवज